पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४६४) विल्या होत्या. त्या ठरविण्यांत त्यांचे विषुववृत्ताशी सान्निध्य या गोष्टीकडे मुख्य लक्ष्य दिलं होते; मग त्या फार तेजस्वी असोत किंवा नसोत, दिसल्या म्हणजे झालें. त्या प्रत्येकास सियू (Sien) म्हणतात. त्या चोविसांत मागाहून मघा, विशाखा, श्रवण आणि भरणी यांतील चार तारा च्यकांग या राजाचे वेळी इ. स. पूर्वी १००० या सुमारास जोडल्या." बायो याच्या विवेचनांत चिनी नक्षत्रांचा जितका विचार आहे तितका हिंदूच्यांचा नाही. व्हिटनेने चिनी, आरबी आणि हिंदु या तीनही पद्धतींचे सविस्तर विवेचन करून तुलना केली आहे.तीनही पद्धतींत कांही गोष्टींचे साम्य आहे, काहींचें वैषम्य आहे. यामुळे व्हिटने यास प्रथमतः असें अनुमान काढणे भाग पडले की “तिहींमध्ये एकही नक्षत्रपद्धति अशी नाहीं की जी इतर दोहोंपैकी कोणतीही साक्षात मूळ मानितां येईल." असे असूनही पुढें तो ह्मणतो की “इ० स० पूर्वी ११०० यावेळी किंवा त्यानंतर लवकरच चिनी नक्षत्रपद्धति पश्चिम एशियांत गेली. तेथे सेमिटिक अथवा इराणी या दोन राष्ट्रांपैकी कोणी तरी ती स्वीकारिली. त्यांणी तीत, कमी कुशलतेच्या आणि चांगल्या शास्त्रीय पद्धतीस विशेष अनुसरून नाहीं अशा वेधपद्धतीस उपयोगी अमा फेर केला.तो असा की क्रांतिवृत्ताच्या प्रदेशांतील ग्रहगतीस अनुसरून त्यांनी चिनी मू' ही एक तारा होती त्याबद्दल पुंज कल्पिले आणि काहींची स्थाने बदलली. आणि अशा स्थितीत ती पद्धति आणि तिजबरोबरच बहुधा ग्रहांचे ज्ञान हिंदुस्थानांत आले आणि त्या च सेमिटिक आणि इराणी लोकांपासून ती नक्षत्रपद्धति शेवटी आरबांनी घेतली." आमां भारतीयांची नक्षत्रपद्धति केवळ दृष्टिवेधाने सिद्ध झालेली आहे, आणि चिनी लोकांची यंत्रवेधाकरतां सिद्ध केलेली आहे. आमच्या नक्षत्रांपैकीं रोहिणी, पुनर्वसु, मघा, पूर्वोत्तर फल्गुनी, स्वाती, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, अभिजित, श्रवण, यांच्या योगतारा चांगल्या ठळक ह्मणजे पहिल्या किंवा दुसन्या (कचित् तिस-या) प्रतीच्या आहेत; परंतु चिनीलोकांनी त्या न घेता त्या नक्षत्रांच्या तारा दुसऱ्याच अगदी कमी तेजस्वी स्वीकारल्या आहेत.* कारण त्या त्यांस वेधोपयोगी होत्या. सारांश भारती पद्धति नैसर्गिक आहे; चिनी पद्धति कृत्रिम आहे. असे असून, चिनीलोकांपासून हिंदूंनी नक्षत्रपद्धति साक्षात् घेतली असें ह्मणतां येईना, तेव्हा ज्या इराणी किंवा सेमिटिक लोकांच्या नक्षत्रपद्धतीचा सांप्रत मागमूसही नाही, अशा कोणत्या तरी सेमिटिक किंवा इराणी लोकांच्या हाती चिनी पद्धति देऊन, आणि तेथे तिला अधिक अडाणी रूप घ्यावयास लावून, ह्मणजे सृष्टिकमांतील सुधारणाक्रमाचा विपर्यास करण्यास लावून, त्यांच्या द्वारे व्हिटनेने ती पद्धति हिंदुस्थानांत आणिली. यावरून व्हिटनेच्या ह्मणण्याची योग्यता दिसून येईल. पार्शी लोकांत नक्षत्रपद्धति होती; परंतु तिजविषयी व्हिटनेच ह्मणतो की, झेंदावेस्ता ग्रंथांत ती अद्यापि कोणी दाखविली नाही. बुंदेहेश नामक ग्रंथाच्या दुस-या भागांत नक्षत्रांची संख्या (२८) आणि त्यांची नांवें मात्र आहेत. याहून तिजविषयीं ज्यास्त माहिती काही नाही. आणि तो ग्रंथही फार प्राचीन नाही. सासनिअन बादशहांच्या कारकीर्दीत इराण देश स्वतंत्र झाला त्यावेळचा (इ. सनाच्या .बर्जेस सू. सि. भा. पृ. ३२४ पहा.