पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/464

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ संहितास्कंध. ज्योतिषाच्या सर्व शाखांचें ज्यांत विवेचन आहे त्यास संहिता असें ह्मणत अस त. परंतु वराहमिहिराच्या वेळी ते लक्षण फिरलें होतें. संहिताविषय. गणित आणि होरा यांखेरीज तिसन्या शाखेस त्यावेळी संहिता ह्मणत असत. पुढे लवकरच वराहसंहितेंत जे विषय आले आहेत त्यांच्या विचाराचा लोप होऊन मुहूर्तग्रंथ हाच तिसरा स्कंध झाला. ह्याविषयी विचार पुढे करूं. प्रथम वराहाच्या संहितत काय विषय आहेत ते सांगतो. ह्मणजे संहिता या शाखेचे स्वरूप लक्षात येईल. ते विषय असेः-रवि. चंद्र, राहु आणि इतर ग्रह आणि केतु यांचे चार (गमन) आणि त्यांची फलें झणजे नक्षत्रमंडलांतून होणाया त्यांच्या गमनापासून जगतास होणारी शुभाशुभ फले यांचे कथन; अगस्ति, सप्तर्षि यांच्या उदयादिकांची फलें; इतके विषय पहिल्या १३ अध्यायांत आहेत. १४ वा कूर्माध्याय झणून आहे. त्यांत भरतखंडाचे निरनिराळे ९ विभाग कल्पून त्यांतले देश आणि त्या त्या विभागांवर अमुक नक्षत्रांचे आधिपत्य इत्यादि सांगितले आहे. पुढे नक्षत्रव्यूह आणि ग्रहांची युद्धे आणि समागम यांची फलें आहेत. संहितेत व्यतिविषयक फलें नसतात; राष्ट्रास होणारी शुभाशुभ फलें सांगितली असतात; हे पूर्वी सांगितलेच आहे. पुढें वर्षफल विचार आहे. तो काही अंशी सांप्रत पंचांगांत संवत्सरफल असते तशा प्रकारचा आहे. पुढे ग्रह शृंगाटक प्रकरण आहे. त्यात रवीजवळ किंवा एखाद्या नक्षत्राजवळ सर्व किंवा कांहीं ग्रह एका कालीं धनु, शृंग इत्यादि आकारांनी दिसले तर त्याची फलें आहेत. पुढे पर्जन्यगर्भलक्षण, गर्भधारण. वर्षण हे विषय आहेत. त्यांत मार्गशीर्षादि मासांत पर्जन्याचें गर्भधारण व त्यावरून पर्जन्यवृष्टि कशी होईल इत्यादि विवेचन आहे. या विषयाचा सांप्रतही कांहीं लोक विचार करतात, व गर्भधारणावरून वृष्टि कशी होईल हे बिनचुक सांगणारे काही लोक आढळतात, असें ह्मणतात. या प्रकरणांत पर्जन्य पडलेला मोजावा असे सांगून तो मोजण्याची रीती सांगितली आहे. पुढे रोहिणी, स्वाती, अषाढा, भाद्रपदा, यांचा चंद्राशी योग होतो त्याची फलें आहेत. पुढे सयोवर्षण, कुसुमफललक्षण, पुढे संध्या (प्रातः सायंकाळी आकाशांत दिसणारी रक्तिमा इत्यादिक) दिग्दाह, भूकंप, उल्का, परिवेष (खळे), इंद्रधनुष्य, गंधर्वनगर* (आकाशांत दिसणारें नगर ), प्रतिसूर्य, निर्घात, हे सृष्टचमत्कार आहेत. पुढे धान्यादिकांचे मूल्य, इंद्रध्वज, नीराजन हे विषय आहेत. पुढें खंजननामक पक्षाच्या दर्शनादिकांची फळे सांगितली आहेत. पुढें दिव्य, आंतरिक्ष आणि भौम असे तीन प्रकारचे उत्पात वर्णिले आहेत. पुढे मयूरचित्रकप्रकरण आहे. पुढे मुख्यतः राजांच्या उपयोगी असे पुष्यस्नान, पट्ट (मुकुट) लक्षण, खड्गलक्षण, हे विषय आहेत. पुढे वास्तुप्र

  • न्यूहालंडपासून काही मैत्गंवर समुद्रांतल्या एका गलबतावरील लोकांस न्यूहालंडमधील एक नगर आकाशांत दिसलें असें वर्तमान इ. स. १८८७ च्या सुमारास छापलें होतें. यावरून गंधर्वनगर हा विषय अगदीं खोटा नव्हे असे वाटते.