पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूळची त्यांचीच असेल तर ती पुष्कळ काळ चाललेल्या वेधांवरून स्थापित झाली असली पाहिजे. असे असून तिने ते आधार मुळीच दाखवू नयेत आणि पुढे सुधारण्यास जागाच नाहीं असें तें शास्त्र पूर्ण सनातन सत्य अशा रूपाने सांगावे, असें कसें संभवेल ? हिंदुग्रंथांत वेधाचा एकही उल्लेख नाही. स्थलांचे अक्षांश, देशांतर, अशा किरकोळ गोष्टींखेरीज वेध घेण्यास कोठेच सांगितले नाही. ग्रंथ हेच कायतें ज्ञानागार, वेधाचे कारण नाही, अशा प्रकाराने ते ग्रंथ लिहिले आहेत. ग्रंथांत जी पद्धति आढळते तिचें मूळ, ती ज्या पिढीने ग्रथित केली तिच्याहून भिन्न अशा एखाद्या प्राचीन पिढीपासून आले, किंवा भिन्न राष्ट्रापासून आले, ह्या दोन गोष्टी मात्र संभवतात. त्या मूळ शोधकांची अवलोकन आणि वेध यांची संवय, आणि त्यांवरून अनुमाने काढण्याची रीति, ह्यांची, ती पद्धति ग्रंथांत ग्रथित करणारांस ओळखही नव्हती; किंवा असल्यास ती ते विसरून गेले होते. जिच्या उद्योगाचें फल तिजहून अर्वाचीन पिढीनें ग्रथित केलें, अशी एकादीमूळ शोध करणारी पिढी हिंदुस्थानांत झाली असा संभव प्राचीन ग्रंथांवरून दिसतच नाही. तर मग परराष्ट्राकडून ह्या पद्धतीचें मूळ हिंदुस्थानांत आलें हेंच संभवनीय किंबहुना शक्य दिसते." यांत असंभवनीय गोष्टी व्हिटने म्हणतो त्या युगपद्धति इत्यादि होत. परंतु आमच्यांत युगपद्धति परंपरेनें इतकी बद्धमल झाली होती की ती सोडणे झणजे "वेदबाह्य" असा शेरा ब्रह्मगुप्ताने रोमकास दिला आहे तसा मिळविणे होय. वसे आमच्या ज्योतिष्यांच्याने करवले नाही. यांत युरोपियन दृष्टीने दोष आहे हे ठीकच आहे. आमच्या दृष्टीने तो दोष नाही. उलटे युगपद्धतीशी आमच्या ज्योतिष्यांनी मेळ घातला हेच त्यांचे चातुर्य होय. पंचसिद्धांतिकपासून राजमृगांक ग्रंथापर्यंत इतिहास मी दिला आहे त्यावरून, व अयनचलनविवेच नावरून सहज दिसून येते की वेधाने जे फेरफार ग्रंथांत व्हावयाचे ते तोपर्यंत वारंवार होत आले, इतकेच नाही तर पुढेही कारण पडलें तसे होत आले. असो. पुढे व्हिटने ह्मणतोः-आतां हिंदुपद्धति ग्रीकांपासून आली याच्या प्रत्यक्ष प्रमाणांचा विचार करूं. प्रतिवृत्तपद्धति दोहोंत सारखीच आहे. ही प्रतिवृत काही अंशी नैसर्गिक आहेत, हे खरे आहे, तरी त्या पद्धतींत इतका पुष्कळ भाग कृत्रिम आणि मनःकल्पित आहे की दोन्ही राष्ट्रांनी स्वतंत्रपणे ती एकाच प्रकारची पद्धति शोधून काढली हे असंभवनीय आहे. ग्रीकांनी ती पद्धति मूळ काढिली, हळुहळु सुधारली, आणि टालमीने ती पूर्ण स्वरूपार्ने प्रथित केली, असें मानण्यास प्रमाणे आहेत. खाल्डियन, इजिशियन यांपासून काय घेनले हे ते स्पष्ट सांगतात. प्रतिवृत्तकल्पनेचे मळ, तिचे आधारभूत वेध, आणि तिला सिद्धांतरूप देण्याची संयोगीकरणपृथक्करणपद्धति, ही सर्व ग्रीक ग्रंथात दिमन येतात. हिंदुपद्धात पहावी तो तिला वेध नको, कांहीं नको. ती एकदम साक्षात् ईश्वरापासून पूर्णत्वाने आली. गति इत्यादिकांच्या संख्या दोहोंच्या बऱ्याच मिळतात, या गोष्टीस आह्मी महत्व देत नाही. कारण दान राष्ट्र सत्याच्या शोधास लागली तर त्यांचा निसगाशी व परस्परांशी बहुतांशी मेळ पडेल हे संभवनीय आहे." प्रतिवृत्तपद्धति प्रत्येकाची स्वतंत्र नाहीं, तींत परस्परांचा संबंध असावा हे संभ