पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/471

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नामक ज्योतिष्याने काशी एथे हा ग्रंथ केला. रघुनाथ हा शांडिल्यगोत्री चितपावन ब्राह्मण होता. याचे पूर्वज दक्षिण कोंकणांत दाभोळच्या दक्षिणेस पालशेत एथे रहात असत. याच्या आजाचें नांव केशव. बाप नृसिंह हा काशी एथे जाऊन राहिला. हा अकबर बादशहाच्या पदरी होता. अकबरानें आसेरि किल्ला घेतला, तेव्हां नृसिंहास ज्योतिर्वित्सरस अशी पदवी मिळाली. जित्वा दाराशाहं सूजाशाहं मुरादशाहं च ॥ अवरंगजेबशाहे शासत्यवनीं ममायमुद्योगः ॥ असा वृत्तांत ग्रंथकाराने दिला आहे. हा ग्रंथ छापला आहे. मुहूर्तदीपक-शके १५८३ मध्ये महादेव नामक ज्योतिष्याने हा ग्रंथ केला. महादेव हा भुज (कच्छ) एथे राहणारा होता. याच्या बापाचें नांव कान्हजि होते. बैतकराजपूजितपद असें याने बापाविषयीं झटले आहे. अमुक अमुक ग्रंथ पाहून हा ग्रंथ करितों असें त्याने लिहिले आहे, त्यांत पूर्वी न आलेले व्यवहारप्रकाश, राजवल्लभ, हे आहेत. हा ग्रंथ छापला आहे. यावर स्वतः ग्रंथकाराचीच टीका आहे. तीत वर न आलेले अमृतकुंभ, लक्षणसमुच्चय, सारसंग्रह हे ग्रंथ आले आहेत असें आनेच लिहितो. मुहूर्तगणपति-विक्रम संवत् १७४२ (शक १६०७ ) मध्ये गणपतिनामक ज्योतिष्याने हा ग्रंथ केला. याने आपल्या वृत्तांतांत असे म्हटले आहे. - गौडोशिशिरोविभूषणमणिगोपालदासोऽभवन् मांधातेत्यभिरक्षिताव्यलभत ख्याति स दिल्ली*श्वरात् ।। तत्पुत्री विजयी मनोहरनृपो विद्योतते सर्वदा ॥ ह्या मनोहर राजास “गौडान्वयकुमुदगणानंदिचंद्र " असेंही ग्रंथकाराने मटले आहे. त्याचा पुत्र यवराज राम याच्या इच्छेवरून हा ग्रंथ केला. ग्रंथकार हा भारद्वाज गोत्री औदीच्य गुर्जर ब्राह्मण होता. याचे उपनांव रावल असें होते असें दिसते. याच्या बाप इत्यादि पूर्वजांची नांवें अनुक्रमें हरिशंकर, रामदास, यशोधर, ब्रह्मर्षि ही होती. हा ग्रंथ छापला आहे. - मुहूर्तसिंधु-पुणे येथील वे. शा. गंगाधरशास्त्री दातार (जन्म शक १७४४ समाधि शक १८१७) यांनी मुहूर्तसिंधु ह्मणून एक संस्कृतमराठी ग्रंथ शक १८०५ मध्ये केला आहे. यांत मुहूर्तादिक आणि त्यांचे अपवाद प्रत्यपवाद यांचा निरनिराळ्या सुमारे ३८ ग्रंथांतील वचनांच्या आधारे सविस्तर विचार केला आहे. हा ग्रंथ छापला आहे या ग्रंथाची ४७२ पृष्टं छापून झाल्यावर आणखी काही संहितामुहूर्तग्रंथांची माहिती मिळाली ती एथे देतों. विद्वज्जनवल्लभ --तंजावर एथील महाराष्ट्र राजकीया पुस्तकालयाच्या यादीत या * हा अवरंगजेब असला पाहिजे. |शिवाजीचा भाऊ वेंकोजी (एकोजी) आणि त्याचे वंशज यांनी तंजावर मांतांत राज्य केले. तंजावर एथे या राजांच्या वाड्यांत पुस्तकसंग्रह फार चांगला आहे. मद्राससरकारच्या तुकमाबरून त्यांचा क्याटलाग बर्नेल (A.C. Burnell ) याने केलेला १८७९ मध्ये छापला आहे. या वंशांत तुळाजी मणून राजा इ० स० १७६५ पासून १७८८ पर्यंत गादीवर होता. त्याने केलेले(अथवा करविलेले )ही ग्रंथ त्या पुस्तकालयांत आहेत. हा संग्रह मुख्यतः याध्याच वेली झाला असावा.