पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/466

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणून मते दिली आहेत. उदकार्गलप्रकरण सारस्वत मुनीने सांगितलेलें प्रथम सांगून नंतर "मानवं वक्ष्ये ( मनुष्यांचे सांगतों)" असें म्हणून बरीच माहिती सांगितली आहे. वाराही संहितेतील विषयांचा शोध पुढेही चालू रहाता तर पुष्कळ उपयोग झाला असता. याविषयी पूर्वी (पृ. २१६) सांगितलेच आहे. वाराही संहितेतील सर्व किंवा बहुतेक विषयांचें ज्या एकाच ग्रंथांत किंवा निरनिराळ्या ग्रंथांत विवेचन आहे असे ग्रंथ पुढे मुळीच झाले नाहीत. मुहूर्ततत्व ग्रंथांत संक्षेपाने बहुतेक विषय आले आहेत, व ज्योतिषदर्पण ग्रंथांत ग्रहचार आहे, परंतु वराहानंतर ते विषय मुळींच लोपले असे म्हणण्यास हरकत नाही. गर्भावळी (पर्जन्यगर्भ) वगैरे दोन तीन प्रकरणांवर स्फुट विचार कांहीं ग्रंथांत व किरकोळ प्रकरणांत आढळतात व त्यांचा विचार अद्यापि कोणी करितात. परंतु त्यांत महत्वाचे फारच थोडे असतात. वास्तु प्रकरण सांप्रतच्या सर्व मुहूर्तग्रंथांत असते, त्यांत कांहीं उपयुक्त गोटी आहेत; तथापि मूळच्या हेतूचे बहुतेक विस्मरण झालें आहे. व ज्या रीतीने ते प्रकरण सांप्रतच्या ग्रंथांत आहे त्या रीतीनेही त्याचा सांप्रत घरे बांधण्यांत फारसे कोणी विचार करीत नाहीत. घराच्या लांबी रुंदीची बेरीज इत्यादिकांस अमुक संख्येने भागून अमुक बाकी राहील तर शुभ, अमुक राहील तर अशुभ, अशा प्रकारचे नियम* कोण पहातो ! परंतु याबरोबर उपयुक्त गोष्टींचाही विचार कोणी करीत नाही. गर्भाधानादि संस्कार, प्रयाण, व दुसरी व्यवहारांतील अनेक प्रकारची कृत्यं अ मुक वेळी केली असतांती लाभप्रद होतात, अशाविषयी मुहूर्तग्रंथ. कांहीं नियम कल्पिले आहेत. आणि त्याप्रमाणे निश्चित केलेल्या वेळेला मुहूर्त अशी पारिभाषिक संज्ञा पडली आहे. अशा मुहूर्ताचा विचार हैं एक पूर्वी संहिताग्रंथांचे अंग असे; परंतु पुढे संहितांतील याखेरीज इतर विषयांचा लोप होऊन मुहूर्त या अंगाचे प्राधान्य झाले. आणि पुढे मुहूर्तविषयक ग्रंथास मुहूर्त ग्रंथ असेंच ह्मणूं लागले. मुहूर्तग्रंथांतले विषय सामान्यतः असे असतातः-त्याज्य प्रकरण ह्मणून एक सामान्य प्रकरण बहुधा मुहूर्तग्रंथांत अन्यांतले विषय प सते. त्यांत कोणत्याही शुभ कत्यास वर्ण्य अशी तिथिनक्षवादिक असतात. पुढे तिथि, वार, नक्षत्रे, योग, संक्रांति, यांचे शुभाशुभत्व सामान्यतः सांगितलेले असते. पुढे गर्भाधानादि पंधरा संस्कारांच्या मुहूर्ताचा विचार असतो. त्यांत विवाहांत वधूवरांचें घटित हे एक मोठे प्रकरण असते. त्याशिवाय वास्तु, यात्रा (गमन), राज्याभिषेक, व दुसरी कांहीं किरकोळ प्रकरणे असतात. नक्षत्रप्रकरणात कांहीं ग्रंथांत दुष्टनक्षत्रजननशांति इत्यादि शांतिही असतात.

  • नक्षत्रसंबंधे शुभाशुभावरून लांबीरुंदीविषयी काही नियम बसविले आहेत. व त्यांत बरेच चातुर्य खचिलेले आढळते. मुहूर्तमार्तडांत वास्तुप्रकरणांत क्षेत्रफलादिकांचा बराच विचार आला आहे. तो एकदां मी एका जोश्यास समजवून दिला, त्यावरून मला दिसले की तो विषय फार थो. ड्या जोशांस समजत असेल. भूमिति, महत्वमापन, या विषयांची ज्यांस ओळखही नाही त्यांस तो विषय समजावा कसा?

मुहूर्तविचारांत जन्मलग्नकुंडलीचा किंवा तत्काललग्नकुंडलीचा किंवा दोन्हींचा विचार बयाच स्थली येतो. कुंडलीसंबंधे विवेचन पुढे आहे. षड्वर्गाचाही विचार विवाहादिक मुहूर्तात येतो.