पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नक्ष आहे, यावरून वरील “खौ” इत्यादि वचनें आणि पूर्वोक्त वैदिकास माहित असलेली नक्षत्रे गणेश दैवज्ञापासून परंपरेनं आली असावी असे दिसते.* चिनी, पार्शी आणि अरब या लोकांत नक्षत्रपद्धति होती. तर नक्षत्रपद्धति पर हिंदुलोकांनी स्वतंत्रपणे काढली की दुसन्या राष्ट्रापासून घेत ली अशी शंका घेऊन तिला युरोपियन विद्वान् बरेंच महल देतात. परंतु तितकें या गोष्टीचे महत्व मला वाटत नाही. कारण, संपूर्ण ज्योतिषगणितपद्धति भारतीयांनी स्वतंत्रपणे काढली की दुसन्यापासून घेतली या महत्वाच्या गोष्टीचा निर्णय केवळ नक्षत्रपद्धति मूळची कोणाची या निणयावर विशेष अवलंबून नाही. आज नक्षत्रज्ञान झाले की उद्यां ग्रहज्ञान झालेच पाहिजे, एका राष्ट्राने नक्षत्रपद्धति स्थापिली तर ग्रहगतिपद्धति त्यानेच स्थापिली पाहिजे, किंवा एकानें नक्षत्रपद्धति दुसन्यापासून घेतली तर त्या वेणारास ग्रहपद्धति स्वतंत्रपणे समजणार नाही, असे काही नाही. नक्षवपद्धति मूळची हिंदूंची नव्हे असे वेबर नामक जर्मन विद्वान् ह्मणतो. ती चिनी लोकांनी स्थापिली व त्यांपासून हिंदूंनी घेवली असें एम् बायो नामक फ्रेंच विद्वान् आग्रहाने प्रतिपादितो, आणि तदनुसार व्हिटनेही ह्मणतो की ती मूळची हिंदूंची नव्हे. परंतु चिनीलोकांचे नक्षत्रज्ञान आरंभीं जें होते त्याहून जास्त ज्ञान ज्योतिषाचे त्यांस झाले नाहीं. ग्रहगति आणि अयनचलन या महत्वाच्या गोष्टींचा त्यांनी मुळींच विचार केला नाही, असें बायो आणि व्हिटने कबूल करितात. आमच्या लोकांनी नक्षत्रपद्धति स्वतंत्रपणें स्थापिली आहे. चिनीलोकांनी स्वतंत्रपणे आपली काढली असेल; परंतु आमच्या लोकांनी ती त्यांजपासून घेतली नाही हैं खचित. याबद्दल विवेचन मागें (पृ. १२९ ) केलेच आहे. एथें विस्तर करण्याचे कारण नाही. परंतु युरोपियनांचें मणणे थोडक्यांत पाहूं. चिनीलोकांच्या केवळ नक्षत्रपद्धतीचा आणि तत्संबंधे हिंदु नक्षत्रपद्धतीचा सविस्तर विचार बायो ह्याने इ.स.१८४०, १८४५ व १८५९ मध्ये एका फ्रेंच मासिक पुस्तकांत केला आहे. त्याच्या ह्मणण्याचें तात्पर्य असे आहे की, “चिनीलोकांची वेधयंत्रे व वेधपद्धति चांगली होती आणि त्यांचें सांप्रतच्या युरोपियन पद्धतीशी साम्य आहे. त्यांजपाशी याम्योत्तरलंघनयंत्र आणि कालसाधनार्थ घटिका (Clepsydra ) होती. त्यांनी वार,च्या याम्योत्तरलंघनवेधावरून त्यांचे विषुवांश आणि कात ठरविली होती. आणि त्याकरतां व वेधांत कालसंबंधे चूक पडेल तर दुरुस्त करण्याकरितां विषववृत्ताच्या आसपासच्या २४ तारा त्यांनी इ. स. पूर्वी २३५७ च्या सुमारास ठर

  • त्या वैदिकाने नक्षत्र मला दाखविली, त्यांत रेवती आणि विशाखा ही चुकली होती. त्यांत रेवती नक्षत्र जे दाखविलें तेंच ज. बा. मोडकांस रत्नागिरी एथील एका चांगल्या जोश्याने दात. विले होते. धळे एथील एका चांगल्या जोश्याच्या मतेही रेवती नक्षत्र तच होते. परस्परांजी संबंध नाही अशा तीन ठिकाणी ही चुकी कशी शिरली न कळे. परतु ता गणेशाची असण्या संभव नाही. माझ्या ज्योतिर्विलास पुस्तकांत नक्षत्रांचे वर्णन आहे, त्यावरून कोणाच्या मदतीवांच नही नक्षत्रांची ओळख करून घेता येईल

नया कलमांत बायो आणि व्हिटने यांचं झणणे दिले आहे त बजसच सूर्यसिद्धांताचें भाल पृ. १८०, २०० पासून २०९ ब ३२४ यांतले आहे. +Journal des gavants. हा काल त्या तारांचा आरंभ कृत्तिकांपासून आहे यावरून गणिताने काढिलेला, चिनी ग्रंथांत दिलेला नाही.