पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार. भारतीय ज्योतिःशास्त्राचे सविस्तर विवेचन एथवर झालें. ज्योतिःसिद्धांतप्राक्कालांतील वैदिककाल आणि वेदांगकाल या काली ज्योतिःशास्त्राची स्थिति कशी होती हे पहिल्या भागांत सांगितले आणि सिद्धांतकाली ती कशी होती हैं दुसऱ्या भागांत सांगितले. त्यांत दुसन्या भागांत गणित*, संहिता आणि जातक या स्कंधांचे निरनिराळे विवेचन झाले. आतां या सगळ्याचा उपसंहार करूं. भारतीयांनी ज्योतिःशास्त्र-मुख्यत्वें त्याच्या गणित आणि जातक ह्या शाखा खाल्डी (बाबिलोनी) लोक, इजिप्तचे लोक अथवा अलेक्झांभारताय ज्याति- डियाचे ग्रीक यांजपासून घेतल्या असें बहुतेक युरोपियन विद्वाषांत परकीय काय आहे ? नांचे मत आहे. याबद्दल विचार यापूर्वी प्रसंगोपात झाला आहे. तो विचार एथे सविस्तर करून मग उपसंहारांत सांगावयाच्या दुसऱ्या गोष्टी सागू.

  • आणखी कांहीं गणितग्रंथांची माहिती मिळालेली एथे देतो. (Notes on the Hindu Astronomy by J. Burgess, 1893. यावरून:-) (१) हिंदुज्योतिषाची झणण्यासारखी माहिती युरोपियन लोकांस प्रथम सयामांतून नेलेल्या एका ज्योतिषगणितग्रंथावरून मिळाली. या ग्रंथांत वर्षमान ३६५।१५/३२॥३० (झणजे मूलसूर्यसिद्धांत, खडखाय इत्यादिकांतले) आहे. क्षेपक इ. स. ६३८ तारीख २१ मार्च शनवार अमावास्येचे आहेत असें क्यासिनिनामक फ्रेंच ज्योतिषी ह्मणतो. (मूलसूर्यसिद्धांताप्रमाणे शक ५६० मध्यम मेषसंक्रमण वैशाख शुद्ध २ तारीख २२ मार्च ६३८ रविवार घटी १२ पळे ५८ या वेळी येते. आणि त्यापूर्वांचा ह्मणजे चैत्रांतील मध्यम अमान्त शुक्रवार घटी ४९ पळे ३५ ह्मणजे युरोपियन मानाने तारीख २१ मार्च शनिवारी येतो). मूळ क्षेपक गोदावरी जिल्ह्यांतील पिठापुराजवळील नरसिंगपुरचे असावे अथवा काशीचे असावे. या ग्रंथांत सूर्योच ८० अंश आहे. रविपरमफल २।१४ आणि चंद्रपरमफल ४५६ आहे. यावरून हा ग्रंथ मूलसूर्यसिद्धांत अथवा तदनुसारी पहिल्या आर्यभटाचा अनुपलब्ध करणग्रंथ यास अनुसरून आहे. (२) उलमुडयनचे क. रण शक १९६५ (३) वाक्यकरण, कृष्णापूर, शक १४१३, क्षेपक पूर्वीची फाल्गुन वद्य ३० तारीख १० मार्च. ह्याचा कर्ता वररुचि असें वारन झणतो. (४) पंचांगशिरोमणि, नरसापूर इ. स. १५६९ (अथवा २६५६). ह्या दोन ग्रंथांतलें वर्षमान ३६५।१५।३१।१५ झणजे प्रथमासिद्धांतानुसारी आहे. मात्र त्यांत रविफल २।१०३४ आणि चंद्रफल पारा२६ आहे. (५)ग्रहतरंगिणी शक (?) २६१८. (६) सिद्धांतमंजरी १६१९. (वारनच्या कालसंकलितावरूनः-) (७) मल्लिकार्जुन ह्याचा करणग्रंथ शक १२००, ह्यांत अब्दप इत्यादि रामेश्वरच्या रेषेचे आहेत. मल्लिकार्जुन हा तैलंग होता. यावरून हा ग्रंथ सूर्यसिद्धांतानुसारी असावा. (८) बालादित्यकल याचा करणग्रंथ शक १३७८, रामेश्वरची रेषा. (बेंटलीची पुस्तकें कैंब्रिजमध्ये आहेत त्यांच्या यादीवरूनः-)(९) ब्रह्मसिद्धांत अध्याय २६, त्यांत ११ गणिताचे आहेत, बाकीच्यांत महर्त इत्यादि विचार आहे. आरंभ:-ऑथ्यर्कः परमो ब्रह्मा श्यर्कः परमः शिवः ।। (१०) विष्णुसिद्धांत, अधिकार ११, आरंभींचा श्लोक वरील ब्रह्मसिद्धांतांतलाच आहे. (११) सिद्धांत लघुखमाणिक, इ० स०१५ वें शतक, केशवकृत सूर्यसिद्धांतानुसारी, अधिकार ९.(१२) सूर्यसिद्धांतरहस्य, राघवकृत; शक १५१३. (१३) सूयसिद्धांतमंजरी, मथुरानाथकृत, शक १५३२. मथुरानाथ हा शवजित् नामक राजाचा ज्योतिषी होता. (१४) ज्योतिःसिद्धांतसार, शक २७०४, हा मार्ग (पृ०२९७ मध्यें ) वर्णिलेल्या मथरानाथाचा. आहे; अध्याय 5 मथुरानाथाचा बाप सदानंद हा मूळचा पाटणा शहरांत राहणारा, पुढे काशीस राहू लागला. हा ग्रंथ युरोपीय ग्रंथांच्या आधारें केला आहे असे दिसते.(१५) ग्रहमंजरी, रचनाकाल दिला आहे, परंतु तो नीट समजत नाही.