पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/459

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नक्षत्रांच (४६२) आणि टीकाकार यांच्या कालावरून (पृ. ३५१ पहा.) टालमीचे होय. यावरून मुसलमानांच्या द्वारे ते या देशांत आले होते असे दिसते. परंतु त्याचा पुढे प्रसार किंवा उपयोग झाल्याचे दिसत नाहीं. सांप्रत नक्षत्रांच्या योगतारा राहोत, परंतु सर्व नक्षत्रे तरी दाखविणारे जोशी ब हुधा आढळत नाहींत. कोलब्रक ह्मणतो की, नक्षत्रांपैकी . कांहीं नक्षत्रे हिंदु ज्योतिष्यांनी आमांस दाखविली; परंतु कांहीं त्यांस दाखवितां आली नाहीत. बेरुणी ह्मणतो* की “या कामी मी फार परिश्रम केले. परंतु नक्षत्रांच्या योगतारा डोळ्यांनी पाहून आकाशांत बोटाने दाखविणारा एकही ज्योतिषी मला आढळला नाही.' सांप्रतही योगतारा दाखविणारा जोशी क्वचित् आढळेल. पुष्कळ जोशी असे आहेत की त्यांस सामान्यतः नुसती नक्षत्रेही दाखवितां येत नाहीत. पत्रिका करण्यांत व मुहूर्त पाहण्यांत चांगला निपुण परंतु आकाशांत अश्विन्यादि नक्षत्रे कमाने पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत असें ज्यास माहित नाहीं, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहेत अशी ज्याची समजूत, असा एक जोशी मला आढळला होता. तथापि बहुतेक नक्षत्रे दाखविणारे काही लोक आढळतात. कुलाबा जिल्ह्यांतील चौल एथील फफे उपनांवाचा एक वैदिक बार ह्मण मला भेटला होता, त्यास सगळी नक्षत्रे ठाऊक होती. त्याने मध्यान्हवृत्तावर कोणतें नक्षत्र आले आहे ते पाहून त्यावरून रात्रिमान काढण्याचा एक श्लोक मला सांगितला, तो फार उपयोगी आहे ह्मणून एथे देतोंः खौ ख जा जी ग चु गै चो छो भू १ युक् ।। १०२११२ १२८ १४० १५३ १५६ १८३ १९६ १९७ छ खि जी कु चू छे को द्वि २ युक् ॥ २१७ २३२ २४० २५१ २६६ २७७ २९१ ङ ख छा ङी कु घु त्रि ३ युक् ॥ ख जा कु चू घे घो ३०५ ३१२ ३२७ ३४५ ३५१ ३५४ . १२ २८ ५१६६७४ ९४ अश्विनी नक्षत्र मध्यान्हवृत्तावर असतां त्या वेळी १०२ अंश हे लग्न असते (कर्कलग्नाचे १२ अंश झाले असतान ), याप्रमाणे २८ नक्षत्रांच्या प्राग्लग्नाचे अंश यांत आहेत. लग्नावरून इष्टकाल आणण्याच्या रीतीनं काल आणावा. या वचनांत द्वितीयार्यसिद्धांतांतला (पृ. २३२) कटपयादि वर्णांचा संख्यासंकेत असून आणखी अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, हे स्वर १ पासून ९ पर्यंत अंक आणि . यांचे वाचक असा संकेत आहे. या वचनांच्याच अथांचे गणेशदैवज्ञकत तीन श्लोक मुहूर्तसिंधु ग्रंथांत दिले आहेत. त्यांत अंशांच्या संख्या नेहमीच्या पद्धतीने आहेत, आणि ४ पलभा जेथें असेल तेथचे हे लग्नांश, इतरत्र कांहीं कमजास्त होतात असे सांगितले आहे. यावरून आणि चौलगांव गणेशदैवज्ञाच्या नांदगांवापासून जवळच

  • India, II. p. 83.

त्यांत चित्रांचे अंश २६३ आणि शततारकांचे ६१ आहेत. वरील वचनांत या. ठिकाणी च आण कु भी अक्षरे आहेत ती गू आणि कूअसतील तर दोहोंचा मेळ पडेल.