पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/474

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ जातकस्कंध. एकाद्या मनुष्याच्या जन्मकालीं में लग्न असेल त्या लग्नी किंवा लग्नापासून इतर स्थलीं ग्रह असतील त्याप्रमाणे, किंवा जन्मकालीं चंद्र ज्या लक्षण. राशीस असेल त्या राशीसंबंधे जसे ग्रह असतील त्याप्रमाणे, किंवा जन्मकालीन तिथिनक्षत्रादिकांप्रमाणे, सारांश जन्मकालच्या ग्रहस्थितीप्रमाणे त्या मनुष्यास त्या जन्मांत अमुक सुखदुःखादि होतील याचा निर्णय ज्या शास्त्रावरून होतो त्यास होराशाख किंवा जातक असें ह्मणतात. याच शाखेची ताजिक झणून एक पोटशाखा पुढे झाली, तिचे विवेचन पुढे करूं. प्रथम जातकाविषयी विवेचन थोडक्यांत करितों. १२ बाजूस आकृति काढली आहे हिला कुंडली ह्मण - तात. जन्मकालीन लग्नाचा राश्यंक एक (1)या घरांत लिहितात. त्या स्थानास पहिले स्थान ह्मणतात: मग त्या स्थानी बारा राशींपैकी कोणताही राशि येवो. कंडलीत दोन, तीन, इत्यादि अंक मांडले आहेत त्या त्या स्थानांस दुसरे, तिसरें, इत्यादि ह्मणतात. आणि त्या त्या राशीस जन्मकालीं जे ग्रह असतील ते त्या स्थानी लिहितात. ह्या बारा स्थानांस अनुक्रम तनु, धन, सहज, सुहृत्, सुत, रिपु, जाया, मृत्यु, धर्म, कर्म,आय, व्यय, अशा संज्ञा आहेत. या संज्ञांनी बोधित होणान्या व त्यासंबंधाच्या इतर सर्व गोष्टींचा विचार स्या त्या स्थानच्या राशींच्या ग्रहांवरून व इतर ग्रहांचा त्या स्थानाशी दृष्टयादि संबंध असेल त्यावरून करितात. उदाहरणार्थ, पत्नीसंबंधे सर्व फलांचा विचार सातव्या स्थानावरून करितात. या बारा स्थानांस दुस-याही पुष्कळ संज्ञा आहेत. जन्मांत या बाराच गोष्टींच्या संबंधे सुखदुःख होते असें नाही; परंतु ह्या सामान्य संज्ञा आहेत. ज्या गोष्टीचा विचार करावयाचा असेल ती १२ पैकी कोणत्या तरी स्थानी कल्पिलेली असते. उदाहरणार्थ, राजाशी संबंध असणाऱ्या बहुतेक गोष्टींचा विचार १० व्या स्थानावरून करितात. बहुतेक फलांचा विचार जन्मलग्नकुंडलीवरून करतात. क्वचित् राशिकुंडलीवरून ह्मणजे जीत जन्मराशिप्रथमस्थानी मांडला आहे अशा कुंडलीवरून करितात. कुंडलीचे दुसरेही काही प्रकार कल्पिले आहेत. अमुक राशि हे अमुक ग्रहाचे स्वगृह अथवा उच्च असें कल्पिले आहे. कर्क आणि सिंह हीं यथाक्रम चंद्र आणि रवि यांची स्वगहें. पुढे यांच्या दोन बाजूंचे मिथन आणि कन्या हे दोन राशि हीं बुधाची स्वगृहे, त्याच्या पलीकडील वृषभ आणि

  • जन्मलग्न झणजे जन्मकालीं जी रास क्षितिजांत असेल ह्मणजे उदय पावत असेल ती. लग्नकुंडली जमिनीवर लंबसंस्थ क्रांतिवृत्ताच्या पातळीत धरावी. लग्न पूर्वबाजूस आणि सातवें स्थान पश्चिमबाजूस धोरावें. झणजे तीच इष्टकालची आकाशांतली ग्रहस्थिति होय. त्यांत वरचे अर्ध उदय पावलेले आणि खालचे अस्त पावलेले असते. दहावें स्थान खमध्य आणि चवथै है। अन्न खालचे पाताळातले स्थान होय.