पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/496

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थीबो. (५०४) फार शुद्ध आहेत. हिंदु आणि ग्रीक यांनी एकमेकांपासून वेतले असे फारच थोडे आहे, हे अगदी उघड आहे. आणि एकापासून दुसन्यास मिळण्याचा ओघ, कोलब्रूक मानतो त्याहून निराळा, मणजे पश्चिमेकडून पूर्वेस असण्यापेक्षा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे असे मला वाटते. तत्त्वशास्त्रे आणि धर्म यांसंबंधाने आणि विशेषतः जन्मांतरमतासंबंधे हिंदु आणि ग्रीक शास्त्रांत साम्य आहे. त्यावरून कोलबुक ह्मणतो की, 'या कामांत हिंदु हे शिष्य नव्हते तर शिक्षक होते असा माझ्या मनाचा कल होतो. ' त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राविषयी मी ह्मणतों." आतां डा. थीबोचें मत देतो. पंचसिद्धांतिकेच्या उपोद्घातांत तो ह्मणतो:-(पृ० ५३) हिंदी ज्योतिषाचे प्राचीन रूप जाऊन त्यास अर्वाचीन शास्त्रीय रूप कसकसे आले हे पंचसिद्धांतिकेंतील पांच सिद्धांतांवरून समजतें. पैतामहसिद्धांतांत ज्योतिषाचें मूळचें प्राचीन रूप आहे. वशिष्ठसिद्धांतांत ज्योतिषज्ञान वाढले आहे, तथापि शास्त्रीयसिद्धांतांपेक्षां तो कमी योग्यतेचा आहे. अगदी देशी पद्धतीचे सिद्धांत आणि ग्रीक पद्धतीच्या पायावर रचलेले सिद्धांत यांच्या मधल्या काळांतला तो आहे. बाकी तीन सिद्धांत परस्परांपासून कितीही भिन्न असले तरी ग्रीक पद्धतीचें पूर्ण प्राबल्य झाल्यावर हिंदी ज्योतिषाला जे स्वरूप आलें तें त्यांत आहे. ते स्वरूप प्रसिद्ध आहे ह्मणून सांगत नाही. रोमक आणि पौलिश यांचे काही गोष्टींत साम्य आहे. काही गोष्टींत त्या दोहोंचेही सूर्यसिद्धांताशी साम्य आहे. सूर्यसिद्धांतांत अर्वाचीन हिंदी ज्योतिषाचे स्वरूप पूर्ण स्थापित झालेले दिसतें...ग्रीक ज्योतिष आणि हिंदी ज्योतिष यांत साम्य आहे, याचे कारण ग्रीक ज्योतिषाची मूलतत्त्वे हिंदुस्थानांत आली हे होय, ह्याविषयीं आतां कोणास शंका नाही. पश्चिमेकडून जे ज्ञान आलें तें प्रथमतः पौलिश आणि रोमक या सिद्धांतांत ग्रथित झाले असे दिसते. रोमकांत यवनपुरांतील सूर्यास्तापासून अहर्गण साधिला आहे व सायनवर्ष आहे. आणि पौलिशांत यवनपुरापासून उज्जनीचे देशांतर* सांगितले आहे. ही गोष्ट काकतालीय न्यायाने घडली असें ह्मणतां येणार नाही. हिंदी ज्योतिषाचें मूळ काय, याचे उत्तर आता याप्रमाणे ठरले आहे, तरी कोणत्या ग्रीक ग्रंथांतून हिंदी सिद्धांतांतलें ज्योतिष घेतले आणि ते कधी घेतलें याविषयी विचार करूं लागतांच त्या गोष्टीविषयी संशय पुढे उभा राहतो. टालमीनें ग्रीक ज्योतिषांत जी सुधारणा केली ती हिंदी ज्योतिषांत नाही, यावरून त्याच्या पूर्वी ग्रीक ज्योतिष हिंदुस्थानांत आले असें अनुमान निघते, असे व्हिटनेचे मत आहे. दोहोंचा तपशिलवार गोष्टींत फरक आहे, याचे कारण यावरून सांगता येते. हिंदी पद्धति प्रत्यक्ष टालमीच्या ग्रंथावरून निघणे अगदी असंभवनीय आहे, एवढ्यापुरतें हे मत आह्मास मान्य आहे. परिधिमाने दोघांची भिन्न आहेत. अशा दुसऱ्याही अनेक गोष्टी फरकाच्या आहेत. हिंदूंस

  • पृ. १६१ यांत " यवनाचरजा" या आर्येत “ यवनान्तरजा" असा पाठ थीबोच्या पंचासद्धांतिकेंत आहे, आणि पूर्वापर संदर्भावरून तो खरा दिसतो. तो घेउन यवनपुरापासून अवंती, घट्यादि देशांतर ७२० आणि काशी, ९ असा अर्थ होतो. यवनपुर मणजे आलेक्झांड्रिया असे दिसते. सांप्रतच्या सूक्ष्म शोधाअन्वये आलेक्झांड्रियापासून उज्जनीचे देशांतर ७३८ व काशीचे 4५१ आहे. झणजे पंचसिद्धांतिकेंत उज्जनीचे सुमारे २ अंश कमी व काशीचे १ अंश जास्त आहे.