पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/478

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इत्य वराहाच्या पूर्वीचे असले पाहिजेत. यावरून वराहमिहिरापूर्वी जातकावर निदान पांच आर्षग्रंथ होते असे दिसते.* याशिवाय वराहाने सत्य, मय, यवन, मणिस्थ, जीवशर्मा, विष्णुगुप्त, इतक्या आचार्यांचा उल्लेख केला आहे. त्यांत सत्याचें नांव तर ६ वेळा आले आहे. शिवाय " एके, केचित्, अन्ये, पूर्वशास्त्रं, आयाः” असे मोघम उल्लेख तर पुष्कळ आले आहेत. यावरून वराहाच्या पूर्वी पौरुष ग्रंथकारही पुष्कळ झाले असे दिसते. सहा आचार्य तर त्याने सांगितलेच आहेत. तर वराहाच्या पूर्वी १०।१२ ग्रंथ होऊन लोकमान्य होणे आणि त्यांतून पांच तर ऋषिप्रणीत मानले जाणे ही गोष्ट शेपन्नास वर्षांत होणे अशक्य आहे. त्या गोष्टीस चारपांचशे वर्षे सहज पाहिजेत. आणखी वराहाने सांगितलेला विष्णु गुप्त ह्मणजे चाणक्य असें उत्पल ह्मणतो. (बृ. जा. ७.७ टीका). यावरून हा चंद्रगुप्ताचा प्रधान जो चाणक्य विष्णुगुप्त तोच असण्याचा संभव आहे. नसेल असें मानण्यास काही कारण नाही. तर वराहाच्या पूर्वी ८०० वर्ष जातकस्कंधावरील ग्रंथ प्रचारांत होते. अर्थात् हल्लीच्या पद्धतचेिं जातकज्ञान शक मांप्रतच्या जातका कालापूा चारपांचशे वर्षे आमच्या लोकांस झाले होत. द्धतीचा आरंभकाल. ते आरंभापासून वराहाच्या वेळेच्या प्रमाणेच नसले तरी हळुहळु ते तसे बनत आले असले पाहिजे. शकापूर्वी ५०० च्या सुमारास मेषादि संज्ञा प्रचारांत आल्या तेव्हांच सांप्रतची जातकपद्धति प्रचारांत आली असावी. त्यापूर्वी अथर्वज्योतिषांतली जातकपद्धति होतीच. शकापूर्वी चारपांचशे वर्षे जातकज्ञान झाले तर गणितस्कंधही तितका प्राचीन असला पाहिजे, कारण ग्रह कोणत्या राशीस कोठे आहेत हे माहीत असल्यावांचून जातकविचार व्हावयाचा नाही, आणि गणितस्कंधाचे पूर्ण ज्ञान इतक्या प्राचीन कालीं नसेल, असे कोणी ह्मणेल, तर तसे मानण्यास काही कारण नाही असे या पूर्वीच्या माझ्या विचारांवरून दिसून आलेच असेल. परंतु आणखी असे की, गणितस्कंधाचें पूज्ञिान-झणजे ग्रहस्पष्टगतीचे ज्ञान--नसले तरी मध्यम गतिस्थितीचें, आणि सामान्यतः ग्रह कोणत्या राशीस आहे इतके समजण्यापुरतें ज्ञान शकापूर्वी पांचशे वर्षांच्या पूर्वी निःसंशय होते (पृ. १२७, १४७ पहा ). ग्रहस्पष्टगतिस्थिति गणिताने बिनचुक काढतां न आली तरी नुस्त्या डोळ्यांनीही ग्रह कोठे आहे, वक्रीमार्गी कधी झाला, उदयास्त केव्हां पावला, हे समजते. यावरून हल्लीची जातकपद्धति आमच्या देशांत सुरू झाली तेव्हां गणितज्ञान पूर्ण झाले असलेंच पाहिजे असे नाही, आमच्या देशांत ग्रहगतीचा विचार झाला व गणितस्कंध पूर्णतेस (आमचे ग्रंथ जितके पूर्ण आहेत तितकाच ) येऊन तो आजपर्यंत अस्तित्वांत राहिला याचे एक मुख्य कारण ग्रहचारांपासून होणाऱ्या परिणामाचा विचार हे होय. संहिताग्रंथांत ग्रहचारांची फलें सांगितली असतात. ती

  • यांशिवाय गर्ग, वसिष्ठ, भारद्वाज, शौनक, अत्रि या ऋषींची वचने दुसऱ्या ग्रंथांत आढळतात. वरुणसंहिता नांवाचा आणखी एक ग्रंथ ऐकण्यांत आहे.

शिवाय अध्याय ७ श्लोक ७८ यांत देवस्वामी, सिद्धसेन हीं नांवे आली आहेत. परंतु ते दोन श्लोक वराहाचे नव्हत असे उत्पलाचे मणणे आहे. यांशिवाय शक्ति आणि भदत्त अथवा भदंत हें नांव आले आहे. शक्ति झणजे पराशर आणि गदंत झणजे सत्य असें उत्पल झणतो.