पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/443

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दैनंदिन भ्रमणांत १० पळांत ते एक अंश क्रमितात. तेव्हां ११० पळांत ११ अंश झाले. हे अंश कालसंबंधे आहेत म्हणून यांस कालांश म्हणतात. रविव गुरु यांमध्ये ११ कालांश अंतर झाले म्हणजे गुरूचा अस्तोदय होतो असे सांगितले आहे. ग्रहांचे कालांश निरनिराळ्या ग्रंथांतले खाली दिले आहेतः मूल सूर्यसिद्धांत. सांप्रतचे सूर्य,रोमश, प्रथमार्यसिद्धांत. सिद्धांत शिरोमणि. लल्ल. करण द्वितीयायसिद्धांत. करणप्रकाश. केरोपंती ग्र.सा. कोष्टक. 22 स्वानुभूत. चंद्र १३ १३ १३ १३ ॥ १०.०७ 020 09 Ov मंगळ. १७ बुध. बुधवक्री. १२ १२ १२॥ १२ गुरु. ११ | ११ १२ १२ शुक्र.९१०९ शुक्रवकी शनि, । १५१५ १५१५ । १५ १५१५ १५ १५ / १४ १५/ यांत टालमीचे *कालांश कर्कराशींत ग्रह असतां त्या वेळचे आहेत, आणि त्यांत बुधशुक्रांचे पश्चिमास्ताचे आहेत. केरोपंतांनी ग्रहसाधन कोष्टकांत दिलेले कालांश सर्वाशी प्रथमार्यसिद्धांताप्रमाणे आहेत. स्वानुभवावरून त्यांणी ते दिलेले दिसत नाहीत, कारण त्यांप्रमाणे अनुभव सर्वांशी येत नाही. गणपत कृष्णाजी आणि निर्णयसागर यांच्या पंचांगांत शुक्राचे मात्र उदयास्त ग्रहलाघवांतील कालांशांवरून काढितात. बाकीचे सर्व आणि इतर ग्रहलाघवी पंचांगांतील शुक्रासुद्धा सर्व उदयास्त, ग्रहलाघवांत एक स्थूल रीति दिली आहे तीवरून काढितात. या देशांतील इतर पंचांगें ज्या ग्रंथांवरून करतात त्यांतील कालांशांवरून त्यांत अस्तोदय काढीत असतील. नाटिकल आल्मनाकवरून केलेली नवीन पंचांगें म्हणजे केरोपंती ऊर्फ पटवर्धनी, काशीस्थ देवजीकृत व आमचें सायनपंचांग, इत्यादिकांतही आमच्या कोणत्या तरी ग्रंथांतील कालांशांवरून उदयास्त काढितात याप्रमाणे काढलेले सर्व अस्तोदय नेहमी कोणत्याच पंचांगाचे मिळत नाहीत. कधी जमतात, कधी चुकतात. आतां हे खरें की जुन्या पंचांगाचे जितके चुकतात तितके नव्यांचे चुकत नाहीत. नव्यांवरून कां जमत नाही याचा कोणी विचार न करितां कांहीं जमत नाहींत एवढ्यावरून ग्रहलाघवाचे गणित चुकते, तसे नव्या पंचांगांचेही कधी कधी चुकतें, असें सिद्ध करूं लागतात. नवीन पंचांगांचे अस्तोदय कधी कधी मिळत नाहीत, यावरून त्यांतलें * बजेसचे मू. सि. भाषांतर पृ. २२३०