पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाय. आतां ग्रहगतीसंबंधी आणि जातकासंबंधी युरोपियनांच्या मताचें परीक्षण करूं. युरोपियन विद्वानांचे मत मटले ह्मणजे, ते देणान्याची योग्यता कशीही असो, ते जसें कांहीं वेदवाक्य च, असे आमच्या काही लोकांस वाटते. आमच्या काही चांगल्या विद्वानांसही तसेंच वाटते हे आश्चर्य होय. परंतु ते मत देणाराचा अधिकार किती ह्याचा विचार केल्यावांचून किंवा स्वतः अधिकार असल्यावांचून कोणताही निर्णय ठरविणे योग्य नाही. मोठ्या विद्वानांच्या अभिप्रायावर इतर लोकांचा साहजिक मोठा विश्वास बसतो. ह्मणून मोठ्या विद्वानांनी अभिप्राय देणे तो फार विचाराने दिला पाहिजे. ज्योतिषाच्या गणितस्कंधाविषयी अभिप्राय देणे तर आमच्या ज्योतिषांतला करणभाग ( Practical astronomy) व उपपत्ति भाग ( Theoretical As.) तसेंच युरोपियन ज्योतिषांतलें करण आणि ग्रहगत्युपपत्ति, यांची, किंवा दोहोंपैकी कोणत्या तरी जोडीची, किंवा निदान कोणत्या तरी करणाची किंवा उपपत्ति भागाची, ज्यास माहिती आहे तो मात्र, दोन्ही राष्ट्रांच्या ग्रंथांची तुलना करून, अमुक राष्ट्राने ज्योतिष अमुक राष्ट्रापासून घेतले असें विधान करण्यास अधिकारी आहे असें झणण्यास हरकत नाही. तसेंच जातकासंबंधी अभिप्राय देणे तर वरील अधिकार असून आणखी जातकस्कंधाच्या मूलतत्त्वांची तरी माहिती पाहिजे. तसेंच अभिप्राय देणारास साधनें असावी तशी असली पाहिजेत. त्यांच्यायोगाने त्याचा अधिकार कमजास्त होतो. भारतीय ज्योतिषाविषयी अभिप्राय देण्यास साधनें उत्तरोत्तर वाढत आहेत. आज जी साधने उपलब्ध आहेत ती १० वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हती. असो, गणितस्कंधाविषयीं अभिप्राय कोलक, इ. बर्जेस, व्हिटने आणि डा. थीबो ह्यांनी दिले आहेत. ग्रीक ज्योतिषाची माहिती मला प्रत्यक्ष मुळीच नाही. ती या चौघांच्या अभिप्रायांत सहज आली आहे. ह्मणून त्यांच्या अभिप्रायांतील अवश्य ते भाग अक्षरशः देतो. टालमीच्या पूर्वीच्या ग्रीक ज्योतिषाची माहिती युरोपियन विद्वानांसही नाही. कारण ती उपलब्धच नाही. हे पुढें थीबोच्या अभिप्रायांत आहेच. कोलकचा अभिप्राय इ.स. १८०७ पासून १८१७ पर्यंतचा आहे. पुढील दोघांचे १८६० च्या सुमाराचे आहेत, व थीबोचा १८८९ मधील आहे. माझ्या ग्रंथांत भारतीय ज्योतिषाची माहिती जी आली आहे तीतली पुष्कळ माहिती कोलबूकला उपलब्ध नव्हती. बर्जेस आणि व्हिटने यांच्या वेळीही बरीच नव्हती. थीबोला बहुतेक उपलब्ध आहे, तरी काही नाही. साधनें खेरीज करून पाहिले तर हे सर्व मत देण्यास अधिकारी आहेत. ह्मणून त्यांचे मत अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो तें महत्वाचे आहे. बर्जेस आणि व्हिटने यांची सामग्री एक असतां (पृ. १८३ पहा ) दोघांचे अभिप्राय भिन्नभिन्न पडले आहेत. बेंटलीच्या ग्रंथांत ज्योतिषशास्त्र मूळ कोणाचे याचा विचार फारसा नाही. डा० कर्न याने बृहत्संहितेच्या उपोद्घातांत (इ. स.१८६५)व जेम्स बर्जेस याने इ. स. १८९३ मध्ये एका लेखांत याविषय अशी खात्री होईल इतकेच नाही, तर भारतीयांची सर्व नक्षत्रे अगदी स्वाभाविक सुचलेली आहेत अशी खात्री झाल्यावांचून रहाणार नाही. दहा बारा वर्षे चंद्रनक्षत्रसमागम पाहून माझी तशी खात्री झाली आहे. चिनी लोकांची नक्षत्रे सर्वांशी भारतीयांशी जुळतात असे नाही, काही फरक आहे. आणि चिनी लोकांनी आपली नक्षत्रपदात स्वतंत्रपणे स्थापिली असले.