पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/485

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९३) नक्षत्रपद्धति मूळची कोणाची, राशिपद्धति प्रथम कोणी काढिली, हा विचार तादृश महत्वाचा नाहीं, ग्रहांच्या मध्यमगति आणि स्पष्टगति यांचे नक्षनपद्धति बाविलोनची नव्हे. वा- गणित फार महत्वाचे होय, हे मागे सांगितलेच आहे. तथापि नक्षत्रांविषयीं एक महत्वाचा लेख नुकताच आढळला त्यांतला सारांश सांगतों.-'नक्षत्रपद्धति मूळची बाबिलोनियन लोकांची की काय ? याविषयीं हा महत्वाचा लेख डा० थीबो ह्यानें बंगाल एशियाटिक सोसायटीच्या जरनलाच्या ६३ व्या पुस्तकांत इ० स० १८९४ मध्ये लिहिला आहे. बाबिलोनियांतले पुष्कळ कोरीव लेख हल्ली खणून काढिले आहेत. फादर स्ट्रासमेअरच्या साह्याने फादर एपिंग ह्याने मोठ्या प्रयत्नाने ते वाचण्याचा यत्न करून त्यांतल्या ज्योतिषसंबंधी गोष्टी इ. स. १८८९ मध्ये Astronomisches aus Babylon या पुस्तकांत छापल्या आहेत. सांपडलेल्या कोरीव लेखांत पुष्कळ वेध लिहिले आहेत. उदाहरणार्थ, सेल्यूकिडन कालाच्या १८९ व्या (इ. स. पू. १२४।२३ व्या) वर्षी ऐरु (एप्रिल मे) महिन्याच्या २० व्या रात्रीं शुक्र आकाशांत पूर्वभागीं दिसला किंवा दिसावयाचा होता.* त्याच्या वर ४ याडविर मेषाच्या मस्तकप्रदेशांतील पश्चिमेकडची तारा दिसली. त्याच वर्षी अबू (जुलई आगष्ट) महिन्याच्या २६ व्या रात्री मंगळ पूर्वाकाशांत दिसला. त्याच्या वर मिथुनाच्या मुखांतील पश्चिमेकडील तारा ८ इंचांवर होती. त्याच वर्षी ऐरु महिन्याच्या चवथ्या दिवशी सायंकाळी बुध वृषभराशींत अस्त पावला. सेल्यू. वर्ष २०१ मध्ये तिश्रितु महिन्याच्या ८ व्या रात्री मंगळ तुला राशीत उदय पावला. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून थीबोने असा निर्णय ठरविला आहे की, बाबिलोनचे ज्योतिषी ग्रहस्थिति राशिविभागांत सांगत, क्रांतिवृत्ताचे २७ किंवा २८ नक्षत्ररूपविभाग त्यांच्यांत मुळीच नव्हते. आणि यावरून बाबिलोनियन लोकांपासून हिंदूंनी नक्षत्रे घेतली या ह्मणण्यास अवका शच रहात नाही. अर्थात् तें मत त्याज्य ठरले. + या लेखांत पाहिलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत किंवा पुढे होणाऱ्या लिहिल्या आहेत याचा निर्णय झाला नाही. पुढच्या लिहिण्यास ग्रहगाणतज्ञान पाहिजे. ते बाबिलानियाच्या लोकांस या काळी होते की नाही याचा निर्णय झाला नाही. यासंबंध लिहितांना थीबी लिहितो की, चिनी नक्षत्र मूळ ची २४ होती, पुढे इ. सन १२०० च्या सुमारे २८ झाली, या मणण्यास ऐतिहासिक आधार मुळीच नाही. हिंदी, चिनी आणि आरबी या तीन नक्षत्रपद्धतींत पुष्कळ साम्य आहे असें सदई लेखांत सांगून त्याचे कारण सांगितले नाही. परंतु त्याबद्दल तारीख ५ सप्टेंबर १८९६च्या खासगीपत्रांत थीबो मला लिहितो की,“चिनी, आरबी व हिंदी नक्षत्रांत साम्य आहे याची उपपत्ति कशी लावावी ह्याविषयी अद्याप माझ्या मनाचा समाधानकारक विचार ठरला नाही." ज्यांचा परस्परांशी काही संबंध नाही असे का. णीही दोघे इसम चंद्रमार्गातील नक्षत्रे ठरवू लागले तरी रोहिणी, पुनर्वसु, मघा, चित्रा, ज्येष्ठा' ह्या ठळक पहिल्या प्रतीच्या तारा दोघे साहजिक घेतील. अश्विनी वगैरे काही दुसऱ्या प्रतीच्य तारांविषयी असंच आहे. तसेच कृत्तिका इत्यादि बारीक तारांची नक्षत्रेही साहजिक दोघांची जमतील. हे तत्त्व थीबो यास मान्य आहे. व हे कोणासही मान्य असलेच पाहिजे. परंतु मृगशीर्ष, मूळ, पूर्वोचर भाद्रपदा, भरणी हीनिक्षत्रे तिघांची एक आहेत. पूर्वीचर फल्गुनी हिंदु व आरब यांच्या एक आहेत, आश्लेषा नक्षत्र हिंदु आणि चिनी ह्यांचे एक आहे. यावरून तिघांचे मूळ एक असावे असा थीबो ह्याच्या मनाचा कल दिसतो. परंतु १०।१२ वर्षे किंवा निदान एक वर्ष तरी चंद्र आणि नक्षत्रे पहात गेले तर, ही नक्षत्रे दापतिघांचा जमणे हे अगदी साहजिक आहे।