पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे (पृ. २७३ पहा). यांत फलें क्रमाने लिहिली आहेत, यामुळे हा पत्रिका करणारांच्या फार उपयोगी पडतो. अनंतकत एक जातकपद्धति शक १४८० च्या सुमाराची आहे. (पृ. २७४ ). मुहूर्तमार्तडटीकंत जातकोत्तम ग्रंथाचा उल्लेख आहे. यावरून तो शक १४९३ च्या पूर्वीचा आहे. केशवी जातकपद्धतीच्या विश्वनाथी टीकेंत शिवदासळत जातकमुक्तावलि नांवाचा एक ग्रंथ आला आहे. वीरसिंह नांवाच्या राजाने रामपुत्र विश्वनाथ पंडित याजकडून करविलेला होरास्कंधनिरूपण नांवाचा एक विस्तृत ग्रंथ आहे. त्यास वीरसिंहोदयजातकखंड असेंही नांव आहे. ह्या ग्रंथाचा काल समजला नाही. परंतु त्यांत जातकाभरण ग्रंथांतली वचनें आहेत, यावरून तो शक १४६० नंतर शक १५०० च्या सुमारे झाला असावा. त्यांत अनेक प्राचीन ग्रंथांतली वचनें घेऊन फलें क्रमाने लिहिली आहेत, यामुळे तो पत्रिका करणारांच्या फार उपयोगी आहे. तो कोठे छापलेला आढळला नाही: परंतु छापण्यासारखा आहे. त्यांत अनेक पूर्व ग्रंथांची वचनें आहेत. त्यांत शौनक. गुणाकर, हे ग्रंथकार आणि समुद्रजातक, होराप्रदीप, जन्मप्रदीप हे ग्रंथ आले आहेत. जातकसार नांवाचा एक चांगला विस्तृत ग्रंथ नृहरिकत आहे. त्यांत ग्रंथकार आरंभी ह्मणतो, “वसिष्ठगर्गाविपराशर, वराहलल्ल इत्यादिकांनी होराशास्त्र केले. परंतु त्यांत फलकम नाही. ह्मणून जन्मपत्रिकेत फलें क्रमाने लिहितां यावीं म्हणून सारावलि, होराप्रदीप, जन्मप्रदीप इत्यादि ग्रंथांच्या साह्याने हा ग्रंथ करितो." जातकालंकार नावाचा एक ग्रंथ गणेशकत आहे. हा बराच प्रचारांत आहे. गणेशाचा आजा कान्हजी हा भारद्वाजगोत्री ब्राह्मण गुर्जराधिपतीच्या सभेत भूषणीभूत होता. त्याचे पुत्र सूर्यदास, गोपाल आणि रामकृष्ण यांतील गोपाळाचा पुत्र गणेश याने ब्रनपुरांत शक १५३५ मध्ये जातकालंकार केला. ह्याचे ६ अध्याय आहेत. गणेशाचा गुरु शिवदास नांवाचा होता. बन्नपुर ह्मणजे बहाणपुर असें एका ग्रंथांत आढळले. परंतु जातकालंकार बन्हाणपुरचाच की काय हे निश्चयाने समजत नाही. या ग्रंथावर शुक्लोपनापक कृष्णपुत्र हरभानु याची टीका आहे. बध्नपुर ह्मणजे सूर्यपुर असें टीकाकार ह्मणतो. पृ. २८७ मध्ये वर्णिलेला दिवाकर याचा पद्मजातक म्हणून एक १०४ पद्यांचा ग्रंथ शक १५४७ चा आहे. पद्धतिभषण नांवाचा एक ग्रंथ शक १५५९ मध्ये जलदग्रामवासी ऋग्वेदी रुद्रभटात्मज सोमदेवज्ञ याने केलेला आहे. जलदग्राम हे खानदेशांतलें जळगांव असावें. पद्धतिभूषणावर दिनकररूत टीका आहे. तींत उदाहरणांत शक १७२९ घेतला आहे. हा दिनकर आणि मागें पृ २९८मध्ये वर्णिलेला दिनकर एकच की काय नकळे.होरारन नांवाचा ग्रंथ दामोदरसुत बलभद्र याने केलेला आहे. तो शक १५७७ च्या सुमारांचा असावा. होराकौस्तुभ ह्मणून एक ग्रंथ नरहरिसुतगोविंदविरचित आहे. तो शक १६०० च्या सुमाराचा आहे.. नारायणकृत होरासारसुधानिधि आणि नरजातकव्याख्या हे दोन ग्रंथ शक १६६० च्या सुमाराचे आहेत. परमानंद पाठक याने केलेला प्रश्नमाणिक्यमाला नावाचा एक चांगला जातकग्रंथ आहे असे सुधाकर लिहितात. त्याचे चार भाग आहेत. परमानंद हा सारस्वत ब्राह्मण काशीचा राजा बळवंतसिंग याचा मुख्य गणक शक १६७० च्या सुमारे होता. पद्धतिचंद्रिका नांवाचा राघवकृत एक ग्रंथ आहे. (पृ. २९८ पहा).