पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/444

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गणित चुकतें असें नाही. त्यांतलें गणित खरे आहे असे दुसऱ्या अनेक प्रमाणांनी सिद्ध होते. अस्तोदय न मिळण्याची कारणे निराळी आहेत. मुख्यतः कालां. शांसंबंधे चुकीमुळे ते जमत नाहीत. ग्रहलाघवाच्या ग्रहगणितांत नेहमी बहुधा थोडीबहुत चुकी सांप्रत असते. त्यांतले अस्तोदय जमले तरी ते काकतालीय न्यायानेच होत. कालांश ठरवितांना ग्रह व रवि यांच्या नित्योदयास्तकालांचें अंतर किती हे प्रत्यक्ष पाहिले पाहिजे किंवा गणिताने त्या ग्रहांची जी स्थिति त्या वेळी आली असेल तीवरून गणिताने काढले पाहिजे. सूर्य मात्र क्षितिजांत आल्याबरोबर दिसतो. परंतु अस्तोदय पाहण्याची संधि सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर काही वेळ असते, त्या वेळेस संधिप्रकाश अमतो, यामुळे त्या वेळी कोणताही ग्रह क्षितिजांत असतां दिसत नाही. क्षितिजापासून काही तरी वर येईल तेव्हां मात्र दिसतो. यामुळे ग्रह व सूर्य यांच्या उदयांचे किंवा अस्तांचें अंतर प्रत्यक्ष पाहून बरोबर काढतां यावयाचें नाहीं. कदाचित् कांहीं उपायांनी काढिले तरी ते काढण्यास काल व कोन फार सूक्ष्मपणे मोजण्याची हल्लीप्रमाणे उत्कृष्ट साधनें प्राचीनकाली असण्याचा संभव नाही. तसेच ग्रहांच्या उदयास्तकालाच्या स्थितीवरून नित्योदयास्ताचें अंतर गणिताने काढण्यास ती स्थिवि अगदी बरोबर असली पाहिजे. ती बरोबर असेल, म्हणजे अमुक प्रह आज अमक्या ठिकाणी किंवा सूर्यापासून अमुक अंतरावर आहे हे बरोबर निघालेले असेल, तर काल बरोबर निघेल. परंतु प्राचीनकाळी जेव्हां कालांश ठरविले तेव्हां ग्रहगणित अगदी सूक्ष्म-नित्योदयास्त कालांत एका पळाचीही चूक पडणार नाही इतकें सूक्ष्म-होते असे मला वाटत नाही. या कारणांनी त्या वेळी ठरविलेल्या कालांशांत चुकी असण्याचा संभव आहे. ज्या पायावर अस्तोदय काढावयाचे तोच मणजे कालांशच चुकले असल्यावर मग त्यांवरून काढलेले उदयास्त कसे जमावे ? आम्ही सायनपंचांगांत गुरूचे कालांश ११ घेतों, ह्मणून ज्या दिवशी आमच्या पंचांगांत गुरूचा अस्त लिहिला असतो त्या दिवशींच रविगुरूंच्या नित्यास्तांत ११० पळांहून कमी अंतर झाले हे आह्मी खात्रीने सांगतों. व तें खरं आहे हे दुसऱ्या प्रमाणांवरून पाहता येईल. परंतु रविगुरुंच्या नित्यास्तांत ११० पळांहून कमी अंतर झाल्याबरोबर गुरूचा अस्त होणे किंवा न होणे ही गोष्ट स्वतंत्र असल्यामुळे गुरूचा अस्त त्याच दिवशी होईलच असे खात्रीने ह्मणवत नाही. कदाचित् मागे पुढे एकदोन दिवस होईल. तरी तसे झाले असतां नवीन पंचांगांचे गणित चुकले असे होत नाही. तर गुरुचे कालांश ११ हून कमीज्यास्त धरले पाहिजेत, एवढेच त्यावरून सिद्ध होईल. सांप्रत ग्रहस्थिति शुद्ध समजण्याचे साधन आहे, आणि कालसाधनेंही आहेत. अशा काली कालांश ठरविले पाहिजेत. मी शक १८११ पर्यंत सहा सात वर्षे या कामी प्रयत्न केला पुढे दुसऱ्या अनेक व्यासंगांमुळे वेळ सांपडला नाही. दृष्टि हळू हळू मंद होऊ लागली; तरी स्वतः व सूक्ष्मदृष्टि शिष्यांच्या साह्याने काही अनुभव घेतो.*

  • मुष्टिज्ञान नामक मासिकपुस्तक मुंबई एये निघत असे त्याच्या मे, जून, जुलै १८८५ च्या अंकांत ग्रहोदयास्ताविषयीं एक सविस्तर निबंध मा लिहिला आहे. शिवाय माझ्या ज्योतिर्विलास पुस्तकांतले हे प्रकरण पहावें.