पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/488

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यानेही केला आहे. द्रेष्काण शब्द मूळचा संस्कृत असे मला वाटत नाही. आणि याच कारणाकरितां हिंदु फलज्योतिषही मूळचे परदेशांतलें असणे संभवते. कुंडलीवरून फल पाहण्याची पद्धति हिंदुस्थानांत अधिक प्राचीन आहे, तरी ती देखील इजिप्त, खाल्डिया येथील लोकांपासून अथवा कदाचित् ग्रीकांपासूनही हिंदूंनी घेतली असेल.* हे खरे असेल तर जोतिष गणिताचे दिग्दर्शनही त्याच वेळी हिंदुलोकांस मिळाले असेल. हिंदुलोकांचें ज्योतिषगणित फलज्योतिषाकरितां आहे. आणि फलज्योतिषाचे दिग्दर्शन जेथून झालें तेथूनच ते होऊन त्यापासून पुढे हिंदूंनीं तें पक्क दशेस आणिलें असावें. यवनाचार्य या नुसत्या नांवावरून कांहीं निर्णय होत नाही. त्याच्या ग्रंथांतून घेतलेल्या सर्व आधारांची ग्रीक ग्रंथांशी तुलना करून कोणत्या ग्रीक ग्रंथांतून आधार घेतले हे काढिले पाहिजे" (इ.स.१८१६) (पृ० ३९९ ) “ग्रह समान परंतु विलोम अशा गतीने नीचोच्च वृत्त नांवाच्या अधिवृत्तांत फिरतो. त्या अधिवृत्ताचा मध्य वर्तुलाकार कक्षेच्या परिघावर समान मध्यम गतीने सरळ फिरतो. पांच ग्रहांच्या गतींत याहून मोठा अनियमितपणा दिसतो, त्याची उपपत्ति हिंदुज्योतिष्यांनी अशी केली आहे:-केंद्रच्युत वर्तुलाच्या परिघावर ज्याचा मध्य आहे अशा अधिवृत्तांत अनुलोम गतीने ग्रह फिरतात. (बुधशुक्रांची त्या केंद्रच्युत वर्तुलांत प्रदक्षिणा सूर्याच्या प्रदक्षिणेइतक्या कालांतच होते. यामुळे अधिवृत्तांतली प्रदक्षिणा ही वस्तुतः त्याच्या कक्षेतली खरी प्रदक्षिणा होते. बहिर्वी तीन ग्रहांची अधिवृत्तांतली प्रदक्षिणा सूर्याच्या प्रदक्षिणेइतक्या काळांत होते. आणि केंद्रच्युत वर्तुलांतली प्रदक्षिणा ही वस्तुतः ग्रहाच्या कक्षेतील खरी प्रदक्षिणा होते.) हिंदु ज्योतिष आणि टालमीची पद्धति ह्यांचे इतकें साम्य आहे. हे पाहतांच अपालोनिअस ह्याने कल्पिलेलें परंतु हिपाकसने उपयोगांत आणलेलें अधिवृत्त आणि हिपार्कसने कल्पिलेली केंद्रच्युतकक्षा ह्यांचे स्मरण वाचकांस होईल. तथापि केंद्रच्युत कक्षेच्या दुप्पट ज्याची केंद्रच्युति आहे असें वर्तुल पंचग्रहांकरितां टालमीने कल्पिलें आहे तें; तसेंच चंद्राचा च्युतिसंस्कार काढण्याकरितां केंद्रच्युत वर्तुलाच्या मध्याभोंवतालच्या वर्तुळावरचे अधिवृत्त त्याने कल्पिलें आहे तें; आणि बुधगतींत पडणारा फेरफार काढण्याकरितां त्याने कल्पिलेलें केंद्रच्युतीचें केंद्रवृत्त ( circle of anomoly ) ह्या तीन गोष्टी हिंदुपद्धतींत नाहीत, हेही लक्षात आल्यावांचून राहणार नाही. ग्रहाचे अधिवृत्त ( मांद नीचोचवृत्त) आणि केंद्रच्युत वर्तुळावरचे अधिवृत्त (शीघनीचोच्चवृत्त ) ह्यांचे आकार हिंदूंनी चापट कल्पिले आहेत. आर्यभट (पहिला) आणि सूर्यसिद्धांतकार यांनी दोन्ही अधिवृत्ते चापट कल्पिली आहेत. त्यांत गुरु आणि शनि यांच्या वास्तव अधिवृत्ताचा लध्वक्ष शीघ्रोच्चरेत (मध्यमयुतिरेषेत) मानिला आहे (?). ब्रह्मगुप्त आणि भास्कर यांनी मंगळ आणि शुक्र यांची आधिवृत्ते मात्र चपटी मानिली आहेत. "

  • फलज्योतिष हिंदूंनीं ग्रीकांपासून घेतले असें इ. स. १८१७ मध्ये कोलब्रूक याने पुन्हाही झटले आहे.

+Epicycle यास कोणी प्रतिवृत्त ह्मणतात. परंतु प्रतिवृत्त याचा किंचित निराला अर्थ आहे (पृ.३५७ पहा.) ह्मणून एथे अधिवृत्त हा शब्द योजिला आहे. पृ. ३५९ (व त्याचे शुद्धिपत्र) पहा.