पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिषयी सर्वांचे एक मत आहे. इतरांविषयी मतभेद आहे. त्यांत कोणाचे मत बरें हैं पाहण्यांत अर्थ नाही. कारण आमच्या ग्रंथांत जे शरभोग आहेत ते वरील कोष्टकांत दिलेल्या कोणाच्या सर्व किंवा काही तारांशी सर्वांशी जमतात असें मुळीच नाही. मग आमच्या ग्रंथांतील शरभोग मूक्ष्मपणे काढलेले नसतील ह्मणून ते न जमोत किंवा ते कोणत्या कालचे हे बरोबर ठाऊक नसल्यामुळे, आणि प्राचीन कालचे शरभोग सूक्ष्मपणे काढण्याची आतां बसविलेली रीति अगदी सूक्ष्म असेरुच असें खात्रीने ह्मणतां येत नाही, व त्या रीतीने ते काढले आहेत यामुळे न जमोत. जमत नाहीत हे खरे. तेव्हां ज्या तारांचे जवळ जवळ जमतील त्या योगतारा ठरवावयाच्या. एका नक्षत्राच्या २।३ तारा असल्या तर त्यांतल्या एकीचा शर बराच जमला तर तिचा भोग जमत नाहीं, दुसरीचाच भोग जमतो, असें होते. यामुळे कोणी शर जमण्याकडे लक्ष्य दिले आहे आणि कोणी भोगाकडे दिले आहे, कोणी योगतारांच्या दिशांकडे दिले आहे. यामुळे प्रत्येकाच्या मतास कांहीं आधार आहेच. अमुक नक्षत्र झणजे सांप्रतचा अमुक पुंज, उदाहरणार्थ, भरणी म्हणजे युरोपियनांचा मस्का, असें ठरल्यावर त्यांतील योगतारा कोणती हे वादग्रस्त राहणे साहजिक आहे. त्या पुंजाच्या बाहेरची तारा कोणी मानली तर तिला आधार नसेल तर मात्र ती चूक आहे. उदाहरणार्थ, मृग आणि त्याचे शीर्ष म्हणूनतारकापुंज आकाशांत दिसतो किंवा मानतात. मृगशीर्षाची योगतारा मृगाच्या शीर्षस्थानी ज्या तीन तारा आहेत त्यांतील कोणती तरी असली पाहिजे. परंतु केरोपंतांची त्याच्या बाहेर आहे. ही अर्थात चूक होय. मूळाची आरुति सर्व ग्रंथांत सिंह पुच्छासारखी सांगितली आहे. तिच्या फारच बाहेर केतकरांची मूल तारा राहते, झणून ती चुकीची होय. केरोपती ग्रहसाधन कोष्टकांत मूळाची क्रांति ३७ अंशाबद्दल चुकून २७ पडली आहे, यामुळे केतकरांची ही चूक झालेली दिसते. असो, एकंदरीत प्रत्येकाचे मत बरोबरच आहे. तारांचे वेध घेऊन त्यांचे भोगशर यांचे पत्रक (क्याटलाग ) युरोपांत हिपार्क स (इ. स. पू. १५०) याने प्रथम केलें. तें सांप्रत उपलतासाल्यातपनकब्ध नाही, परंतु त्यांतच अयनगतपिरता फेरफार करून टालमाने पत्रक केलें (इ० स० १३०) तें सांप्रत त्याच्या सिंटाक्सिस ग्रंथांत उपलब्ध आहे. त्यांत १०२२ तारा आहेत. त्यांचे ४८ राशि केले आहेत. यानंतर दुसरें पत्रक तैमूरलंगाचा नातु उलगबग, समरकंदचा बादशाहा, यार्ने इ० स० १४३७ मध्ये केले. त्यांत १०१९ तारा आहेत. त्यानंतर टैकोब्राहे याचे पत्रक इ.स. १६०० या वर्षीचे ७७७ तारांचे आहे. त्यानंतर युरोपांत पुष्कळ सूक्ष्म पत्रके झाली. आमच्या देशांत वेध घेऊन असें पत्रक कोणी केल्याचे दिसत नाही. महेंद्रसरि ह्याने यंत्रराज ग्रंथांत यवनागमावरून ३२ तारांचे ध्रुवक आणि शर दिले आहेत. त्या ग्रंथाचा टीकाकार मलयेंदुमूरि ह्मणतोः शकमतेन नक्षत्रगोले नक्षत्राणां द्वाविंशत्यधिकसहल २०२२ मुक्तमस्ति । तन्मध्ये ग्रंथकारेण यावनं नक्षत्रगोलं सम्यग् बुध्वा यंत्रोपयोगीनि द्वात्रिंशत् नक्षत्राणि गृहीतानि । अध्याय १ श्लोक २१-३८ टीका. याँत लिहिलेले नक्षत्रपत्रक, त्यांतील १०२२ ह्या नक्षत्रसंख्येवरून आणि ग्रंथकार