पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/457

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म जोन्स याने केला आहे (इ० स० १७९०), परंतु तो अपुरता आहे. कोलकचा याविषयी निबंध एशियाटिक रिसर्चेस पु. ९ सन १८०७ यांत छापला आहे. त्यावरून कोलबूक यास संमत असलेल्या तारा वरील कोष्टकांत दिल्या आहेत. इतरांच्या शोधास कोलकच्या प्रयत्नाचा मोठा उपयोग झाला. बेंटली याने केलेले A Historical view of Indian Astronomy ह्या नांवाचे पुस्तक इ. १८२३ मध्ये कलकत्ता एथे छापले आहे, त्यांत त्याने ब्रह्मगुप्तोक्त शरभोगांवरून तारांचा विचार केला आहे. त्यावरून वरील कोष्टकांतल्या त्याच्या मताच्या योगतारा दिल्या आहेत. त्यांत उत्तराभाद्रपदांची तारा त्याने अल्जेनिब मात्र दिली आहे. केरोपंतांनी ती न घेतां आल्फेराट दिली आहे. हीशिवाय केरोपंतांनी सर्व तारा बटलीच्याच घेतल्या आहेत. वर दिलेल्यांशिवाय बेंटलीने विकल्पानें कांहीं दुसन्या तारा दिल्या आहेत त्या अशाः-अश्विनी ग्यामा परिस; मृग ११३, ११७ टारा; आश्रेषा ५० कांकी; पूर्वफल्गुनी ७१ लिओ; हस्त ८ काहीं; मूल ३५ स्कार्पिओ. व्हिटने याने या विषयाचा फार सविस्तर विचार केला आहे; आणि यागतारा पुष्कळ विचार करून ठरविल्या आहेत. वाणूदेव यांनी आपल्या सूर्यसिद्धांताच्या इंग्लिश भाषांतरांत योगतारा दिल्या आहेत त्यांवरून वरील कोष्टकांत दिल्या आहेत. त्या सर्व कोलबकला अनुसरून आहेत. परंतु आपल्या पंचांगात त्याना ७ तारांत फरक केला आहे. ह्मणजे आश्विनी, आश्लेषा, विशाखा, मूल, उत्तराषाढा, धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा यांच्या पहिल्या तारा सोडून त्याबद्दल बीटा एरैटीस, एसिलान हैडी, २४ (आयोटा ) लिबा, लांबडा स्का सिग्मासाजिटेरी, बीटा डेल्फिनी, ग्यामा पिगासी, ह्या तारा घेतात. आणि हा सव फेरफार व्हिटनेच्या मतास अनुसरून आहे हे सहज दिसते. वेंकटेश बापूजा कत कर यांना त्यांच्या मते ज्या योगतारा त्या मला कळविल्या त्यावरून त्या दिल्या आहेत. कोलब्रक इत्यादिकांनी मानिलेल्या योगतारांचे शरभोग आमच्या ग्रंथात ल्या योगतारांच्या शरभोगांशी मिळतील तितके मिळविण्याकडे त्यांनी लक्ष दिल आहे; परंतु मी ती गोष्ट व योगतारांमध्ये १३ अं० २० कला याच्या जवळ जवळ अंतर असावें व तेणेकरून त्या आपापल्या विभागांत असाव्या या दोहाकड मुख्यत्वे लक्ष दिले आहे. आर्द्रा नक्षत्राची तारा मृगपुंजांतली मानणे ठीक नाही. आईया रुद्रः प्रथमान एति ॥ ० ब्रा० ३.१.१. या वाक्यांत आईबरोबर रुद्र येतो असें आहे. व्याधतारा हा रुद्र होय. मी मानिलेली आर्द्रा व्याधाच्या अगोदर फक्त ९ मिनिटें मध्यान्हीं येते. तिजहून व्याधाला अवळ अशी तेजस्वी तारा त्या प्रदेशांत दुसरी नाही. वरील कोष्टकावरून दिसेल की कृत्तिका,रोहिणी, पुनर्वसु, पुष्य,मघा, उत्तराफल्गुनी, चित्रा, स्वाती, ज्येष्ठा, अभिजित्, श्रवण, शतभिषक, पूर्वाभाद्रपदा,रेवती, या१४तारां

  • ग्रह साधन कोष्टकें पृ. ३२४१५. । सू. सि. भाषांतर पृ. १७५-२२०. + बिब्लिओथिका इंडिका न्यू सिरीस, सन १८६०. यांत त्यांनी भरणीबद्दल मस्का झटलें आहे. परंतु पंचांगांत ते त्यापैकी ३५ एरौटिस घेतात ह्मणून तीच मी दिली आहे. ६ छापतांना कृत्तिकातारा ईटा टारीबद्दल पी टारी चुकून पडली असे दिसते.