पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/477

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८१) जातकशास्त्राची मूल तत्त्वे प्रथम ज्यांनी ठरविली: अमुक लगावर जन्मलेल्या मनुनी ज्याची लक्षणे अमुक; मनुष्याच्या शरीराचा विचार कुंडलीतल्या पहिल्या स्थानावरून करावा, पत्नीचा सातव्यावरून करावा, संपत्तीचा अमुक स्थानावरून करावा, हातावर अमुक रेषा अमुक प्रकारची असली झणजे जन्मकाळी सूर्य अमुक राशीस होता अस समजावे, असे नियम प्रथम ज्यांनी ठरविले, ते धन्य होत. सध्या आपल्यास इतक मणण्यास हरकत नाहीं की जातकशास्त्र काही तरी आधारावर रचलेलें आहे आणि मनुष्याचा ग्रहांशी संबंध आहे.* जातकग्रंथांचे पूर्ण स्वरूप थोडक्यात सांगतां येणे कठीण आहे ह्मणून या स्कंइतिहास. धाचा इतिहास मात्र थोडक्यात सांगतो. जातकस्कंधावर सांप्रत उपलब्ध असलेले दैवी ग्रंथ गौरीजातक आणि कालचकजातक अथवा कालजातक आणि अपौरुष किंवा आप असे ग्रंथ पाराशरी, जैमिनीसूत्र, भगुसंहिता, इतके मला माहीत आहेत. पाराशरीत बृहत् आणि लघु असे दोन प्रकार आहेत. जातक स्कंधावर उपलब्ध पौरुषत्रंथांत प्राचीनतम ग्रंथ झटला ह्मणजे वराहमिहिराच। बृहज्जातक होय. याच्या शेवटी त्याने मुनिमतान्यवलोक्य सम्यक् होरां वराहमिहिरो रुचिरां चकार । उपसंहाराध्याय. असें मदले आहे. मध्येही एकदां (अध्या ६ श्लो. १०) त्याने "मुनिगदित (मुनींनी सांगितले आहे)" अस मटले आहे. पराशराचा त्याने दोनदा उल्लेख केला आहे. बृहत्संहितेंत ग्रहगोचराध्यायांत मांडव्याचा उल्लेख केला आहे. तसेच बृहज्जातकटीकाकार भटोपल यानें गार्गी, बादरायण, याज्ञवल्क्य, मांडव्य यांची वाक्यें जातकसंबंधाची दिली आहेत. त्यांत गार्गीची तर पुष्कळच आहेत. यांचे जातकाच्या संबंध सायनमान निसर्गसिद्ध आहे की निरयन तसे आहे याचा निर्णय पटवर्धनांच्या विद्येवरून होईल तर पहावा, ह्मणन मी शक २८१५ पासून बराच प्रयत्न व विचार केला. परंतु तो निर्णय सध्या होईलसें दिसत नाही. शारीरलक्षणांवरून पटवारस समजणारे वाही ग्रह सापेक्ष असतात. उदाहरण अमुक मनुष्याच्या जन्मकाळी रवि पाणि बुध यांमधे २ अंश अंतर होते, लग्नापासून अमुक स्थानी अमुक ग्रह होता, असे त्यांस चेहरा पाहन समजतें; यावरून काही निर्णय होत नाही. दुसरे मुख्य असे की पटवधनांनी हल्ली लक्षणे बसविली आहेत ती प्रथम पटवर्धना पंचांगावरून बसविली आहेत. उदाहरण अमुक लक्षण असतां पटवर्धनी पंचांगावरून अमुक लग्नाचे किंवा अमुक ग्रहाचे अमक अंश येतात असा अनुभव अनेक उदाहरणांत पाहन तसें लक्षण जेथे आढळेल तेथे तितक लग्न किंवा ग्रह सांगावयाचा असे नियम त्यांनी बसविले आहेत. हे नियम प्रथमच सायन पचागांवरूनच बांधितां आले असते. सायननिरयनाचा भेद आणि पटवर्धनांची विद्या ही दोन्ही ज्यांना चांगलीं अवगत आहेत अशा मनुष्यांनी पांच सहाशे वर्षे अनुभवाचे काम चालविलें तर तितक्या काळांत सायननिरयन ग्रहांच्या अंतरांत सात आठ अंश वाढतील, आणि त्यावरून निर्णय होईल. पटवर्धन हे मुखचर्यादिकांवरून ग्रहाचे जे राश्यंश हल्ली मांडितात त्यांपेक्षां सायन राश्यंश सुमार २८ अंश जास्त असतात. पटवर्धनांचे नियम कायम राखन ६०० वर्षांनी मुख चर्येवरून येणारा ग्रह आणि गणितागत सायन ग्रह यांत १८ अंशच अंतर येईल तर जातकासंबंधे सायनमान निसगसिद्ध ठरेल. आणि तें अंतर सुमारे ३६ अंश येईल तर शुद्ध नाक्षत्र (निरयन) मान नि: सर्गसिद्ध ठरेल. फलें सांगण्यास ग्रहांची इच्चे, स्वगृहे आणि ग्रहांचे तत्कालीन राशि आणि लन ही सर्व पटवर्धन हे निरयन घेतात. तथापि तेवढचावरून सध्या काही निर्णय ठरविता येत नाही.