पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/495

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०३) आणि त्या सूचनांविषयींच पाहिले तर त्या हिंदूंनी ग्रीकांणसून घेतल्या असें ह्मणण्यास जितका आधार आहे, तितकाच ग्रीकांपासून हिंदूनी घेतल्या असें ह्मणण्यास आहे. परंतु इतर प्रमाणे पाहिली असतां हें प्रमेय हिंदूंपासून ग्रीकांनी घेतले असें मणण्यास जास्त आधार आहे. (४)जातकाची कल्पना आणि त्याची सुधारणा यांसंबंधैं विशेष प्रतिष्ठा आहे असें नाही. या पद्धतींत दोन्ही राष्ट्रांचें जें साम्य आहे त्यावरून प्रत्येक पद्धतीची स्वतंत्र उत्पत्ति संभवतच नाही. परंतु त्या पद्धतीच्या मूळकल्पकतेच्या मानाविषयी वाद हिंदु आणि खाल्डियन यांच्यामध्ये आहे, असे मला वाटते. त्यांत एकंदरीत पाहिले असतां हिंदूंस अनुकूल अशी प्रमाणे आहेत. तीनचार आरबी आणि ग्रीक संज्ञा हिंदूंत आहेत त्या अर्वाचीन आहेत. काहीं ग्रीक शब्द हिंदुज्योतिषांत आहेत असें झणतात. त्यांविषयी माझा असा अभिप्राय आहे की, ग्रीक आणि संस्कृत या दोन्ही भाषांस साधारण असे पुष्कळ शब्द आहेत. आणि दोन्ही भाषांत सुप्तितपद्धति सारखीच आहे. परंतु तेवढ्यावरून ग्रीक भाषा संस्कृताची जननी आहे, असे कोणीही ह्मणत नाही. तर जे ग्रीक शब्द हिंदुज्योतिषांत आहेत असें ह्मणतात ते वरील वर्गातलेच होत. ते एकाच उगमापासून दोन्ही भाषांत गेले, अथवा फार प्राचीन काळी संस्कृतांतून ग्रीक भाषेत गेले. (५) हिराडोटस ह्मणतो. "देवांची नांवें इजिप्तदेशांतून ग्रीस देशांत आली." यांत देव शब्दानें ग्रह समजावयाचे आहेत. यावरून या नांवांविषयी स्वतः ग्रीकांची समजूत दिसून येईल. ग्रहांची नांवें वारांस प्रथम कोणी दिली हे निश्चयाने ठरविणे अशक्य आहे. याविषयी प्रो. एच. एच. विल्सन ह्मणतो, “ही पद्धति ग्रीकांस माहीत नव्हती आणि रोमन लोकांनीही बऱ्याच अर्वाचीन काळापर्यंत स्वीकारली नव्हती. ती इजिप्त आणि बाबिलोन येथील लोकांची असें सामान्यतः मणतात; परंतु त्यास पूर्ण आधार नाही. आणि ती पद्धति मूळ कल्पिल्याचा मान इतर लोकांस जितका आहे तितकाच हिंदूंसही आहे." "ज्योतिःशास्त्राचे मूळ कल्पक आपण असें आरब लोक ह्मणत नाहीत...... त्यांस ग्रीक ज्योतिषाचे ज्ञान होण्यापूर्वी ते हिंदुज्योतिषांत अगदी रंगून गेले होते नंतर टालमीच्या सिंटाक्सिस पुस्तकांचे भाषांतर आरबांनी केले. आणि आरबीच्या ल्याटिन भाषांतरावरून ते युरोपांत माहित झाले. ल्याटिन भाषांतरांत राहूला 'नोडस क्यापिटिअस (मस्तकसंबंधीपात) आणि केतला ' नोडस काडी (पुच्छपात)। झटले आहे. यावरून व इतर प्रमाणांवरून हिंदु ज्योतिषाचे वर्चस्व आरब लोकांवर किती होते हे दिसून येते. यावरून क्रांतिवृत्ताचे सत्तावीस विभाग मूळ कोणी काढले या वादांत आरब लोक त्याचे मूळकल्पक असे म्हणता येत नाही." "ग्रहाची स्पष्टस्थिति काढण्याच्या ग्रीक व हिंदीपद्धतींत साम्य आहे. त्याविषयी मला वाटते की, दोन्ही राष्ट्रांस परस्परांपासून कांहीं दिग्दर्शन मात्र मिळालें आणि तेही फार प्राचीन काळी मिळाले. कारण अर्वाचीन काळी हिंदूंनी ग्रीकांपामून कांहीं घेतलें असें मानणे तर घेतलें तें काय हें निश्चयाने सांगणे कठिण आहे कारण दोघांच्या संख्या मुळीच मिळत नाहीत. अयनचलनाचे वर्षमान, पृथ्वीच्या संबंधानें सूर्य आणि चंद्र यांचे आकारमान, सूर्याचें परमफल, इत्यादि महत्वाच गोष्टींत मीकांपेक्षां हिंदूंची माने जास्त शुद्ध आहेत, आणि हिंदूंचे भगणक