पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/470

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभी संवत्सरफलविचार व ग्रहचार आहे. पुढे मुहूर्तप्रकरण असावे असे दिसते. ग्रंथकार कण्वशाखी वत्सगोत्री होता. याचें गांव कोंडपल्ली नामक होते. तेथली विषुवच्छाया ३।३६ आणि देशांतर ४० पूर्व याने दिले आहे. कांचीपर्यंत माझें पंचांग चालतें असें तो म्हणतो. नरगिरि येथील नृसिंह हे त्याचे कुलदैवत होतें. पैलुभटीयनामक ग्रंथाचा याने उल्लेख केला आहे. - मुहूर्तमार्तड (शक १४९३)-याचा कर्ता नारायण याचे वृत्त पूर्वी (पृ. २७७) दिले आहे. याने बापाजवळच अध्ययन केले असे दिसते. आपल्या ग्रंथावर स्वतः यानेच टीका केली आहे. हा ग्रंथ सांप्रत फार प्रचारांत आहे. याची निरनिराळ्या वृत्तांची १६० पये आहेत. पुष्कळ लोक काव्याप्रमाणे याचें अध्ययन करितात. यांत मुहूर्तग्रंथांतले विषय वर सांगितले आहेत तेवढे मात्र आहेत. तथापि टीकारंभी“संहितास्कंधं चिकीर्षः आह" असेंच ग्रंथकाराने झटले आहे. टकिंत अनेक ग्रंथकारांची वाक्ये आहेत. त्यांपैकी पूर्वी न आलेली मुहूर्तग्रंथकार व ग्रंथ यांची नांवें देतो. ग्रंथकार -गोपिराज, मेंगनाथ, म्हालगी (हीं नांवें वास्तुप्रकरणांत आहेत). ग्रंथ-उद्दाहतत्व, मुहूर्तदपण, कश्यपपटल, संहितासारावलि, व्यवहारसार, शिल्पशास्त्र, बृहदास्तुपद्धति, समरंगण, व्यवहारसारस्वत (यांतील शेवटची ६ नवि वास्तुप्रकरणांत आहेत.), रत्नावलि. शिवाय स्फुटकरण (गणितग्रंथ) आणि जातकोत्तम (जातक ग्रंथ)हीं नांवें आली आहेत.* हा ग्रंथ सटीक छापलेला आहे. तोडरानंद-हा नीलकंठत फार विस्तृत ग्रंथ शक १५०९ च्या सुमाराचा आहे. मी याचा थोडासा भाग पाहिला त्यांत चंडेश्वर, यवनेश्वर, दुर्गादित्य हे ग्रंथकार आणि दैवज्ञमनोहर, व्यवहारोच्चय, कल्पलता हे ग्रंथ इत्यादिकांतली वचनें पुष्कळ आली आहेत. (पृ. २७५ पहा). महतचिंतामाणि-रामभट नांवाच्या ज्योतिष्याने शक १५२२ मध्ये हा ग्रंथ केला आहे. या रामभटाचे वर्णन पूर्वी दिलेच आहे. ( पृ. २७८). या ग्रंथांत मुहर्तग्रंथांतले विषय वर सांगितलेलेच आहेत. हा ग्रंथ बराच प्रचारांत आहे. यावर स्वतः ग्रंथकाराची प्रमिताक्षराव याचा पुतण्या गोविंद याची पीयूषधारा ह्मणून प्रसिद्ध टीका आहे. दोन्ही छापल्या आहेत. पीयूषधारा टीकेंत (शक १५२५) आलेल्या ज्योतिष ग्रंथांची यापूर्वी आली नाहीत अशी नांवें:--जगन्मोहन, ज्योतिपरत्नसंग्रह. मुहूर्त चूडामणि-शिवनामक ज्योतिष्याने हा केलेला आहे. शिवाचे कुलवृत्त पूर्वी दिले आहे. (पृ. २८३ ). या ग्रंथाचा काल सुमारे शक १५४० असावा. मुहूर्तकरूपदम-कृष्णाविगोत्री विठ्ठल दीक्षित याने हा ग्रंथ केला. त्यावर त्याचीच मुहूर्तकल्पद्रुममंजरी नांवाची टीका शक १५४९ ची आहे. मुहूर्तमाला-विक्रम संवत् १७१७ (शक १५८२, इ. स. १६६०) मध्ये रघुनाथ * इतराविषयांवरील ग्रंथांची व ग्रंथकारांची नांवें:-ब्रह्मपुराण, कात्यायनगृह्यकारिका, कात्यायनगृह्ये हरिहरमिश्रव्याख्या, कालनिर्णयदीपिका सविवरणा, मार्कडेयपुराण, धनंजय (कोश), अनेकार्थध्वनिमंजरी (कोश), स्मृतिसारावलि, शुल्बसूत्र, हलायुधकोश, धर्मप्रदीप, तीर्थखंड, पितृखंड, प्रेतमंजरी, आदित्यपराण..