पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/498

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०६) गणितोपयोगी नियम आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांतले नियम असतील. याप्रमाणे मानलें असतां अलेक्झांड्रियांतून ज्योतिषज्ञान इकडे कसे आले याचे स्पष्टीकरण चांगलें होतें. ग्रीक ज्योतिषाच्या अशा अपुरत्या ज्ञानाच्या पायावर हिंदी ज्योतिषाची इमारत उभारली आहे, यामुळे, सूर्यसिद्धांतासारखे ग्रंथ मुख्यतः ग्रीक ज्योतिषग्रंथांचे अनुयायी आहेत, तरी पुष्कळ गोष्टीत त्यांत स्वतंत्र कल्पना आणि शोध आहेत. आणि ते जरी पुष्कळ गोष्टींत मूळ ग्रीक ग्रंथांहून कमी योग्यतेचे आहेत तरी कोठे कोठे त्यांत नव्या रीति आणि युक्ति आहेत, त्यांत चातुर्य आणि कल्पना दिमून येते हे निर्विवाद आहे. उत्तम हिंदी ग्रंथांतील पद्धति केवळ ग्रीकांपासून घेतलेली जशीच्या तशी आहे अथवा तिला सर्वस्वी धरून आहे असे नाही. तर तींत मिश्रण आहे, आणि जास्त सुधारणा आहेत. आणि या दृष्टीनेच पाहिले तर मूळकल्पकत्वाचा मान मूळसूर्यसिद्धांतकारास दिला पाहिजे." आतां ह्या आभिप्रायांचे परीक्षण करूं. त्यांत परदेशांतील ज्योतिषाचा आमच्या ज्योतिषाशी संबंध कितपत आहे याचा निर्णय येईल, वरील मतांचें परीक्षण. आणि उपसंहारांत सांगावयाच्या काही गोष्टी, ह्मणजे • आम च्या ज्योतिषाची वृद्धि कसकशी होत गेली, व त्यांतील महत्वाच्या अथवा वादग्रस्त गोष्टीविषयी माझे सिद्धांत, इत्यादि गोष्टी ओघाने येतील. गणितस्कंधाचा विचार पाहतां ग्रहांच्या मध्यमगतिस्थिति, स्पष्टगति, स्पष्टस्थिति काढण्याच्या मंदशीघ्रफलसंस्कारांची मानें, सारांश वेधाने निघणारी सर्व माने मूळ आमची आहेत. ग्रीक ज्योतिषाचा आमच्याशी संबंध असेल तर तो एवढाच की मंदशीघ्रोच्चांपासून ग्रहाचें जें अंतर, ह्मणजे केंद्र, तदनुसार ग्रहस्थितीत फरक पडतो, हे तत्त्व परदेशांतून समजले असावे असा संभव आहे. आणि हे तत्त्व टालमीपूर्वीच आह्मांस कळून पुढे आमच्या ज्योतिषाचा विकास स्वतंत्रपणे झाला आहे. आणखी काही किरकोळ गोष्टी कदाचित् परदेशांतून आल्या असतील. जातकाविषयीं पाहतां जातकस्कंध आमच्या देशांत आहे, त्याची उत्पत्ति मूळची आमच्या देशांतली आहे, असा माझा सिद्धांत ठरला आहे. आतां याविषयी प्रमाणे देतोंः-- प्रथम गणितस्कंधाविषयी विचार करूं. त्यांत पंचसिद्धांतिकेंतले सिद्धांत टाल मीच्या पूर्वीचे आहेत असें प्रथम सिद्ध करितों, ह्मणजे . गणितस्कंध. दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी ओघानेच सिद्ध होत आहेत. सदई पांच सिद्धांत टालमीहून प्राचीन आहेत असें मागें (पृ० १५९) दाखविलेंच आहे. ते टालमीहून अर्वाचीन आहेत असें थीबोचे मत आहे. म्हणून त्याचा अंमळ विस्ताराने विचार एथें करितों. मंदफल, शीघ्रफल हे पंचग्रहांचे दोन संस्कार वासिष्ठ, पोलिश आणि सौर सिद्धांतांत आहेत, ते टालमीच्या ग्रंथावरून मात्र त्यांस प्राप्त झाले असले पाहि जेत, आणि यावरून ते टालमीहून अर्वाचीन आहेत असें थीबो ह्मणतो जणू काय टालमीला जी साधने उपलब्ध होती ती असता त्याने काढिलेलीं अनुमाने काढणारा जगांत त्यावांचून दुसरा कोणी नव्हता.