पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/469

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७२) ग्रहचार, ग्रहयुद्धे, व दुसरे वराहसंहितेतले बरेच विषय थोडक्यात सांगितले आहेत. तथापि एकंदरीत याच्या वेळी या विषयांचा काही उपयोग कोणी करीत असतील असें दिसत नाही. याच्या ग्रंथांत नौकाप्रकरण हें एक विशेष आहे. हैं यात्राप्रकरणापुढे आहे. यांत नौका बांधण्यास आरंभ करणे, ती पाण्यांत प्रथम लोटणे, नेहमी त्यांतून जाणे इत्यादिकांचे मुहूर्त सांगितले आहेत. दुसऱ्या कोणत्याही मुहूर्तग्रंथांत हे प्रकरण आढळत नाही. यावरील टीकेंत आधारास पूर्वाचार्यांची वचनें मुळीच घेतली नाहीत. 'नाल ' 'सुकाण' या शब्दांचा श्लोकांत उपयोग केला आहे. त्यावर टीकाकार गणेशदेवज्ञ म्हणतो की, “लौकिकाविमो प्रयोगो गृहीतौ अभिधानादिष्वदृष्टत्वात्. " हा समुद्रकांठचा राहणारा असल्यामुळे गलबतवाले कोळी लोक यास मुहूर्त विचारण्यास येऊ लागले असतील त्यावरून त्याने हे प्रकरण स्वतःचे नवें रचलें असें दिसते. नावप्रदीप म्हणून याचा एक स्वतंत्र ग्रंथही" आहे.मुहूत तत्व ग्रंथ सांप्रत प्रचारांत आहे. त्यावर ग्रंथकाराचा पुत्र गणेश दैवज्ञ याची टीका आहे. ती सुमारे शक १४५०ची असावी. ही छापली आहे. या टीकेंतील यापूर्वी न आलेल्या मुहुर्त ग्रंथकारांची व ग्रंथांची नांवें देतो.:ग्रंथकार-वसंतराज, भूपाल, नृसिंह. ग्रंथ -विवाहपटल, ज्योतिःसार, शांतिपटल, संहितादीपक, संग्रह, मुहूर्त संग्रह, अर्णव, विधिरत्न, श्रीधरीय ज्योतिषार्क, भूपालवल्लभ, ज्योतिषप्रकाश. विवाहपटल(पीतांबरकत)-हा ग्रंथ शक १४४४ चा आहे. त्याचे ५२ श्लोक आहेत. त्यांवर स्वतः ग्रंथकाराची निर्णयामृत नांवाची विस्तृत टीका शक १४४६चर आहे. पीतांबराच्या पित्याचें नांव राम आणि पितामहाचें नांव जगन्नाथ होतें. तो गौड ब्राह्मण महीनदीच्या मुखावरील स्तंभतीर्थ ( खंभात ) येथील राहणारा होता. ज्यांचे पूर्वी वर्णन आले नाही अशी या ग्रंथाच्या टीकेंतलीं, ज्योतिष ग्रंथादिकांची नांवें । देतो. ग्रंथकार--प्रभाकर, वैद्यनाथ, मधुसूदन, वसंतराज, सुरेश्वर, वामन. भागुरि, आशाधर, अनंतमह, मदन, भूपालवल्लभ. ग्रंथः--चिंतामणि, विवाहकौमुदी, वैद्यनाथकृत विवाहपटल, व्यवहारतत्वशत, रूपनारायणग्रंथ, ज्योतिषप्रकाश, संहिताप्रदीप, चूडारत्न, संहितासार, मौंजीपटल, धर्मतत्वकलानिधि, संग्रह, त्रिविक्रमभाष्य, ज्योतिस्सागर, ज्योतिर्निबंध, संदेहदोषौषध, सज्जनवल्लभ, ज्योतिश्चिंतामणि, ज्योतिर्विवरण, ज्योतिर्विवेक, फलप्रदीप, गोरजपटल, कालविवेक, हे सर्व ग्रंथकार आणि ग्रंथ वहुधा मुहूर्तस्कंधाचे आहेत. यांशिवाय ताजिकतिलकसामुद्रतिलक,ह्मणून ग्रंथ आले आहेत. इतर विषयांच्या ग्रंथांत शब्दरत्नाकर नांवाचा कोश आला आहे. ज्योतिषदर्पण-हा शक १४७९ मध्ये कंचपड नामक ज्योतिष्याने केलेला ग्रंथ आहे. हा गद्यपद्यात्मक आहे. मी याची प्रत पाहिली ती पूर्ण नव्हती. तींत आ डे. का. सं. नं. ३३२ सन २८८२।८३ 1 इतर विषयांवरील ग्रंथांची नांवें-भागवत, आश्वलायनगृह्यकारिका, पद्मपुराण, स्मृत्यर्थसार, स्मृतिरत्नावलि, नैषधकाव्य, नृसिंहप्रबंध. मुहूर्ततत्वटीका सुमारे याच टीकेच्या वेळची आहे. परंतु तिचा नकी शक दिलेला नाही. हिचा आहे, म्हणून तीतली ग्रंथादिकांची नांवें हीत आलेली पुनः दिली आहेत.