पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/468

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७१) त्यांतील मुहूर्तस्कंधसंबंधीं ग्रंथ व ग्रंथकार यांची नांवें, ज्यांविषयी यापूर्वी किंवा पुढें कांहीं उल्लेख आला नाही अशी देतो:-ग्रंथकारांची नांवें*-श्रीधर, ब्रह्मशंभ, योगेश्वराचार्य. ( यांतील शेवटची दोन नांवें वास्तुप्रकरणांत आली आहेत.) ग्रंथांची नांवें-भास्करव्यवहार, भीमपराक्रम, दैवज्ञवल्लभ, आचारसार (हा कदाचित् आचाराचा ग्रंथ असेल), त्रिविक्रमशत, केशवव्यवहार, तिलकव्यवहार, योगयात्रा, विद्याधरी विलास, विवाहपटल, विश्वकर्मशास्त्र (हें नांव वास्तुप्रकरणांत आले आहे ). याशिवाय लघुजातक, यवनजातक, वृद्धजातक, हे जातकग्रंथ; नरपतिजयचर्या हा शकुन ग्रंथ; आणि विद्वज्जनवल्लभ हा प्रश्नग्रंथ यांतील वाक्ये आली आहेत. टीकेंत वारप्रकरणांत यानें “इह आनंदपुरे विषुवच्छाया ५।२० विषुवत्कर्णः १३।८" असें झटले आहे. यावरून याचे स्थल आनंदपुर होय; व हे २४ अक्षांशांवर कोठे तरी आहे. राजमार्तड--हा भोजकृत ग्रंथ आहे. तो शक ९६४ च्या सुमाराचा असावा. विवाहवंदावन (शक सुमारे ११६५)-मुहूर्तग्रंथांतलें एक प्रकरण विवाह यावर हा ग्रंथ केशव नामक ज्योतिष्याचा आहे. याचे वर्णन पूर्वी (पृ. २५७, ३१६) आलेच आहे. रत्नमालाटीकाकार माधव याच्या शक ११८५ च्या टीकेंत केशव हे नांव आले आहे. यावरून तो केशव विवाहवृंदावनकारच असावा असे अनुमान होते. आणि यावरून याचा काल सुमारे शक ११६५ हा ह्मणण्यास जास्त बळकटी येते. माधवटीकेंत केशवव्यवहार असें एक ग्रंथाचे नांव आले आहे. तोही ग्रंथ कदाचित् याचाच असेल. विवाहपटल (शार्ङ्गधरकत ) हा विवाहाविषयीं मुहूर्तग्रंथ आहे. यांत हेमाद्रि, माधव, हीं नांवें आली आहेत, आणि पीतांबरकत विवाहपटलाच्या शक १४४६ च्या टीकेंत याचा उल्लेख आहे. यावरून हा ग्रंथ शक १४०० च्या सुमाराचा असावा. याला सारसमुच्चय असेंही नांव आहे असे दिसते. गणेशकत मुहूर्ततत्वटीकेंत (सुमारे शक १४५०)शाईन्धर आणि सारसमुच्चय ही नांवें आली आहेत. यावरूनही शाईन्धराचा काल शक १४०० हून अर्वाचीन नाही. यापूर्वी ज्यांचें कांहीं वर्णन आले नाही अशी यांत आलेली ग्रंथकारादिकांची नांवें देतो. ग्रंथकार:हरि, गदाधर, मुकुंद, भार्गव, पवनेश्वर लक्ष्मीधरभट. ग्रंथः- मुक्तावलि, लक्ष्मीधरपटल, गदाधरपटल, रत्नोज्वलसंहिता. हे सर्व ग्रंथ आणि ग्रंथकार बहुधा मुहूतस्कंधाचे आहेत. मुहूर्ततत्व-नंदिग्रामस्थ केशव याचा हा ग्रंथ आहे. यावरून याचा काल सुमारे शक १४२० असावा. मुहूर्त ग्रंथांतले विषय वर सांगितले ते यांत प्रथम सांगितले आहेतच. परंतु त्यांच्या पुढे 'मुहूर्तखंडः समाप्तः अथ संहिताखंडः' असें ह्मणून पुढे

  • इतर विषयांवरील ग्रंथकारांचीही वाक्यें प्रसंगवशात् माधवाने दिली आहेत. त्या ग्रंथांची किंवा ग्रंथकारांची नावे दिली असतां उपयोग होईल ह्मणून ती एथे देतों:-न्यायकिरणावलि. कणादसूत्रे प्रशस्तकरभाष्य, भविष्योत्तरपुराण, मत्स्यपुराण, शिवरहस्य, बौधायन, गृहस्थधर्मसमुच्चय, स्मृतिमंजरी, सौरधर्मोत्तर, स्कंदपुराण, विष्णुधर्मोत्तर, विश्वरूप, विज्ञानेश्वर, पण समुच्चय, वाग्भट, याज्ञवल्क्यस्मृति, दुर्गसिंह, गरुडपुराण, विश्वादर्शभाष्य, वैद्यनिघंट सुश्रुतचिकित्सित.