पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/497

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टालमीचा ग्रंथ माहीत होता असे मानिले तर त्या फरकांची कारणे सांगता येत नाहीत. तथापि यावरून शास्त्रीय हिंदी ज्योतिषाचा आरंभ टालमीच्या पूर्वी झाला असें अनुमान काढणे धोक्याचे आहे. टालमीच्या पूर्वी ग्रीक ज्योतिषशास्त्र कोणत्या स्थितीत होतें याविषयी आमची माहिती अगदी अपूर्ण आहे. यामुळे या वादाचा निर्णायक विचार करणे अशक्य झाले आहे. तथापि यासंबंधाच्या थोड्याशा गोष्टी आहेत त्या सांगतो. सूर्यचंद्रांच्या गतींची उपपत्ति हिपार्कसनें बसविली होती, तीच टालमीने घेतली हे प्रसिद्ध आहे. तेव्हां ज्या हिंदी ग्रंथांत फक्त चंद्रसूर्यांचे आणि त्यांच्या ग्रहणांचे गणित आहे, ते हिपार्कस आणि टालमी यांच्या दरम्यान होणे असंभवनीय नाही. दुसरे असें की हिपार्कसने पंचग्रहांच्या मध्यमगति ठरविल्या होत्या. त्यांत टालमीने फारशी सुधारणा केली असें नाही. आणखी असे की, ग्रहगतींच्या अनियमितपणांत निरनिराळे दोन प्रकार मानिल्याने त्यांची उपपत्ति चांगली होते ही गोष्टही हिपार्कसच्या लक्षात येऊन चुकली होती. परंतु प्रत्येक ग्रहाची ती मानें ठरवून गणित करण्याच्या रीति मात्र त्याने तयार केल्या नाहीत. पंचग्रहांच्या गतिस्थितीचे गणित करण्याचा मान टालमी स्वतःकडे घेतो. आणि यावरून असें अनुमान काढिलेच पाहिजे की, मंदफल आणि शीघ्रफल हे दोन संस्कार ज्यांत आहेत असे सूर्यसिद्धांतासारखे ग्रंथ टालमीहून अर्वाचीन आहेत, आणि त्यामुळे त्या संस्कारांचे गणित टालमीच्या ग्रंथावरून मात्र प्रत्यक्ष किंवा परंपरेने त्यांस प्राप्त झालें. रोमक सिद्धांतांत फक्त चंद्रसूर्यांचे गणित आहे. ग्रहगणित त्यांत होते की नाहीं याविषयीं पंचसिद्धांतिकेंत काही नाही. तथापि तो टालमीहून प्राचीन असे मानणे जीवरून भाग आहे अशी एकही गोष्ट नाही." “वासिष्ठ आणि पौलिश सिद्धांतांत ग्रहगणित आहे असें पंचसिद्धांतिकेंतील शेवटल्या अध्यायावरून दिसते. त्या अध्यायाच्या पूर्वार्धातील नियमांत मंदफल आणि शीघ्रफल या दोहोंचाही विचार आहे असे दिसते. परंतु तो अध्याय नीट लागला नाही. यामुळे त्या नियमांचा ग्रीक ज्योतिषाशी कितपत संबंध आहे याचा विचार करितां येत नाही. त्या अध्यायाच्या उत्तराधांतील नियमांत शीघ्रफल मात्र आले आहे, मंदफल आले नाही, असे दिसते. आणि यावरून ते नियम टालमीच्यांहून अगदी बाल्यावस्थेतले दिसतात. त्यांच्या मध्यमगति हिपार्कस आणि टालमी यांहून फार भिन्न आहेत. परंतु यावरून टालमीच्या पूर्वी ज्योतिषज्ञान अलेक्झांडियांतून हिंदुस्थानांत आले होते, असें ह्मणण्यास सबळ कारण नाही. हिंदी ज्योतिषांतल्या काही गोष्टी टालमीच्यांहून बाल्यावस्थेत दिसतात याचे एक कारण असे की, हिंदु ज्योतिष्यांचे नेहमीच्या प्रत्यक्ष प्रचारांतल्या गणिताकडे लक्ष असल्यामुळे त्यांनी सूक्ष्मतेकडे लक्ष दिले नाही. दुसरे महत्वाचे कारण असे की प्रत्यक्ष अलेक्झांड्रियांतल्या ज्योतिष्यांच्या चांगल्या शास्त्रीय ज्योतिष ग्रंथांतील ज्ञान हिंदी ज्योतिषग्रंथांत आलें नाहीं; तर बायो ह्मणतो त्याप्रमाणे ग्रीक फलज्योतिषी व माझ्या मते पंचांग करणारे सामान्य ज्योतिषी यांपासून ते आले. त्यांचे ज्ञान अपूर्ण असले पाहिजे, आणि चांगल्या सिद्धांत्यांच्या मतांहून त्यांची मते काही गोष्टींत निराळी असली पाहिजेत. आणि त्यांच्यांत त्यावेळच्या जुन्या ग्रंथांतल्या गोष्टी राहिल्या असल्या पाहिजेत हे मानणे अयुक्तिक होणार नाही. पोलिश सिद्धांतांत उपपत्ति नाहीं, नुसते ६४