पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०१) पांचव्या आणि सहाव्या शतकांत ह्मणजे हिंदूंचे आरंभस्थान संपाती होते त्या सुमारास तें सांप्रतच्या रूपास आले. तसे होण्यास बऱ्याच पिढ्या लोटल्या असतील.जे फेरफार झाले त्यांत फार उपयोगी आणि महत्वाचा असाज्यांच्या जागी ज्याांचा उपयोग हाहोय. तसेंच रेखागणिताबद्दल अंकगणिताचा उपयोग होऊ लागला ही ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हिंदुपद्धतींत रेखागणिताचा संबंध फार थोडा आहे. काटकोनत्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाबराबर असतो हा नियम, सरूप काटकोन त्रिकोणांची तुलना, आणि त्रैराशिक, हेच प्रकार सूर्यसिद्धांतांत आढळतात. इतर सिद्धांतांत अंकगणित आणि बीज यांचे जास्त ज्ञान आढळते त्याविषयीं एथें विवेचन करता येत नाही. शेवटी थोडीशी स्तुति व्हिटनीच्या तोंडून आमच्या वाट्यास आली हे आमचे भाग्यच होय. तथापि एथे व्हिटनेच्या पक्षपातबुद्धीचे एक उदाहरण दाखविल्यावांचून राहवत नाही. ते हे की, टालमीच्या ग्रंथावरून हिंदूंनीं कांही घेतलें नाहीं असें जागोजाग दिसत असतां व तोही ते दाखवीत असतां टालमीच्या किंवा हिपार्कसच्या ज्यांवरूनच हिंदूंस ज्या(ची कल्पना सुचली असें जें बायोचें मत ते असंभवनीय नाहीं असें तो ह्मणतो.* व्हिटनेच्या विचारसरणीचे आणखी उदाहरण उच्चपातविचारांत (पृ. २०९) दाखविलेंच आहे. आतां रेव्हरेंड बर्जेसचे मत देऊ. तो हिंदुस्थानांत पुष्कळ वर्षे राहिला होता. त्यास आमच्या आचारविचारांची माहिती होती: व्हिटने बर्जेस. अमेरिकेंत राहिलेला, त्याचे याविषयी पूर्ण अज्ञान. तेव्हां व्हिटनेपेक्षां बर्जेस हा या विषयावर मत देण्यास जास्त अधिकारी हे उघड आहे. तो ह्मणतो:-" हिंदुज्योतिषाच्या इतिहासावर मी एक विस्तृत निबंध तयार केला होता, परंतु तो देण्यास जागा नाही. तथापि व्हिटने याने टीपांत उपयुक्त भर घातली तीत जी मतें प्रकट केली आहेत त्यांत कांहींविषयीं माझें मत भिन्न आहे, ह्मणून थोडक्यांत मी आपले विचार सांगतो. हिंदूंनी ज्योतिषगणित आणि जातक हे ग्रीकांपासून जसेच्या तसे घेतले आणि काही अरेबियन, खाल्डियन, चिनी यांपासून घेतले असें व्हिटनेचे मत दिसते. मला वाटतें तो हिंदूंस न्याय्य मान देत नाही आणि ग्रीकांस वाजवीपेक्षा जास्त मान देतो. ग्रीकांनी पुढे त्या शास्त्रांत जास्त सुधारणा केली हे खरे; तथापि मूलतत्त्वे आणि त्यांची बरेच अंशी मरामत ही हिंदूंची आहेत. आणि त्यांपासून ते शास्त्र ग्रीकांनी घेतलें असें मला खात्रीने वाटते. याबद्दल निरनिराळे मुद्दे पाहूं. (१) क्रांतिवृत्ताचे २७ किंवा २८ विभाग ही पद्धति कमजास्त फरकानें हिंदु, आरब, आणि चिनी यांची सारखीच आहे. (२)कांतिवृत्ताचे १२ विभाग आणि त्यांची नांवें याविषयी पाहिले तर नांवें दोहों पद्धतींत सारख्याच अर्थाची आहेत. विभागकल्पना आणि नांवें यांचे मूळ एकच आहे, हे मत खरे आहे. (३) ग्रहाची गति आणि स्पष्टस्थिति ही काढण्याची प्रतिवृत्तपद्धति दोहोंची सारखीच आहे; निदान त्यांचे इतकें साम्य आहे की, प्रत्येक राष्ट्राने स्वतंत्रपणे ती शोधून काढणे संभवत नाही. (४) हिंदु, ग्रीक आणि *सू. सि. भाषां. पृ. २८४.