पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०२) आरव यांच्या जातकपद्धतींत साम्य आहे. किंबहुना काही भागांत एकसारखेपणा आहे. यावरून मूलतत्त्वांसंबंधे त्यांची उत्पत्ति एकच असली पाहिजे. (५) प्राचीन लोकांस माहित असलेल्या पांच ग्रहांची नांवे व त्यांवरून स्थापिलेली वारपद्धति. या पांच गोष्टींबद्दल माझा अभिप्राय सामान्यतः असा आहे:“एक तर वरील पांचांपैकी कोणत्याही गोष्टीच्या संबंधानें मूळ कल्पक किंवा शोधक हा मान मिळविण्याचा अधिकार हिंदुलोकांस आहे असें झणण्यास जितके चांगले आधार आहेत, त्यांपेक्षा चांगले आधार दुसन्या कोणत्याही राष्ट्राच्या संबंधाने नाहीत." “दुसरे असे की, पांचांपैकी बहुतेक गोष्टींच्या संबंधाने मूळकल्पकतेविषयी प्रमाणे हिंदुलोकांस स्पष्टपणे अनुकूल आहेत असे मला वाटते. आणि त्यांपैकी विशेष महत्वाच्या गोष्टींच्यासंबंधे ही प्रमाणे बहुतांशी किंवा सर्वांशी अगदी निरुत्तर आहेत." "वरील पांच गोष्टींच्या संबंधाने अगदी थोडक्यांत मी आपला अभिप्राय देतो. (१) क्रांतिवृत्ताचे सत्तावीस किंवा अद्यावीस विभाग ही पद्धति, तिच्या विस्तृत रूपानेही, हिंदुलोकांत फार प्राचीन आहे. आणि इतर राष्ट्रांच्या संबंधानें अंशा प्रमाणांचा अगदी अभाव अथवा अत्यल्पता* आहे. यावरून ह्या पद्धतीची उत्पत्ति शुद्ध हिंदु आहे असें माझें निःसंशयपणे मत आहे. बायो इत्यादिकांनी याच्या विरुद्ध अभिप्राय प्रगट केले आहेत तरीही माझें मत पालटत नाही. (२) कांतिवृत्ताच्या बारा भामांचा उपयोग आणि त्यांची नांवे, ही इतर देशांत जितक्या प्राचीन काळापासून आहेत तितक्या प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत आहेत असे सिद्ध करता येईल. आणि ह्या द्वादशधा विभागाचे अस्तित्व इतर राष्ट्रांमध्ये होते अशाविषयी ज्या वेळचा कांही पत्ता नाही त्याच्यापूर्वीच पुष्कळ शतकें हा विभाग हिंदूंस माहीत होता असा विशेष संभव ज्यांवरून दिसून येईल अशीही प्रमाणे आहेत. मात्र ती पहिल्याइतकी स्पष्ट व खात्रीची नाहीत. याविषयीं आयडलर आणि लिप्सियस यांचे अभिप्राय हंबोल्ट याने दिलेले एथे देतों. आयडलर याचा अभिप्राय असा आहे की 'प्राच्य लोकांत बारा विभागांची नांवें होती, परंतु तारकापुंज नव्हते.' आणि लिप्सियस ह्मणतो की 'बारा विभागांस ज्यांवरून नांवें पहली ते तारकापुंज ग्रीक लोकांनी खाल्डियन लोकांपासून घेतले अशी स्वाभाविक समजूत आहे.' प्राच्य या शब्दांत आयडलर यास खाल्डियन किंवा दुसरे कोणतेही राष्ट्र अभिमत असो; परंतु त्या शब्दाने हिंदुलोक घेणे हे हिंदूंच्या द्वादशधा विभागाच्या पद्धतीशी बरोबर जुळते. कारण हिंदुलोक राशिदर्शक संज्ञांनी पुंज न घेतां विभाग मात्र घेतात. हंबोल्ट याचे मत असें आहे की, बारा विभाग आणि त्यांची नांवें ही ग्रीकांस खाल्डियापासून मिळाली. मला वाटते की या पद्धतीचे मूळ खालडियाहून अधिक पूर्वेकडच्या देशाच्यासंबंधे लागू करण्यास विशेष महत्वाची प्रमाणे आहेत. (३) प्रतिवृत्ताचे प्रमेय दोन्ही राष्ट्रांत भिन्न रीतीनें सुधारत गेले आहे. यावरून एका राष्ट्रास यासंबंधे केवळ सूचनांहून काही जास्ती ज्ञान दुसऱ्यापासून झाले अशी कल्पनाच करता येत नाही.

  • व्हिटनेच्या लक्षांत ही गोष्ट आली नाही. बिजेंसने सर्व उतारे कोठून घेतले हे लिहिले आहे; परंतु ते आधार एथे देण्याचे कारण नाहीं.