पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४५) लागतो. तेव्हां चंद्रदर्शन झालें असें ह्मणतात; चंद्राचा उदय झाला असें ह्मणत नाहींत. त्याचप्रमाणे तारा व ग्रह सूर्याजवळ असतां पूर्वी दिसत नसून पुढे प्रथमच जेव्हां दिसतात तेव्हां त्यांचे दर्शन झालें, व दिसतनासे होतात तेव्हां त्यांचें अदर्शन झालें असें ह्मणावें हें बरें. परंतु आमच्या बहुतेक ज्योतिःशास्त्रकारांनी सूर्यसान्निध्यवशात् होणाऱ्या दर्शनादर्शनांस उदयास्त ह्याच संज्ञा योजिल्या आहेत, व त्याच सांप्रत प्रचारांत आहेत. चंद्राच्या नित्योदयास्ताचा पुष्कळ लोक विचार करितात व त्याचे कारणही पडते; व त्याचप्रमाणे सूर्यसान्निध्यामुळे होणाऱ्या त्याच्या दर्शनाचाही लोकांस फार परिचय; ह्मणून दोहोस भिन्न संज्ञा योजणे भाग पडले. परंतु ग्रहनक्षत्रांच्या नित्योदयास्ताचा कोणी बहुधा फारसा विचार करीत नाही. यामुळे सूर्यसान्निध्यामुळे होणाऱ्या त्यांच्या दर्शनांसच उदयास्त शब्द लावू लागले असें दिसतें. गुरु आणि शुक्र हे अस्तंगत असतां मौंजीबंधन, विवाह, इत्यादि संस्कार; तसेंच बतें, वास्तुप्रतिष्ठा, इत्यादि कत्ये होत नाहीत. नीचस्थे वक्रसंस्थेप्यतिचरणगते बालवृद्धास्तगे वा संन्यासो देवयाबाबतनियमविधिः कर्णवेधस्तु दीक्षा । मोजाबंधोंगनानां परिणयविधिर्वास्तुदेव प्रतिष्ठा वाः सद्भिः प्रयत्नात् त्रिदशपतिगरौ सिंहराशिस्थिते वा ॥ लल्ल. बाले वा यदि वा वृद्धे श के वास्तंगते गुरौ । मलमास इवैतानि वर्जयेद्देवदर्शनं ॥ बृहस्पति. ही व यांसारखी दुसरी वचनें धर्मशास्त्रनिबंधकारांनी दिली आहेत. गुरुशुक अस्तंगत असतां मात्र सांप्रत विवाहादि कृत्ये कोणी करीत नाहीत. त्यांची नीचस्थता, वक्रत्व, अतिचार, यांचा कोणी बहुधा विचार करीत नाहीत. असो. ग्रह व नक्षत्रे यांत गुरु व शुक्र यांचे मात्र अस्त धर्मकृत्यांस प्रतिकूल मानतात. हे दोन यह इतरांपेक्षां तेजस्वी आहेत. नक्षत्रांपैकी कोणती तरी नक्षत्रे नेहमी अस्तंगत असतातच. बुधाचे अस्त वर्षांतून सुधारे सहा वेळा होतात. मंगळाचा अस्त बयाच काळाने होतो, तरी एकदां झाला म्हणजे पांच महिनेपर्यंत मंगळ दिसत नाही. तेव्हां बुध, मंगळ आणि नक्षत्रे यांचे अस्त धर्मरुत्यांस प्रतिबंधक होत नाहीत, ही गोष्ट धर्मशास्त्राचे व्यवहारानुकूलत्वच दाखविते. तरी शनीचा अस्त व्यवहारास नडणारा नसूनही धर्मशास्त्रकारांनी त्याच्या त्याज्यात्याज्यत्वाचा विचार केला नाही हेही लक्षात ठेविले पाहिजे. तो पापग्रह मानिला आहे, त्यामुळे त्याचा अस्त त्याज्य मानिला नसावा. ग्रहाचा पूर्वेस उदयास्त व्हावयाचा असतां सूर्य व तो ग्रह यांच्या नित्योदयकालांत अमुक अंतरापेक्षा कमी अंतर झाले ह्मणजे त्याचा अस्त होतो व जास्त झालें ह्मणजे उदय होतो; तसेंच पश्चिमेस उदयास्त व्हावयाचा असतां सूर्य व ग्रह यांच्या नित्यास्तांत अमुक अंतर झाले म्हणजे उदयास्त होतो; असे नियम आमच्या प्राचीन ज्योतिःशास्त्रकारांनी सांगितले आहेत. उदाहरणार्थ, गुरु व सूर्य यांच्या नित्योदयास्तात सुमारे ११० पळें अंतर पडले म्हणजे गुरूचा उदयास्त होतो. ग्रहादिकांच्या