पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/448

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५) खा असत नाही. यामुळे ध्रुवाभिमुख नक्षत्रध्रुव नेहमी सारखा असणार नाही. सहा ग्रंथांतले नक्षत्रध्रुव दिले आहेत, त्यांत कांहीं फरक आहे, तो काही अंशी यामुळे असावा. कांहीं योगतारा भिन्न मानल्यामुळेही काही फरक असेल. सूर्यसिद्धांत, ब्रह्मगुप्तसिद्धांत आणि लल्लतंत्र, यांतील ध्रुव अयनांश फारच थोडे होते अशा वेळेचे आहेत. याविषयी भास्कराचार्य म्हणतो:इत्यभावेऽयनांशानां कृतदृकर्मका प्रवाः । कथिताश्च स्फुटा बाणाः मुखार्थ पूर्वसूरिभिः॥ १७ ॥ सिद्धांतशिरोमणि, भग्रहयुति. ब्रह्मगुप्त, लल्ल, यांच्या ग्रंथांत अयनगतीचा उल्लेख नाही आणि सूर्यसिद्धांतांत आहे तरी त्यांतील नक्षत्रध्रुव ब्रह्मगुप्त आणि लल्ल यांच्याशी बरेच मिळतात यावरून भास्कराचार्याचे मणणे तीनही ग्रंथांतल्या ध्रुवांस लागू आहे. सुंदरसिद्धांताच्या भोगशरांत कांहीं अंक नाहीत याचे कारण त्या सिद्धांताची मला मिळालेली प्रत फार अशुद्ध होती तिजवरून ते अंक समजले नाहीत. मी मानिलेल्या योगतारांचे इ० स०१८८७ च्या आरंभींचे मध्यम विषुवांश आणि क्रांति फ्रेंच कालज्ञान पुस्तकांतून घेऊन त्यांवरून शर आणि सायनभोग ध्रुवाभिमुख काढिले. त्यांत चित्राभोग २०१२६१६३ आला. चित्राभोग१८० अंश मानून सर्वांच्या भोगांत अयनांश २०२६।१६३ वजा करून आलेले भोग सदह कोष्टकांत 'मन्मत' या सदरांत दिले आहेत. हे शक १८०९चे आहेत. शरही अर्थात् त्याच वर्षाचे आहेत. परंतु भोग निरयन असल्यामुळे त्यांत कालभेदानें फरक फारच थोडा पडेल. म्यूपिशियम तारा आरंभस्थानी मानिली तर मन्मतभोगांत आणखी १ अंश २० कला वजा केल्या पाहिजेत. सूर्यसिद्धांत आणि ब्रह्मगुप्तसिद्धांत यांतील ध्रुवाभिमुख शरभोगांवरून कदंबाभिमुख शरभोग गणितानें काढिलेले पृ ४५४॥५५ यांतील कोष्टकांत दिले आहेत. द्वितीयार्यसिद्धांतांतले भोगशर कदंबाभिमुख दिसतात ह्मणून ते त्यांतच दिले आहेत. सार्वभौमसिद्धांतांतले भोगशर कदंबाभिमुख आहेत असे त्यांत स्पष्ट सांगितले आहे. ह्मणून तेही त्यांत दिले आहेत. केतकरांचे आणि माझे कदंवाभिमुख भोगशर प्रथम फ्रेंच किंवा इंग्लिश नाटिकल आल्मनाकवरून काढिलेले आहेत. केतकरांचे भोग झिटा पिशियम आरंभस्थानीं धरून निरयन आहेत आणि माझे चित्राभोग १८० धरून आहेत. ए-हवीं वस्तुतः दोघांचे एकच आहेत. मात्र माझ्या योगतारा केतकरांच्याहून सात भिन्न आहेत. त्यांचे मात्र वस्तुतःच भिन्न आहेत. माझ्या अंकांत रेवतीचे अंक दोनदोन आहेत. त्यांत पहिले झिटा पिशियमचे आणि दुसरे म्यू पिशियमचे आहेत. म्यू पिशियम आरंभस्थानी मानिली तर माझ्या भोगांत आणखी ४३ कला प्रत्येकांत मिळविल्या पाहिजेत. मूल सूर्यसिद्धांतांतलें नक्षत्रध्रुव पंचसिद्धांतिकेंत दिलेले नाहीत. ते मूलांत नसावे असे दिसते. पहिल्या आर्यभटाने नक्षत्रयोगतारांविषयी काही सांगितलें नाहीं. भास्कराचायनि नक्षत्रध्रुवशर ब्रह्मगुप्ताचे घेतले आहेत. बेरुणानं ब्रह्मगुप्तोक्तभोग

  • सूर्यसिद्धांताचे भोगशर त्यांतल्याच रीतीने व्हिटनेने काढिलेले दिले आहेत, आणि ब्रह्मसिद्धांतांतले बेंटलीने काढिलेले त्याच्या पुस्तकांतून घेउन दिले आहेत.