पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करण आहे. हे बरेंच विस्तृत आहे. यांत घरास जागा कशी असावी, लांकडे कशी असावी, निरनिराळ्या कामाच्या उपयोगी अशी घरे कशी असावी, इत्यादि चांगली उपयुक्त माहिती आहे. यावरील टीकेंत उत्पलाने ५ नकाशे दिले आहेत. पुढे उदकार्गल यांत भूमीत उदक कोठे लागेल हा विषय मुख्यतः आहे, व त्यासंबंधे भूस्तरवियतले काही विचार आहेत. सांप्रतही विहीर खणावयाची असतां उदक कोठे लागेल हे सांगणारे काही लोक असतात असे सांगतात. पुढे वृक्षायुर्वेद प्रकरण आहे. यांत उद्भिज्जविचार चांगला आहे. पुढे प्रासादलक्षणप्रकरण आहे. पुढे वज्रलेप ह्मणून एक प्रकारचा चुना करण्याचे प्रकरण आहे. हा मयाने सांगितला आहे असें ह्मटले आहे. पुढे देवांच्या प्रतिमांचा विचार ( त्यांचा घडण्याचा प्रकार इत्यादि) आहे. पुढे वास्तुप्रतिष्ठा आहे. पुढे गाई, कुत्रे, कुक्कुट, कूर्म, अज, मनुष्य, यांची लक्षणे, स्त्रीचिन्हें, हे विषय आहेत. पुढे चामर, दंडपरीक्षा; पुढे कामशास्त्रसंबंधे कांही विषय; पुढे हिरे, मोती, पद्मराग, इत्यादिकांची परीक्षा; पुढे दीपलक्षण, दंतधावन, शकुन, यांचा विचार पुढे कुत्री, कोल्हे, यांच्या शब्दांपासून होणारे शुभाशुभ: हे विषय आहेत. पुढे मृग, हत्ती इत्यादिकांसंबंधे विचार आहे. पुढे तिथिनक्षत्रकरण यांची फलें, गोचर ग्रहांची फलं, हे विषय आहेत. संहिताग्रंथ मी विशेष पाहिले नाहीत. तथापि वराहाच्या पूर्वीच्या गर्गादि सर्व संहितांत हेच किंवा यांतले काही विषय असतात, असे दिसते. विवाहादि कृत्यांकरितां शुभकाल (मुहूर्त ) यांचा विचार संहिताग्रंथांतच असतो असे दिसते. परंतु वराहाने यात्रा आणि विवाह ह्या दोन विषयांवर निराळे ग्रंथ केल्यामुळे या ग्रंथांत ते विषय आले नाहीत, असे दिसते. वराहाने जागोजाग अमुक ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अमुक विषय सांगतो असे म्हटले आहे. त्यांत गर्ग, पराशर, असित, देवल, वृद्धगर्ग, कश्यप, भृगु,वसिष्ठ, बृहस्पति, मनु, मय, सारस्वत, ऋषिपत्र हीं नांवें आली आहेत. यावरून इतक्या संहिता वराहाच्या वेळी उपलब्ध होत्या असे दिसते. यांशिवायही कांही असतील; कारण कोठे कोठे त्यानें “अन्यान् बहून ( इतर पुष्कळ )" असे म्हटले आहे. टीकाकाराने टीकेंत या सर्व संहितांतील वचनें देऊन शिवायही पुष्कळांची दिली आहेत. त्यांत व्यास, भानुभह, विष्णुगुप्त, विष्णुचंद्र, यवन, रोम, सिद्धासन, नंदी, नग्नजित् , इत्यादिकांची आणि भद्रबाहु ग्रंथांतलीं वचर्ने आली आहेत. यांतील काही ग्रंथकार वराहाच्या पूर्वीचे व कांहीं नंतरचे असतील. वास्तुप्रकरणांत किरणारख्य तंत्रांतली व मयाची वचनें आली आहेत. वरील विषयांवरून दिसून येईल की त्यांत सांप्रतची अनेक शास्त्रे आली आहेत. त्यांचा संबंध केवळ ज्योतिःशास्त्राशींच नाहीं; तर आकाशांत घडणान्या दुसयाही चमत्कारांशी असून पृथ्वीसंबंधी अनेक सृष्टचमत्कारही त्यांत आले आहेत. आणखी व्यावहारिक विषयही आले आहेत. यांतील कांहीं विषयांचा विचार वराहाच्या पूर्वी पुष्कळ काळ झाला होता. व कांहींचा तेव्हांपासून त्याच्या वेळापर्यंत होत आला होता असे दिसते. बरेच ठिकाणी वराहाने आपली

  • यांत सारस्वताचे नांव उदकार्गल प्रकरणांत व मयाचे वास्तु व त्यासारख्या प्रकरणांत मात्र आले आहे.