पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९३) कालंकार नांवाचा ज्ञानराजपुत्र सूर्य याचा एक प्रथ आहे. (पृ. २७१ पहा.) ताजिक नीलकंठी ह्मणून शके १५०९ चा एक ग्रंथ आहे. त्यावर याचा मुलगा गोविंद याची रसाला नामक दीका शक १५४४ ची आहे, ती छापली आहे. तसेंच ग्रंथकाराचा नातु माधव याची शक १५५५ ची टीका आहे. (पृ. २७५।६ पहा.) तसेंच विश्वनाथाची एक टीका आहे. हा ग्रंथ सांप्रत बराच प्रचारांत आहे. तापीच्या उत्तर तीरी प्रकाशें एथे राहणारा याज्ञवल्क्यगोत्री बालकृष्ण याने ताजिककौस्तुभ नांवाचा ग्रंथ शक १५७१ मध्ये केलेला आहे. बालकृष्णाच्या पित्रादिकांची नांवें यादव, रामकृष्ण, नारायण, राम ही होती. नारायणरुत (पृ. २९२ पहा.) ताजक सुधानिधि नांवाचा शक १६६० च्या सुमाराचा एक विस्तृत ग्रंथ आहे.