पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५०) उणि कृष्णपक्षी सूर्योदयाचे सुमारास, त्यांतही विशेषतः शुक्ल प्रतिपदेस किंवा द्वितीयेस, चंद्रदर्शन होते त्यावेळी चंद्रशृंगाचा कोणत्या दिशेचा भाग उंच दिसेल आ. णि चंद्रबिंबाचा कितवा भाग प्रकाशित दिसेल, हे काढणे हा विषय या अधिकारांत असतो. संहिताग्रंथांत चंद्रशृंगोन्नतीपासून होणाऱ्या फलांचा पुष्कळ विचार केलेला असतो. सूर्याच्या योगाने चंद्र प्रकाशित होतो यामुळे चंद्राच्या ज्या बाजूस सूर्य असेल त्याप्रमाणे चंद्राची शृंगोन्नति दिसेल. अर्थात् तिच्याशी पृथ्वीवरील शुभाशुभ गोष्टींचा संबंध नाही. परंतु वास्तविक कारणांचे ज्ञान होण्यापूर्वी तशी समजूत होणे साहजिक आहे. (९) ग्रहयुति. दोन ग्रह अगदी परस्परांजवळ आले असता त्यांची युति ह्मणजे योग झाला असें ह्मणतात. त्या वेळी त्यांचे पूर्वपश्चिम अंतर शून्य झाले पाहिजे. तें शून्य असले तरी त्या वेळी त्यांमध्ये दक्षिणोत्तर अंतर अमूं शकतें, आणि ते त्यांच्या शराप्रमाणे कमजास्त असते. युतिकाली दोन ग्रहांच्या किरणांचे मिश्रण झाले किंवा त्यांचे उचर दक्षिण अंतर एक अंशाहून कमी असले झणजे त्यांचे युद्ध झाले, आणि एक अंशाहून जास्त अंतर असले तर समागम झाला असें ह्मणतात ग्रहबिंबांचा नुसना स्पर्श झाला ह्मणजे उल्लेख ह्मणतात, आणि बिंबें एकमेकांत मिळालीं ह्मणजे त्यास भेद ह्मणतात. भेदादिकांची फलें संहितादि ग्रंथांत पुष्कळ सांगितली असतात. भेदाचें लक्षण आणि त्याचे गणित ही आमच्या ग्रंथांत आहेत; तरी शुक्र कधी कधीं सूर्यबिंबाचा भेद करितो हे आमच्या लोकांस माहित होते की नाही हे समजत नाही. (पृ. २८८ पहा.) (१०) भग्रहयुति. या अधिकारांत नक्षत्रयोगतारा आणि ग्रह यांच्या युतींचे गणित असते आणि त्याकरितां योगतारांचे आणि दुसऱ्या कांहीं तारांचे ध्रुव नक्षत्रभोगशर. (भोग) आणि शर दिलेले असतात. भोग दिलेले असतात ते बहुतेक ग्रंथांत अयनकर्मसंस्कृत असतात. ह्मणजे " तारेपासून विषुववृत्तावर काढलेलालंब क्रांतिवृत्तास ज्या बिंदूत छेदील त्या बिंदूचे आरंभस्थानापासून जें अंतर तो भोग आणि तारेपासून अंतर तो शर" अशा लक्षणाचे असतात. या शरभोगांस ध्रुवाभिमुख अशी संज्ञा देऊ कांहीं ग्रंथांत भोगशर असतात ते “तारेपासून कांतिवृत्तावर टाकिलेला लंब त्यास जेथे छेदील त्या बिंदूचे आरंभस्थानापासून जें अंतर तो भोग आणि तो लंब हा शर" अशा अर्थाचे असतात. क्रांतिवृत्ताच्या ध्रुवास कदंब अशीही संज्ञा आहे. म्हणून ह्या शरभोगांस कदंबाभिमुख अशी संज्ञा देऊ. पुढे पृ. ४५२।५३ वरील कोष्टकांत ६ ग्रंथांतले ध्रुवाभिमुख शरभोग दिले आहेत. तसेंच नक्षत्रांच्या ज्या योगतारा माना व्या असें मी ठरविले आहे त्यांचेही ध्रुवाभिमुख शरभोग त्यांत दिले आहेत. अयन गतीमुळे अयनदृक्कमसंस्कार नेहमी सार

  • सायनपंचांगांत युति देण्यास ह्याच तारा शक १८१५ पासून घेतो. निरनिराळ्या शोधकांस संमत अशा योगतारांची युरोपियन नाव पुढे कोष्टकांत दिली आहेत ती पहा.