पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असावा."खाल्डियन लोकांत नक्षत्रपद्धति होती की काय याविषयीं तो म्हणतो की, "वेबर म्हणतो की बायबलांतील मझलाथ ( Mazzaloth ) आणि मझराथ ( Mazzaroth ) हे शब्द (जाब ३८.३२, राजे २३.५) आरब लोकांच्या नक्षत्रवाचक मांझल (Manzil) शब्दाशीं सदृश आहेत. यावरून पाश्चात्य सेमिटिक लोकांत नक्षत्रपद्धति असावी, आणि ती खाल्डियन लोकांनी काढली असावी.परंतु पूर्वोत उल्लेख इतका अप्रसिद्ध आणि संशयित आहे की, तो त्या पद्धतीच्या अस्तित्वाबद्दल प्रमाण मानतां येत नाही.आणखी असे की,ती पद्धति इतक्या प्राचीनकालीं इतक्या पश्चिमेस त्यांत विशेषतः खाल्डियन ज्योतिःशास्त्रांत असेल तर ग्रीक लोक तिजविषयी काहींच सांगत नाहीत, ह्मणून या गोष्टीवर भरंवसाच बसत नाही. तेव्हां ज्या सेमिटिक किंवा इराणी लोकांच्या द्वारे चिनी पद्धति हिंदुस्थानांत आली असें व्हिटने ह्मणतो,ते खाल्डियन किंवा पार्शी नव्हत. आणि दुसऱ्या कोणा सेमिटिक किंवा इराणी लोकांत नक्षत्रपद्धति प्राचीन काली होती व आतांपर्यंत चालत आली आहे असें प्रसिद्ध नाही. तेव्हां व्हिटनेने आणलेले मध्यस्थ सेमिटिक किंवा इराणी यांचा सांप्रत मागमूसही नाहीं असें त्याच्याच तोंडून झालें. इ. स. पूर्वी 1१०० पर्यंत चिनी पद्धतींत २४ मात्र तारा होत्या. यामुळे त्यापूर्वी चिनी पद्धति हिंदुस्थानांत आली असे व्हिटने आणि बायो यांस ह्मणतांच येत नाही. हिंदु पद्धतींत अभिजित् नक्षत्र होते ते इ. स. ९७२ मध्ये कमी झाले असें बायो झणतो. ह्मणज तोपर्यंत २८ नक्षत्रांची चिनी पद्धति चालू होती असें तो दशवितो. परंतु त्याच्यापूर्वी पुष्कळ काळ हिंदूंनी गणितांत २७ नक्षत्रे घेतली आहेत आणि तैत्तिरीय संहितेंत २७ मात्र नक्षत्रे आहेत असे दाखवून व्हिटनेनेच परभार बायोचें खंडन केले आहे. असो; या सर्व विवेचनावरून आमच्या लोकांनी नक्षत्रपद्धति चिनीलोकांपासून घेतली हे बायो आणि व्हिटने यांचे मणणे अगदी त्याज्य होय. वेबरही ह्मणतो की, “हिंदूंनी नक्षत्र पद्धति चिनीलोकांपासून घेतली हे झणणे मान्य करता येत नाही.*" सर विल्यम जोन्स याने आरबी आणि हिंदु नक्षत्रपद्धतींची तुलना केली आहे. परंतु “ती अपुरती आणि स्थूल आहे, आणि तीवरून काढलेलीं अनुमाने विश्वसनीय किंवा महत्वाची नाहीत' असे व्हिटने ह्मणतो. आणि जोन्सने ती तुलना केवळ नक्षत्रांसंबंधे केलेली नाही; नक्षत्रराशींसंबंधे केलेली आहे. आणि त्याचे मत हिंदुलोकांनी नक्षत्रराशिपद्धति ग्रीक लोकांपासून घेतली नाहीं, खाल्डियन लोकांपासून घेतली असें आहे. खाल्डियन लोकांत नक्षत्रपद्धति नव्हती असें व्हिटनेचे मत वर दिलेच आहे. आरब आणि हिंदु यांच्या नक्षत्रराशिपद्धतींची तुलना कोलकनें बरीच सविस्तर केली आहे. परंतु आरबांपा-सून हिंदूंनी ती पद्धत घेतली असे त्याचेही मत नाही व दुसरे कोणाचेही नाही.

  • History of Indian Literature, p. 247.

एशियाटिक रिसर्चेस पु. २ इ. स. १७९०. + सू. सि. भा. पृ. १००. ऐशि. रिस. पु. ९इ.स. १८०७