पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८८) गोविंदाचारी झणून एक चांगला ज्योतिषी काशीत होता; तो मारणमोहनादिक मंत्रतंत्रकृत्यांत प्रवीण होता; तो पुढें विंध्यवासिनीजवळ जाऊन राहिला. त्याने शक १७७५ नंतर साधनसुबोध, योगिनीदशा इत्यादि २ । ३ ग्रंथ केले आहेत; तो शक १७८२ मध्ये मरण पावला असें सुधाकर लिहितात. सोलापूर येथील अनंताचार्य म्हाळगी नांवाच्या ज्योतिष्याने अनंतफलदपण आणि आपाभटी जातक असे दोन ग्रंथ केले आहेत. पहिला शक १७९८ मधील -आहे. तो जातक आणि ताजक दोहोंवर आहे. आपा जोशी भांडारकवठेकर ह्मणून अनंताचार्याचा गुरु होता. (तो शक १७८८ च्या सुमारें निवर्तला.) तो फलें सांगे ती सर्व अगदी बरोबर अनुभवास येत; त्याने पूर्व ग्रंथांतील नियमांत कोठेकोठे फरक करून नवे नियम बसविले होते; ते या ग्रंथांत आहेत; असें अनंताचायांनी मला शक १८०६ मध्ये सांगितले. जातकांत केरलमत ह्मणून एक मत आहे. त्यांत इतर ग्रंथांतील नियमां हून कांहीं भिन्न नियम आहेत असे दिसते. केरलमताचे केरलमत. पुष्कळ ग्रंथ आहेत. अमुक गोष्ट होईल किंवा नाहीं, कशी काय होईल, इत्यादि अनेक प्रकारचे प्रश्न ज्योतिष्यास करितात. प्रश्न पाहण्याचे अनेक प्रकार प्रश्न आहेत. त्यांत प्रश्नकाळच्या लग्नावरून प्रश्नाचे उत्तर सांगणे अशी एक पद्धत आहे. ह्मणून प्रश्न हे एक होरास्कंधाचे अंग होय; परंतु प्रश्न पाहण्याच्या कांहीं तन्हांचा ज्योतिषशास्त्राशी मुळीच संबंध नाही. तरी ज्योतिषी मटला ह्मणजे त्यास कोणतेही भविष्य सांगतां आले पाहिजे अशी समजूत आहे. यामुळे कोणताही प्रश्न हा ज्योतिषाचा विषय होतो आणि कोणत्याही प्रशग्रंथाचा समावेश ज्योतिषग्रंथांतच करितात. प्रश्नांवर अनेक ग्रंथ आहेत. प्रश्शनारदी हा लहानस ३२ श्लोकांचा आषं ग्रंथ आहे. तो नारदसंहितांतर्गत असें झटले आहे. परंतु नारदसंहिता हल्ली उपलब्ध आहे ती बृहत्संहितेसारखी आहे. तींत हे प्रकरण नाही. उपलब्ध पौरुषग्रंथांत भटोत्पलकत प्रश्नज्ञान अथवा प्रश्नसप्तति हा ७० आर्यांचा ग्रंथ हाच प्राचीन (शक ८८८ ) दिसतो. फांशांवर कांही चिन्हें केलेली असतात आणि ते फांसे टाकून जसे पडतील त्या वरून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सांगावयाचे अशी एक प्रश्नरमल. विवा आहे, तिला पाशकविद्या अथवा रमल म्हणतात.रमल हा शब्द आरबी आहे. रमलावर हल्ली जे संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांत पारिभाषिक शब्द बहतेक आरबीच आहेत. यावरून ही विद्या मूळची मुसलमानांची असें सकद्दर्शनी मनांत येते; परंतु तसे नाही. प्राचीन गुप्त राजांच्या वेळच्या लिपनि भूर्जपत्रावर लिहिलेले एक पुस्तक वावर नांवाच्या युरोपियन गृहस्थास सांपडले आहे. त्यांत निरनिराळ्या ३ विषयांवर ग्रंथ आहेत. ते पुस्तक इ. स. ३५० पासून ५०० पर्यंत केव्हां तरी लिहिलेले आहे असे सिद्ध झाले आहे. त्यांत

  • सांपडलेल्या पुस्तकाची हकीकत, पुस्तकाचा काही भाग, व पुस्तकलेखनकालाचा निर्णय इत्यादीविषयी लेख बंगाल एशियाटिक सोसायटीच्या नव्हंबर १८९० व अप्रिल १८९१ च्या पुस्तकांत व इंडियन आंटिक्वरीच्या इ. स. १८९२ च्या पुस्तकांत आले आहेत. हली ते परत डा. रुडोल्फ होरनल हे छापित आहेत.

lindi