पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/482

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९०) विधफलादेशफलकशाने ताजिकशब्दवाच्यं तदनंतरभूतैः समरसिंहादिभिः... ब्राह्मणः तदेव शानं संस्कृतशब्दोपनिबद्धं ताजिकशब्दवाच्यं ।। अत एव तै. स्ताएव इकवालादयो यावन्यः संज्ञा उपनिबद्धाः॥ यांतही वर मी लिहिलेलेच लक्षण मुख्यत्वे सांगितले आहे. या उतान्यावरून हेही लक्षात येईल की ताजिक ही शाखा यवनांपासून घेतली आहे. ताजिकभूषणपद्धति नांवाचा पार्थपुरस्थ टुंढिराजात्मज गणेश याचा शक सुमारे १४८० चा ग्रंथ आहे त्यांत ग्रंथकार ह्मणतोगर्गायैर्यवनैश्च रोमकमुखैः सत्यादिभिः कीर्तितं । शास्त्रं ताजिकसंज्ञकं...॥ यावरूनही हे यवनांपासून घेतले असे दिसते. दैवज्ञालंकति नांवाचा तेजसिंहकृत एक ताजिक ग्रंथ आहे. तो इ०स०१३०० सुमारास झालेला आहे असे त्याविषयी प्रो० भांडारकर यांनी विवेचन केले आहे त्यावरून दिसते.* समरसिंहरूत ताजिकतंत्रसार ह्मणून ग्रंथ आहे. डे० का संग्रहांतील त्याची प्रता संवत् १४९१ (शक १३५६) मध्ये लिहिलेली आहे. यावरून तो त्यापूर्वी बरीच वर्षे झाला असला पाहिजे. हायनरत्नकाराने समरसिंह मटला आहे तो हाच असावा. असो; यावरून शक १२०० च्या पुढे ह्मणजे मुसलमानी राज्य या देशांत झाल्यावर ताजिक ही शाखा आमच्यांत आली असे दिसते. पुष्कळ ग्रंथांत ताजिक याचें तार्तीयक असें संस्कृत रूप केले आहे. परंतु तें ताजिक यावरून बनवलेले दिसते. ताजिक हा शब्द ताजक असाही लिहितात. ताजिक ही शाखा यवनांपासून घेतली याचा अर्थ इतकाच की, वर्षप्रवेशकाली जे लग्न असेल ते ह्मणजे वर्षलग्न यावरून फलें सांगणे ही कल्पना व त्यासंबंधे कांहीं संज्ञा यवनांपासून घेतल्या. लग्नकुंडली आणि तिच्या फलांचे नियम हे जातकांतल्याप्रमाणेच बहुतेक ताजिकांत आहेत आणि ते मूळचे आमचेच आहेत. वर लिहिल्याखेरीज अनेक ग्रंथ ताजिकावर आहेत. नंदिग्रामस्थ केशवाचा ताजिकपद्धति ह्मणून ग्रंथ आहे. त्यावर मल्लारि, विश्वनाथ यांच्या टीका आहेत. हरिभकत ताजकसार ह्मणून शके १४४५ च्या सुमाराचा एक ग्रंथ आहे. ताज कर्ण ?), नारायण, चतुर्भुजमिश्र आणि दामोदर हे सर्व विद्वान् होते. देविदास याने व्यक्तगणितावर आणि श्रीपतिपद्धतीवर टीका केली आहे. दामोदर याणे भास्करकृत करणकुतूहलावर टीका केली आहे. बलभद्राचा धाकटा भाऊ हरि ह्मणून होता. हे सर्व वृत्त हायनरत्नांत आहे. या ग्रंथाचा काल असा दिला आहे : योगो मासकृतेः समः करह (? ह) तो योगस्तिथिः स्यातिथि: त्रिधा वारमितिस्तदर्ध ( ? दूर्व ) सदृशं (दश) भं सर्व योगो युतः । भूबाणाक्षकुभि १५५१ र्भवेच्छकमितिग्रंथस्य यांत संशयित स्थलें आहेत. निरनिराळी वर्षे आणि मास घेउन गणित करून पाहण्यास सध्या वेळ नाही. सुधाकर यांनी या श्लोकावरून शक १५६४ काढिला आहे, परंतु तो चुकीचा आहे. हा ग्रंथ इ. स. १६५६ चा असें आफ्रेचसूचींत आहे.

  • पुस्तकसंग्रहाचा रिपोर्ट इ. स. १८८२।८३ पहा. 13. कॉ. संग्रह नं. ३२२ स. १८८२।८३ यांतील १४९१ हा विक्रम संवत् आहे असें 'मार्ग' शीर्ष वदि १० गुरौ' ही ग्रंथलेखनाची मिति शके १३५६ अमांत मार्गशीर्ष वय १० गुरुवार हिशी गणिताने मिळते यावरून दिसते.