पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/490

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निधणारी अनुमानें होती हैं अयापि सिद्ध होणे आहे*...हिंदु पद्धति नैसर्गिक नाहीं; पूर्णपणे कृत्रिम आहे. स्वच्छंदपणे गृहीत मानलेल्या गोष्टी, किंबहुना सृष्टीत ज्यांस कांहीं आधार नाही अशा असंबद्ध गोष्टी ( absurdities ), यांनी ती पूर्ण भरलेली आहे. हे दोन्ही प्रकार पाहिजे त्यास कल्पितां येतील. युगपद्धति; कलियुगारंभी सर्व ग्रह एकत्र किंवा फार जवळ जवळ होते ही कल्पना, व तेव्हांपासून गणिताचा आरंभ; कांहीं कालाच्या अंतराअंतरानें ग्रह सर्व एकत्र येतील अशी त्यांची युगभगणसंख्या मानणे; झिटापीशियम् हे आरंभस्थान मानणे मंदोच्चे आणि पात यांची भगणसंख्या; उपवृत्तें (परिधि) ओजयुग्मपदी भिन्नभिन्न असणे आणि ग्रहकक्षामाने; ही या गोष्टींची काही उदाहरणे होत. ह्यावरून स्पष्ट दिसते की, हिंदु ज्योतिःशास्त्र एकाच पुरुषापासून उत्पन्न झाले नसले तर एकाच काळच्या एका वर्गापासून उत्पन्न झाले. त्या पुरुषास किंवा वर्गास आपल्या स्वभावविशेषाचे वर्चस्व एका सर्व राष्ट्राच्या शास्त्रावर बसविण्याचे सामर्थ्य होतें." “तर मग सर्व सिद्धांतांत सारखी अशी ही पद्धति कोठे, कधी, कोणाच्या वर्चस्वानें उत्पन्न झाली या गोष्टीच्या विचारापुढे एकादा सिद्धांत कधीं उत्पन्न झाला ह्या गोष्टीच्या निर्णयाचे महत्व राहत नाही...आमचे मत आहे की खिस्ती सनाच्या आरंभानंतर लवकरच हिंदुज्योतिःशास्त्र हे ग्रीक शास्त्रापासून उत्पन्न झाले, आणि इ. स.च्या पांचव्या आणि सहाव्या शतकांमध्ये तें पूर्णतेस आलें. ह्याबद्दल प्रमाणे अशी-प्रथमतः सामान्यतः पाहिले असतां हिंदुलोकांचा कल आणि स्वभाव इतर संबंधाने आपल्यास माहित आहे त्यावरून, ज्यांत सत्य पुष्कळ आहे असें हें ज्योतिःशास्त्र हिंदूंचे स्वतःचे असेल अशी अपेक्षाच करता येत नाही. अवलोकन करणे, वस्तुभूत गोष्टींचा ( Facts ) संग्रह करणे, त्या लिहून ठेवणे, आणि त्यांवरून संयोगीकरणपद्धतीने अनुमाने करणे, या गोष्टींकडे त्यांचा कलच नाही. आणि याविषयी त्यांची पात्रताच नाही अशी त्यांची पहिल्यापासून प्रख्याति आहे...मानसशास्त्र, व्याकरण, आणि कदाचित् अंकगणित आणि बीजगणित, यांत मात्र त्यांनी स्वतंत्रपणे प्रतिष्ठा मिळविली आहे... प्राचीन संस्कृत ग्रंथांत तारकांचा उल्लेख पुष्कळ वेळा नाही. ग्रहांचा उल्लेख अर्वाचीन आहे. यावरून खस्थांच्या गतींच्या अवलोकनाकडे हिंदुराष्ट्राचा कलच नव्हता. क्रांतिवृत्ताचे पद्धतवार विभाग लोकांपासून त्यांस मिळाल्यावरही चंद्रसूर्याच्या गति आणि सौरचांद्र वर्षांचा मेळ घालणे या गोष्टींकडे मात्र त्यांनी लक्ष दिले. असे असून त्याहून अर्वाचीन काली सूर्यमालेचे पूर्ण विवेचन ज्यांत आहे असें ज्योतिःशास्त्र एकदम त्यांच्यांत दृष्टीस पडते. तर ते आले कोठून ? अशी सहज शंका येते." "सूक्ष्मतः परीक्षण केले असतां ही पद्धति मूळची हिंदूंची असें मनांतच येत नाही. एकपक्षी ज्यांत सत्यसिद्धांत आहेत असा भाग आणि दुसऱ्या पक्षी अगदी असंभवनीय पौराणिक गोष्टी, ह्या दोहोंचा एकत्र निवास झाला कसा ? शास्त्रीय शोधांनी संस्कृत झालेले मन खन्याबरोबर असंभवनीय गोष्टींचा कसा प्रवेश होऊं देईल? हिंदूंची पद्धति

  • असे हिंदूंचे वेध नव्हते असा भाव. परंतु याबद्दल खात्री नसतां हिंदूंनी बीजसंस्कार मुसलमानी ग्रंथांवरून दिला असें व्हिटने ह्मणतो यांत त्याची विचारसरणी दिसून येते.

सूर्यसिद्धांताच्या कालविचारासंबंधे हे ह्मणणे आहे.