पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४६६) हिंदूंपासून आरबांनी ती घेतली असें कोलबूक म्हणतो* व मागें पृ. ३०९।१० यांत सांगितलेल्या माहितीवरून ते उघड आहे. माक्समूलरह्मणतो की, बाबिलोनिया येथून नक्षत्रपद्धति सर्वत्र पसरली. वेबरही म्हणतो की ती हिंदूंनी बाबिलोनियन किंवा खाल्डिअन लोकांपासून घेतली. परंतु माक्समुलरनें सप्रमाण सविस्तर विचार केलेला नाही.आणि हे दोघांचे मत ग्राह्य नाहीं असें व्हिटनेचे मत वर दिलेच आहे. सारांश एथे व पूर्वी पृ. १२९ मध्ये दर्शविलेल्या विचारांवरून आमच्या लोकांनी नक्षत्रपद्धति स्वतंत्रपणे स्थापिली हे निःसंशय सिद्ध होते. (११) महापात. चंद्रसूर्याच्या कांतिसाम्यास महापात ह्मणतात. सायन रविचंद्रांचा योग ६ व १२ राशि होतो, त्या सुमारास क्रांतिसाम्य होते. पहिल्यास व्यतिपात आणि दुसन्यास वैति ह्मणतात. हे क्रांतिसाम्य असते तेव्हां शुभकर्म वज्यं आहेत. यामुळे सर्व ग. णितग्रंथांत याचे गणित असते. गणेशदेवज्ञाने ग्रहलाघवांत याचे गणित देऊन शिवाय सुलभरीतीने त्याची वेळा काढण्याकरितां पातसारणी ह्मणून एक स्वतंत्र लहानसा ग्रंथ केला आहे. एथवर गणितस्कंधाचा विचार झाला. आतां इतर स्कंधांचा विचार करूं. * Algebra Intro. p. XX II. ऋग्वेद पु. १ प्रस्तावना. History of Indian Literature p. 2 No te2, and p. 247. 'मानि विल्यम्स याने नक्षत्रपदात मूळची हिंदूंची असें प्रथम मटले आहे, परंतु पुढे व्हिटनेच्या विचारापुढे दिपून जाउन त्याचे मत देउन त्यास मान्यता दाखविली आहे. ( Indian Wisdom p. 183 and Note 2.). यांत स्वतः विचार करण्याचे सामर्थ्य नाहीं असें मात्र त्याने दाखविलें आहे.