पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/445

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४८) आमच्या सायन पंचांगाच्या मंडळीपैकी एक गृहस्थ गोपाळ बल्लाळ भिडे* यांनी या कामी फार प्रयत्न केला. आमच्या सर्व अनुभवांचें एकीकरण होऊन त्यावरून उदयास्ताचे नियम निश्चित करण्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. शनीचे अस्तोदय शक १८११ पूर्वीच्या पांच वर्षांत बहुधा पर्जन्यकाली किंवा त्याचे संधीस होत असत यामुळे त्यांबद्दल अनुभव घेण्यास मुळीच संधि सांपडली नाही. मंगळाचा अनुभव घेण्याची संधि एकदोन वेळा मात्र आली. वाचकांपैकी कोणास स्फूर्ति होऊन कोणी अनुभव येऊन मला कळवितील तर त्यांचे ज्योतिषशास्त्रावर उपकार होतील. उन्हाळ्यांत देखील कधी कधी आकाश अभ्राच्छादित असते; उड्यास्तकालाच्या संधीस ग्रह क्षितिजाच्या अगदी जवळ असतात, आणि इतर आकाश अगदी स्वच्छ असले तरी क्षितिजाजवळ अभं असण्याचा संभव असतो. याप्रमाणे अनुभव पाहण्यास पुष्कळ अडचणी येतात. तथापि आमच्या ग्रंथांतले कालांश बरेच सूक्ष्म आहेत असे माझ्या अनुभवास आले आहे. बुधशु वक्री असतात तेव्हां पृथ्वीला जास्त जवळ असतात. यामुळे तेव्हां ते जास्त त जस्वी दिसतात हे खरे आहे. तथापि आमच्या काही ग्रंथांत त्यांच्या सरळवत स्थितींतल्या कालांशांत जितका भेद दिला आहे तितका तो नाहीं, किंबहुना मुळाच नाही झटले तरी चालेल. उदयास्तांसंबंधे आमच्या कोणाही ग्रंथकाराच्या लक्षात आली नाही अशी एक विशेष गोष्ट. गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. उदयास्तकाली ग्रह सूयाच्या जवळच असतात. ते दिसूं लागणे हे त्यांच्या तेजस्वितेवर अवलंबून आहे. आणि त्यांची क्षितिजावर उंची झणजे त्यांचे उन्नतांश कमजास्त असतील त्या मानानें तेजस्विता कम जास्त होते. आणि पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थळा एक ग्रह मूर्यापूर्वी नित्योदय पावन सारखा वेळ झाला असला तरी त्याचे उन्नतांश भिन्न असतील. उत्तर अक्षांश १५ या स्थली त्याचे जितके उन्नतांश येतील त्यांपेक्षां उत्तर अक्षांश २५ या स्थली कमी येतील. आणि त्याप्रमाणे तेज कमी होईल. आणि १५ अक्षांशांवर त्याचा उदय ज्या दिवशी होईल त्यापेक्षा २५ अक्षांशांवर मागून होईल; आणि अस्त अगोदर होईल. सूर्योदयापूर्वी नित्यादय किंवा सूर्यास्तानंदर नित्यास्त होण्याचा काल म्हणजे कालांश सारखे आले तरी स्थलभेदाप्रमाणे उन्नतांशांत आणि त्यामुळे अस्तोदयांत भेद पडेल हे आकृति काढून गणिताने सिद्ध करता येईल. परंतु विस्तरभयास्तव तसे करीत नाही. पुढील गोष्टीवरून ती गोष्ट सहज कळेल. आमच्या देशापेक्षां इंग्लंडांत संधिप्रकाश जास्त वेळ असतो. यामुळे आमच्या देशांत एका दिवशी सूर्यापूर्वी शुक्राचा नित्योदय ३२ मिनिटें झाला आहे (झणजे त्या दिवशी त्याचे कालांश ८ आहेत) तर त्या दिवशी त्याचा उदय होईल. परंतु इंग्लंडांत ३२ मिनिटें सूर्यापूर्वी शुक्र उगवला अस

  • गोपाळ बल्लाळ भिडे यांस आकाशांतले चमत्कार पाहण्याचा फार नाद होता. ते शक २७७८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यांत निवेडी एथे जन्मले व शक १८१२ मध्ये निवर्तले. इ.स. १८७४ पासून शेवटपर्यंत ते त्या जिल्ह्यांत शाळाखात्यांत नौकर होते. त्यांनी ग्रहांच्या उदयास्तांचे बरेच अनुभव लिहून ठेविले आहेत, व नक्षत्र योगतारांचेही काहीं अस्तोदय पाहिले आहेत. ते दीर्घायु होते तर आमच्या ज्योतिषशास्त्रज्ञानवृद्धीस त्यांचा पुष्कळ उपयोग झाला असता.