पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५००) वनीय दिसते. दोघांच्या संख्या मिळत नाही तेव्हां प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे वेगळे आहेत ही उघड दिसणारी गोष्ट व्हिटनेने स्पष्ट कबूल केली नाही तरी "दोन राष्ट्र शोधास लागली” यांत असे शोध हिंदूंनी स्वतंत्रपणे केले असें कबूल केल्यासारखेंच झाले. ते एकदोन दिवसांत करून लागलाच ग्रंथ तयार केला असें कोणास ह्मणतां येणार नाही. आमचे प्राचीन वेध लिहिलेले कां नाहीत याचे कारण पृ. १४९ मध्ये सांगितले आहे. असो. पुढे तो ह्मणतो:-"क्रांतिवृत्ताचे अंशादि विभाग दोहोंचे एकच आहेत. परंतु ग्रीकांचे ते तारकापुंजांवरून झाले आहेत; आणि हिंदूंच्याचा तर तारकांशी संबंध नाही. आरंभस्थानापासून ३० अंशांस ते मेष ह्मणतात, यावरून त्यांणी हे लोकाचे घेतले, आणि त्यांचा मूळचा उद्देश ते विसरले; किंवा त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलें." मेषादि नांवांचा मूळ हेतु मनांत न आणतां त्या संज्ञा आह्मीं विभागात्मक केल्या यांतच कायतें महत्व मी समजतो. केवळ मेषादि संज्ञांत कांहीं महत्व नाही. आणि त्या तरी आमी लोकांच्या घेतल्या हेच खरे असेल तर हिपार्कसच्या पूर्वीच बहुधा खाल्डियन लोकांपासून घेतल्या असें पुढे दाखविलेंच आहे. पुढे व्हिटने ह्मणतोः–“लिप्ता हा शब्द ग्रीक आहे; तसेंच वार हिंदूंचे नव्हत. ते ज्या पद्धतीने निघाले तिच्या मूळांत होरा शब्द आहे व तो ग्रीक आहे. आणखी ग्रहस्पष्टीकरणांत महत्वाचे उपकरण केंद्र होय, आणि हा शब्द ग्रीक आहे. हे तिन्ही शब्द कोठे कोनाकोपन्यांत नाहीत, तर हिंदुशास्त्रप्रदेशाच्या अगदी मध्यभागच्या किल्लयांत आहेत. हिंदूंची पद्धति मूळची ग्रीकांची आहे याविषयी हे प्रमाण व इतर प्रमाणे यांचे खंडण करतांच येत नाही. शिवाय हिंदु ग्रंथांत यवन, यवनाचार्य ह्यांचा वारंवार उल्लेख आहे आणि काहीं सिद्धांत रोमक नगर ह्मणजे रोम एथे ईश्वरापासून मनुष्यांस मिळाले अशा दंत. कथा आढळतात.* ज्यास्त बारीक प्रमाणे आह्मी देत नाहीं." वारांचा विचार मागें (पृ. १३७, ३९५) केलाच आहे. होरा आणि वार मूळचे आमचे नसले तरी त्यांचा ग्रहस्पष्टगतिज्ञानाशी काही संबंध नाही. केंद्र, लिप्ता, यांविषयी विचार पुढे आहे. पुढे व्हिटने ह्मणतोः-"आतां ग्रीसांतून हिंदुस्थानांत ज्योतिःशास्त्राचे ज्ञान केव्हां आणि कसे आले हा विचार पुढे येतो. याविषयी अजमास मात्र करता येतो. आह्मांस वाटते की रोमच्या व्यापाराचे बंदर जें अलेक्झांडिया ते व पश्चिम हिंदुस्थान यांचा समुद्रमार्गे इसवी सनाच्या आरंभीच्या शतकांत व्यापार चालत असे, त्याबरोबर ज्योतिःशास्त्र आले आणि ह्मणनच उजनी हैं त्याचें मूळ झालें. सीरिया, पर्शिया, बाकट्रिया या मार्गे ते आले असते तर रोमचें इतके महत्व हिंदु ग्रंथांत झाले नसते, व उज्जनी खेरीज शहर मुख्य झालें असते. टालमीनें ग्रीक शास्त्रांत केलेल्या सुधारणा हिंदु ग्रंथांत नाहीत यावरून व सिंटाक्सिसमधील गत्यादि संख्या दोहोंच्या जमत नाहीत यावरून टालमीच्या पूर्वीच ज्योतिषपद्धतीचें मूळ हिंदुस्थानांत आले. हिंदु भूमध्यसमुद्रांत जात, त्यांच्या द्वारें, किंवा ग्रीक विद्वान हिंदुस्थानची पर्यटनें करीत त्यांच्या द्वारें, किंवा ग्रीक ग्रं. थांच्या भाषांतरांनी, किंवा दुसऱ्या रीतीने, तें हिंदुस्थानांत आलें याविषयीं सध्या कांहीं अजमास करितां येत नाही. ते प्रथम कोणत्याही शतकांत इकडे येवो, परंतु * पृ. १७८ श्लोक ७ यास अनुलभून हे झणणे आहे... HUT