पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७.) हे जे मुहूर्तग्रंथांतले विषय सांगितले हेच श्रीपतिकत रत्नमाला या ग्रंथांत आहेत. याशिवाय दुसरे नाहीत. श्रीपतीने आपल्या ग्रंथांस मुहूर्तग्रंथ असें नांव दिले नाही इतकेंच. पुढे तर मुहूर्तमातंड अशाच प्रकारची नांवें या ग्रंथांस देऊ लागले. श्रीपतीचा ग्रंथ लल्लरुत रत्नकोशाच्या आधारे रचलेला आहे. यावरून लल्लाच्या ग्रंथांतही मुहूर्ताशिवाय दुसरे विषय नसतील असे वाटते. व वराहानंतर त्याच्या संहितेसारखा दुसरा ग्रंथ झालेला आढळत नाही. यावरून सुमारें शक ५०० किंवा ६०० पासून मुहूर्त हाच तिसरा स्कंध झाला असे दिसते. नक्षत्रांची नांवे व त्यांच्या देवता, आश्विनी इत्यादि नक्षत्रांच्या अश्व इत्यादि क ल्पिलेल्या योनि व स्थिरचरादि कल्पित संज्ञा, तसेंच राशीशुभाशुभत्वाचें बीज. - च्या मेषादि संज्ञांवरून बोधित होणारे मेषादि प्राणी, राशींचे भौमादि स्वामि, तिथींच्या नंदादि संज्ञा व तिथींचे स्वामि, या व अशा प्रकारच्या गोष्टींवरून नक्षत्रादिकांचे कर्मविशेषीं शुभाशुभत्व मानिले आहे. उदाहरण, चर नक्षत्रांवर स्थिर कर्मे करणे अशुभ; वधूवरांची नक्षत्रे अनुक्रमें रोहिणी आणि उत्तराषाढा असतील तर त्यांच्या योनि सर्प आणि मुंगुस यांचें वैर, ह्मणून अशुभ, इत्यादि. - या मुहूतांचा लोकव्यवहाराशी अत्यंत निकट संबंध आहे. आणि तो अनादिका लापासून चालत आला आहे असे पहिल्या भागांतील अआवश्यकता नेक स्थलींच्या विवेचनावरून दिसून येईल. सांप्रत विवाहादि संस्कार तर मुहूर्तावांचून व्हावयाचेच नाहीत. घर बांधण्याचा आरंभ, नूतन गृहप्रवेश, धान्य पेरणे, कापणे, मळणे, इत्यादि कत्येही बहुधा मुहूर्तावांचून होत नाहीत. व दुसरीही पुष्कळ व्यावहारिक कृत्ये मुहूर्तानुरोधाने करणारे पुष्कळ लोक आहेत. वैदिकधर्मी लोक मात्र मुहूर्तानुसार कत्ये करितात असे नाही. तर लिंगायत, जैन, या लोकांचेही मुहूर्तावांचून क्षणभर चालत नाही. पार्शी, मुसलमान, या लोकांतही कांहीं व्यवहार मुहूर्तावर चालतात. ज्योतिषाचे ज्ञान आमच्या लोकांस थोडेंसें झाल्यावर ते वाढण्यास व आजपर्यंत ते अस्तित्वांत राहण्यास मुहूर्ताची आवश्यक ता हे एक मुख्य कारण होय. महर्तग्रंथ आणि त्यांचे कर्ते यांचा थोडासा इतिहास देऊन हा स्कंध पुरा करूं. मुहर्तविषयक ग्रंथ पुष्कळ होऊन गेले असें पुढे लिहिलेल्या मुहूर्तग्रंथांचा इतिहास. थोड्याशा इतिहासावरून दिसून येईल. त्यांत ज्यांची मला प्रत्यक्ष किंवा परंपरया थोडीबहुत माहिती आहे तेवढे मात्र एथे सागतों. रतकोश (सुमारे शक ५६०) हा लल्लाचा ग्रंथ आहे. तो मी पाहिला नाही. नयाच्या आधाराने श्रीपतीने रत्नमाला रचिली आहे, यावरून हा सांप्रतच्या महर्तग्रंथांसारखाच असेल असे दिसते. माला (सुमारे शक ९६१)--हा श्रीपतिरुत आहे. यांत मुहूर्तग्रंथांतले वर सांगितले ते मिात्र आहेत. त्यावर माधवरूत टीका आहे. या माधवाचा ११८५ आहे. याने इतर पुष्कळ ग्रंथांतली वाक्ये टीकंत दिली आहेत. नींविषयीं रत्नमालाटीकाकार माधव नक्षत्रप्रकरणांत ह्मणतो- "एता योनयः आ पत्यादियोगार्थ पूर्वाचार्यैः कल्पिताः न पारमार्थिकाः" टीकाकारानें “संहितार्थं अभिधातुं इच्छु : आह " असें झटले आहे. काल

  • याय

गमसिद्धा एव दंपत्यादियोगार्थ पर