पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/487

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९५) काही उद्गार काढिले आहेत. गणित आणि जातक दोन्ही हिंदूंनी ग्रीकांपासून घेतली असे या दोघांचेही मत आहे. परंतु त्यांनी याच विषयावर मुद्दाम लेख लिहिले नसल्यामुळे त्यांचे विवेचन सविस्तर आणि सप्रमाण नाही, यामुळे ते देत नाही. प्रसंगोपात्त त्याविषयी माझा अभिप्राय पुढे येईल. याशिवाय विचार करण्यास अधिकारी अशा युरोपियन विद्वानाचा याविषयी लेख इंग्रजी भाषेत माझ्या पाहण्यांत किंवा ऐकण्यांत नाही. आमच्या लोकांत कोणाचा याविषयी लेख प्रसिद्ध नाही. पुढील अभिप्रायांवरून भारतीय ज्योतिषसंबंधी काही नवीन गोष्टीही कळतील. *कोलकच्या अभिप्रायांत गणित आणि जातक या दोहोंविषयीं अभिप्राय आला आहे. तसेंच आरबी ज्योतिषाविषयीं आभिप्राय आला आहे. आरबांपासून हिंदूंनी ज्योतिष घेतले असा एकदां कांहीजणांचा अभिप्राय होता; परंतु हल्ली यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध झाली आहे, आणि प्रथम आरबांनी हिंदूंपासून ज्योतिष घेतलें याविषयीं आतां कांहीं संशय राहिला नाही. ताजिक मुसलमानांपासून इकडे आले हे मागें सांगितलेच आहे. कोलब्रूक ह्मणतोः --(इ. स. १८०७) (पृ. ३२२) “हिंदुलोकांना परिचित असलेली क्रांतिवृत्ताच्या द्वादशधा विगाभाची कोलक. पद्धाति किंचित् फेरफार करून आरबांनी घेतली असें मला वाटते." पृ. ३४४ “हिंदुलोक कांतिवृत्ताचे १२ विभाग करितात. त्यांचे आरंभस्थान ग्रीकांच्या आरंभस्थानाहून काही अंश पश्चिमेस आहे. ही विभागपद्धति हिंदूंना ग्रीक पद्धतीवरून सुचली असेल असें ह्मणणे अगदीच असंभवनीय नाही. ही उत्पत्ति खरी असली तरी हिंदूंनी ग्रीक पद्धति जशीच्या तशी घेतली नाही. त्यांनी ती आपल्या प्राचीन २७ विभागांच्या पद्धतीस अनुरूप अशी केली." “गोलयंत्राची कल्पना हिंदूंनी ग्रीकांपासून घेतली किंवा त्यांस दिली. घेतली असली तरी त्यांनी टालमीच्या गोलाची सर्वांशी नकल केली नाही. दोहोंच्या रचनेत बरेच अंतर आहे." "अलमजेस्टचें आरबी भाषांतर प्रथम इ०सन ८२७ मध्ये अलहसन बिन युसफ याने केले. दुसरी भाषांतरे झाली आहेत ती मागाहून झाली.” (पृ० ३६४) "इजिप्तच्या आणि बाबिलोनच्या लोकांप्रमाणे हिंदुलोक राशीचे तीन भाग करितात (त्यांस द्रेष्काण ह्मणतात) (पृ. ५२७) " ट्रेष्काणपद्धति खालाडियन, इजिप्शियन आणि पर्शियन यांची एकसारखी आहे. हिंदूंची केवळ तशीच नाही,कांहीं भिन्न आहे."(पृ.३७१) "हिंदूंनीं द्रेष्काणपद्धति परकीय राष्ट्रापासून घेतली हे निःसंशय आहे." ही कल्पना इजिप्टचा राजा नेकेपसो याची असें फरमिकुस ह्मणतो. सेलस ( Psallus ) याने तेउसर नावाच्या बाबिलोनी ग्रं. थकाराचे वचन यासंबंधे घेतले आहे. त्या ग्रंथकाराचा उल्लेख पोरफिरिअस

  • हेनरी टामस कोलब्रूक हा इ. स. १७६५ मध्ये जन्मला. हिंदुस्थानांत इ. स. १७८२ त आला. २८०१मध्ये कलकत्ता सदर दिवाणी अदालतीचा मुख्य जज्ज झाला. त्याने एक लक्ष रुपये संस्कृत पोथ्या घेण्याकडे खर्च केले. त्या पोथ्या हाली इंडिया ऑफिसांत आहेत. ह्याचे लेख

Asiatic Researches पुस्तक ९ इ. स. १८०७, पुस्तक १२ इ. स. १८१६ यांत व पाटीगणित आणि बीजगणित यांच्या भाषांतरांत इ. स. १८१७ मध्ये छापले आहेत. ते सर्व इ. स. १८७२ मध्ये Miscellaneous Essays by Colebrooke,Vol. II. यांत छापले आहेत. त्यांतून वरील उतारे घेतले आहेत. त्यांत पृष्ठं दिली आहेत, ती या १८७२च्या पुस्तकाची आहेत. मिजास्त ग्रंथ मागें (पृ. २९३ ) लिहिला तोच अलमजेस्ट होय.