पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/489

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९७) (पृ. ४११) "केंद्रच्युतवृत्ते, प्रतिवृत्तें, अधिवृत्तें (नीचोच्चवृत्तें) इत्यादि पुष्कळ गोष्टींत हिंदु ज्योतिषाचे ग्रीक ज्योतिषाशी साम्य आहे, आणि तें काकतालीय न्यायाने आहे असें ह्मणणे कठिण आहे. ही गोष्ट आणि हिंदी ज्योतिषांत यवनाचार्य, रोमकसिद्धांत ही नांवें आहेत ही गोष्ट, ह्यांवरून हिंदूस ग्रीकांपासून ज्योतिषज्ञान कांहीं तरी प्राप्त होऊन त्याच्या योगाने आपले मूळचे अपूर्ण ज्योतिष वाढवितां आलें आणि शुद्ध करितां आलें, असें मानण्यास आधार होतो, असें कोणास वाटेल तर त्या मताविरुद्ध जाण्याविषयी माझा कल होणार नाही." दुसऱ्या एका लेखांत कोलचूक ह्मणतो (पृ. ४४९) "हिंदूंची प्रतिवृत्ते आणि नीचोच्चवृत्ते या पद्धतीचें टालमीच्या अथवा कदाचित् हिपार्कसच्या पद्धतीशी अगदी ऐक्य नसले तरी साम्य आहे, इत्यादि गोष्टींवरून ग्रीकांपासून हिंदूंस सूचना मिळाल्या याविषयी संशय राहणार नाही." आतां व्हिटने व बर्जेस ह्या दोघांच्या मतांचा सारांश* देतो. प्रथम व्हिटने याने सूर्यसिद्धांताच्या इंग्रजी भाषांतरांत स्पष्टाधिकारांत ग्रीक आणि हिंदु ज्योतिषांतील ग्रहस्पष्टगतिस्थितिप्रमेयाची तुलना केली आहे ती देतो. व्हिटन तो ह्मणतो:--"प्रथमतःच असे स्पष्ट दिसते की, दोहों पद्धतींचे स्वरूप स्थूलतः पाहिले असतां दोहोंचे तत्त्व एकच आहे. ग्रहस्पष्टगतीच्या अनियततेची मुख्य कारणे दोन आहेत असें दोहोंनी शोधून काढले आहे. आणि त्यांच्या त्या शोधांत त्यांस चांगले यश आले आहे. त्या अनियततेचे स्वरूप व तिचे गणित करण्याची रीति दोहोंची एकच आहे. ग्रहांच्या दीर्घवर्तुल कक्षांच्या जागीं दोहोंनी प्रतिवृत्ते कल्पिली आहेत. सूर्याची जेवढी कक्षा आणि सूर्याची जी मध्यमगति तितकीच बुधशुक्रांची दोहोंनी मानली आहे. बुधशुक्रांची सांप्रतच्या मताप्रमाणे जी वास्तविक कक्षा ती त्यांची शीघ्र दोहोंनी मानली आहेत, आणि त्या शीघ्र कक्षांचा मध्य दोहोंनी स्पष्ट सूर्य न मानतां मध्यम सूर्य मानला आहे. आणि दोहोंनीं मध्यम सूर्यास कक्षाकेंद्रच्युति संस्कार सांगितला आहे. दोहानी बहिर्वर्ती ग्रहांचा मध्य सूर्य न मानतां पृथ्वी मानली आहे. त्या प्रत्येक ग्रहास पृथ्वीकक्षेएवढे प्रतिवृत्त कल्पिलें आहे. ते दीर्घ वर्तुळ नाही, तर वर्तुळ आहे. आणि येथंही दोहोंनी प्रतिवृत्ताचा मध्य स्पष्ट सूर्यावरून न काढतां मध्यम सूर्यावरून काढिला आहे...दोहों पद्धतींतले भेद फारच कमी महत्वाचे आहेत. चंद्राचा च्युतिसंस्कार टालमीने शोधून काढलेला हिंदूंस माहित नाही. आणि इतर ग्रहांच्या स्पष्टीकरणांत दुसरा एक नवीन प्रकार त्याने कल्पिला आहे तो हिंदूंस माहित नाही. टालमी मंदफलसंस्कार सगळा एकदम देऊन मग शीघ्रफलसंस्कार एकदांच देतो. हिंदु दोन्ही संस्कार दोनदोनदां देतात. हिंदूंचे मंदशीघ्र परि. धि ओजयुग्मपदी भिन्नभिन्न आहेत, तसे ग्रीकांत नाहीत." शेवटच्या अभिप्रायांत तो ह्मणतोः-"मूर्यसिद्धांतास बीजसंस्कार कल्पिला त्यांत मुसलमानी ज्योतिषाचा काही तरी. संबंध असावा. कारण असे फेरफार हिंदूंनी स्वतंत्रपणे करण्याजोगे त्यांचे वेध किंवा वेधांवरून

  • व्हिटनेच्या अभिप्रायांतील काही गोष्टींचे विवेचन जागच्या जागी केले आहे. काहींचे मागे आलें आहे व पुढे येईल.