पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४९) ला तरी तो दिसणार नाही. ह्मणजे त्याचा उदय होणार नाही, बरेच दिवसांनी मागाहून होईल. शुक्रक्रांति उत्तर असेल तर या देशांत त्याचा नित्योदय मर्यापूर्वी ३२ मिनिटें झाला तर त्या दिवशी इंग्लंडांत त्याचा नित्योदय ३२ हून जास्त मिनिटांनी पूर्वी होईल. झणजे केवळ कालांशांप्रमाणे पाहिले तर इंग्लंडांत त्याचा उदय काही दिवस अगोदर झाला पाहिजे. परंतु अनुभव तर याच्या उलट येईल. एकाच स्थली देखील ग्रहाचे कालांश सारखे असले तरी त्याची क्रांति दक्षिणोत्तर असेल त्याप्रमाणे उन्नतांश कमजास्त होतील. त्यांत फार भेद मात्र पडणार नाहीं. असो; सारांश इतका की अस्तोदयाचे कालांश, स्थल जसे जसें विषुववृत्तापासून जास्त उत्तरेस तसे तसे जास्त पाहिजेत आणि कालांशापेक्षां उन्नतांशांवरून उदयास्ताचे नियम ठरविणे चांगले. उन्नतांशसंबंधे विचार वर लिहिला आहे त्यावरून आणि बार्शी एथे (अक्षाश१८1१३) मी जो अनुभव घेतला आहे त्यावरून मला खात्री वाटते की आमच्या ग्रंथांतले कालांश आमच्याच देशांत ठरविलेले आहेत. टालमीचे कालांश पाहिले असतां सहज दिसते की त्याचा आमच्या ग्रंथांशी काही संबंध नाही. उलटे टालमीच्या कालांशांविषयी मी असें ह्मणूं शकतों की त्याने ते स्वानुभवाने दिले नाहीत, किंवा अनुभवाने लिहिले असल्यास त्याची ग्रहस्थिति चुकीची होती, किंवा दुसरी कांहीं तरी त्याची चुकी होती. १८ अक्षांशांवर मंगळ, बुध, शुक्र यांचे कालांश १६, १२, ८ यांहून कमी येत नाहीत. तेव्हां अलेक्झांड्रिया (अक्षांश ३३।१३) एथे यांहून जास्त असलेच पाहिजेत. तेव्हां टालमीने दिलेले मंगळ, बुध, शुक्र यांचे कालांश १४३, ११३, ५३ हे फार चुकीचे आहेत. स्थलविशेषाचे उदयास्ताचे कालांश किंवा उन्नतांश सूक्ष्मतः निश्चित करता येतील. ते केले तरी चंद्रप्रकाश, क्षितिजाजवळ कधी कधी दिसणारा रक्तिमा, आणि पाहणाराची मंदसूक्ष्मदृष्टि, यांच्या योगानें कालांशाच्या अनुभवांत फरक पडेल. शिवाय मेघांचा प्रतिबंध निराळा. तेव्हां आमच्या धर्मशास्त्रकारांनी गणितागत उदयास्तदिवसानंतर व पूर्वी ग्रहांच्या बाल्यवृद्धावस्थेचे काही दिवस सोडण्यास सांगितले आहे ते योग्य आहे. स्वानुभवावरून सायनपंचांगांत हल्ली जे कालांश घेतों ते वरील कोष्टकांत दिले आहेत. बुधाचा अस्तोदय 11 कालांशांनी गुरूचा १०नी आणि शुक्राचा ७॥॥ नींही कधी कधी होतो असा गो० ब० भिडे यांचा हेदवी (अक्षांश १९२०) एथील अनुभव आहे. (८) शृंगोन्नति. शुक्लपक्षाच्या पूर्वार्धी व कृष्णपक्षाच्या उत्तराधी चंद्राचा थोडाच भाग प्रकाशित दिसतो; त्यास शृंग अथवा कोर ह्मणतात. शुक्लपक्षी सूर्यास्ताच्या सुमारास आ

  • सूक्ष्मदृष्टि मनुष्यास आज उदय दिसला तरी मददृष्टि मनुष्यास मागाहून तीनचार दिवसही दिसत नाही, असे अनुभवास आले आहे. ग्रह आणि सूर्य यांच्या गतीचे अंतर थोडे असते तेव्हां उदयास्तांत जास्त चक पडते.