पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/481

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८९) हल्लीच्या रमलासारखी पद्धति आढळते; परंतु बहुतेक संज्ञा संस्कृत व कांहीं प्राकृत आहेत. तंजावर येथील राजकीय पुस्तकालयांत गर्गसंहितेचें एक पुस्तक आहे. त्यांत पाशकावलि नांवाचे २३५ श्लोकांचे एक प्रकरण आहे. त्यांतला एक श्लोक माझ्या पाहण्यांत आला,* त्यांत 'दुइंभि' अशी एक संज्ञा आहे. ती वर लिहिलेल्या ग्रंथांतही आहे. यावरून रमलविद्या मूळची या देशांतली असे सिद्ध होते. बावरच्या पुस्तकांतील पाशकावलीच्या भाषेवरून ती शकापूर्वी तीनचारशे वर्षांची असावी असें। अनुमान होते. यावरून त्या कालीं पाशकविया या देशांत होती. कालांतराने तिचे मूळचे संस्कृत ग्रंथ लोपले आणि पुढे आरबी ग्रंथांच्या आधारें संस्कृतांत ग्रंथ झाले. ते कधींपासून होऊ लागले हे निश्चयाने समजत नाही. भटोत्पल आणि श्रीपति यांचा एकेक रमलग्रंथ आफ्रेचसूचीत आहे. श्रीपति, भोज यांच्या रमलग्रंथांचा उल्लेख शक १६६७ च्या रमलामृत ग्रंथांत आहे. शक ७०० च्या सुमारास सिंध प्रांतांतले ज्योतिषी आरबस्थानांत गेले होते. त्यांनी आपल्याबरोबर रमल आणिलें की काय न कळे. वर सांगितलेल्या दोन पाशकावलि आणि रमल यांतील पद्धति सर्वाशी एक आहे की भिन्न आहे हे मी पाहिले नाही. तें पाहिल्यावर मुसलमानांचें रमल स्वतंत्रपणे उत्पन्न झाले की हिंदुस्थानांतून प्राचीन काळी तिकडे गेले ह्याचा निर्णय होण्याचा संभव आहे. रमलावर बरेच ग्रंथ आहेत. रमलचिंतामणि नांवाचा एक ग्रंथ चिंतामणि नांवाच्या ज्योतिष्याने केलेला आहे. त्याची ग्रंथसंख्या सुमारे ७०० आहे. आनंदाश्रमांतली त्याची एक प्रत शक १६५३ मध्ये लिहिलेली आहे. यावरून तो सुमारे शक १६०० च्या पूर्वीचा असावा. रमलामृत नांवाचा ग्रंथ खानदेशांतील प्रकाशे येथला राहणारा जयराम नांवाचा औदीच्य ब्राह्मण याने सुरत एथे संवत् १८०२ (शक १६६७ ) मध्ये केलेला आहे. त्याची ग्रंथसंख्या सुमारे ८०० आहे. स्वाम, पल्लीपतन ही संहिता किंवा होरा या दोहोंची अंगें म्हणतां येतील. त्यांवर स्वप्न इत्यादि. कांहीं स्वतंत्र ग्रंथ आढळतात. ताजिक-कोणाच्या जन्मकाळी जितका रवि असेल तितका प्रतिवर्षी जेव्हां होईल तेव्हां ह्मणजे सौरमानाने त्या मनुष्याच्या आयुष्याचे कोणतेही एक वर्ष पूर्ण होऊन दुसरें लागेल तेव्हां जे लग्न व ग्रहस्थिति असेल त्यावरून त्या वर्षांत त्या मनुष्यास होणा-या सुखदुःखाचा निर्णय ज्यावरून करितात त्यास ताजिक असे म्हणतात. हायररत्न ह्मणून दामोदरसुत बलिभद्रकृत एक ताजिक ग्रंथ आहे. त्यांत ह्मटले आहे की यवनाचार्येण पारसीकभाषया प्रणीतं ज्योति शास्त्रैकदेशरूपं वार्षिकादिनाना

  • Burnell's Catalogue.

+बावरच्या पुस्तकांत मंत्रशास्त्राचा एक ग्रंथ आहे तो एका बौद्ध मनुष्याने केला असे स्पष्ट दिसत आहे. त्यांतील पाशकावलीची भाषा अगदी शुद्ध संस्कृत नाही. बौद्धधर्मी लोकांचा कल प्राकृत भाषेत ग्रंथ रचण्याचा विशेष होता. तेव्हां पाशकावलि चंद्रगुप्ताच्या वेळची असावी. बलभद्र हा भागीरथीतीरी कान्यकुब्ज नगरी राहणारा भारद्वाजगोत्री ब्राह्मण होता. याचा गुरु राम ह्मणून होता. पृथ्वीपति साहिसुजा याच्याजवळ राजमहाल येथें असतां ग्रंथ लिहिला असें तो ह्मणतो. याचा आजा लाल हा ज्योतिषी होता. त्याचे पुत्र देवीदास, क्षमंकर (क्षेम