पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथाचें असें वर्णन आहे:-हा ग्रंथ भोजरूत (ह्मणजे शक ९६४ च्या सुमाराचा) आहे. त्यांत १ लाभालाभ, २ शत्रुगमागम, ३ गमागम, ४ प्रेषितागम, ५ यात्रा, ६ जयपराजय, ७ संधि, ८ आश्रय, ९ बंधाबंध, १० रोगी, ११ कन्यालाम, १२ गर्भधारणा, १३ जन्म, १४ वृष्टि, १५ क्षिप्तधन, १६ (खंडित), १७ मित्र, १८ चिंता अशी प्रकरणे आहेत. सर्वांमिळून सुमारे १७५ श्लोक आहेत. राजमासँड हा एक संहितास्कंधाचा ग्रंथ असतां हा दुसरा भोजानें कां केला अशी शंका येते; तथापि हा दुसरे कोणाचा असला तरी शक 11८५ चा पूर्वीचा आहे यांत संशय नाही. कारण माधवत रत्नमालाटीकेत ह्याचें नांव आहे. अद्भतसागर-मिथिलामंडलाचा राजा लक्ष्मणसेन याचा पुत्र महाराजाधिराज बल्लाळसेन यान हा ग्रंथ केला आहे. बल्लाळसेन हा शक १०८२ मध्ये तिहासनारूढ झाला आणि त्याने शक १०९० मध्ये हा ग्रंथ केला असें यांत आहे. ह्यांत वराहसंहितेसारखे विषय आहेत; त्यांपेक्षां नवीन काहीं यांत आहे की नाही हे मी पाहिलें नाहीं, तथापि ग्रंथ पहाण्यासारखा आहे असें सुधाकर लिहितात. यांतील अध्यायांस आवर्त अशी संज्ञा आहे. “बुधभार्गवाच्छादनावांचून सूर्यावर छिद्र दिसले तर परचक येते," असें ग्रहणासंबंधी आवर्तात झटले आहे. यावरून बुधशुक्ररुत सूर्यबिंबभेद माहीत होता असे दिसते; आणि यावांचून छिद्र झणजे सूर्याचे डागच होत. "दोन्ही अयनें केव्हां होतात हे मी यथावत् पाहिले आहे [ आणि त्यावरून अयनांश निश्चित केले ]" असे याने लिहिले आहे. यावरून याची शोधकता दिसून येते. या ग्रंथांत अनेक ग्रंथकारादिकांची नांवें आली आहेत. त्यांत वसंतराज, प्रभाकर हे ग्रंथकार आणि वटकणिका, विष्णुधर्मोत्तर, भागवत, हे ग्रंथ आहेत. व्यवहारमदीप-या नांवाचा संहितामुहूर्तस्कंधाचा एक चांगला ग्रंथ पद्मनाभरुत आहे. यमुनापुर नगरांतील शिवदासनामक ब्राह्मणाचा पुत्र गंगादास याचा पुत्र कृष्णदास याचा पद्मनाभ हा पुत्र होय. याच्या ग्रंथांत भीमपराक्रम, श्रीपतिकत रत्नमाला, दीपिका, रूपनारायण, राजमार्तड, सारसागर, रत्नावलि, ज्योतिस्तंत्र (गणितग्रंथ ), व्यवहारचंडेश्वर, मुक्तावलि, यांतील वचने आहेत. भास्कराने एक बीजगणितकार पद्मनाभ लिहिला आहे, तोच हा असें सुधाकर ह्मणतात. परंतु, बीजगणितकार पद्मनाभ शक ७०० च्या पूर्वी झाला असें मागें (पृ. २२९) दाखविले आहे. आणि व्यवहारप्रदीपांत रत्नमाला, राजमार्तड यांचा उल्लेख आहे. यावरून तो शक ९६४ नंतर झाला हे उघड आहे. पद्मनाभाच्या ग्रंथांत सूर्यसिद्धांत, वराहसंहिता, इत्यादिकांतील वचने आहेत ती सांप्रतचा मूर्यसिद्धांत इत्यादिकांत आहेत; परंतु त्याचा एक श्लोक आणि त्याने शौनकसंहिता, वसिष्ठसंहिता आणि ज्योतिस्तंत्र यांतला ह्मणून दिलेला एकेक श्लोक असे चार श्लोक सिद्धांतशिरोमणीत* आहेत, यावरून भास्कराने ते त्या त्या ग्रंथांतून घेतले असें सुधाकर ह्मणतात. परंतु त्या श्लोकांच्या स्वरूपावरून पद्मनाभाचेंच लिहिणे मला अविश्वसनीय दिसते; आणि तो शक १०७२ नंतर झाला असे मला वाटते.

  • 'नुष्यंतु' गणिताध्माय मध्यमाधिकार श्लो. ५; "दिव्यं शान.. गोलाध्याय एक शो. 'यो वेद.' गोललो. ८ असंक्रा०' मध्यममाधि० श्लो. ६