पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/441

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि सूर्यलंबन २०५१ ठरविले होते. यावरून या दोघांहीपासून आमच्या लोकांनी ही माने घेतली नाहीत असे दिसून येतें. सूर्याच्या तेजामुळे त्याच्या बिंबाच्या द्वादशांशास ग्रहण लागले तरी दिसत नाही; चंद्रबिंबाच्या षोडशांशास लागले तरी दिसते; गणितानें याहून कमी यास येईल तेव्हां ग्रहण सांगू नये, असें भास्कराचार्याने लिहिले आहे. इतर बहुतेकांनीही याप्रमाणेच याहून किंचित कमी किंवा जास्त भाग दिसत नाही असे लिहिले आहे. परंतु १९ आगस्ट १८८७ या दिवशी सूर्यग्रहण होते त्यावेळी ग्वाल्हेर एथे त्याचा ग्रास सूर्यबिंबाच्या ह्मणजे सुमारे चवदावा हिस्सा होता, तो विसाजी रघुनाथ लेले यांनी नुसत्या डोळ्यांनी व भिंगास काजळ लावून अशा दोन प्रकारांनी पाहिला, तो चांगला दिसला. मात्र नुसत्या डोळ्यांनी इतका अल्पग्रास पाहणे फार धोक्याचे आहे, डोळ्यास फार इजा होण्याचा संभव आहे, असे त्यांच्या अनुभवास आले. (६) छायाधिकार. कांहीं करणग्रंथांत हा अधिकार निराळा मुळीच नसतो. ग्रह लाघवांत हा निराळा दिला आहे. सूर्याखेरीज इतर ग्रहांचे नित्योदयास्तकाल, त्यांचे दिनमान (क्षितिजावर राहण्याचा काल), इष्टकालीन छाया, वेध, इत्यादि गोष्टींचे गणित या अधिकारांत असते. (७) उदयास्त (दर्शनादर्शनें ). ग्रहांचे उदयास्त ही एक आपल्या देशांत महत्वाची गोष्ट आहे. गुरुशुकांचा अस्त असतां विवाहादि धर्मकत्ये वयं आहेत. यामुळेच मुख्यतः ह्या गोष्टीस महत्व आले आहे. आणि ज्योतिषग्रंथांप्रमाणे दृकप्रत्यय येतो की नाही हे पाहण्याचे हे एक साधन अशी समजूत झालेली आहे. । ग्रह व तारा सूर्याच्या जवळ असतात तेव्हां सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर त्या क्षितिजावर असून त्यावेळी सूर्य क्षितिजावर नसतांही त्या दिसत नाहीत. याप्रमाणे ग्रह व तारा आठपंधरा दिवस किंवा काही महिने दिसत नाहीत. तारा आणि ग्रह प्रथम दिसत असून ते व सूर्य यांतील अंतर कमी होतां होता ज्या दिवशी ते दिसतनासे होतात त्या दिवशी त्यांचा अस्त झाला असें ह्मणतात. आणि ते सयाजवळ असल्यामुळे पूर्वी दिसत नसून ते व सूर्य यांतील अंतर वाढता वाढतां ज्या दिवशी दिसूं लागतात त्या दिवशी त्यांचा उदय झाला असें ह्मणतात. तारा आणि ग्रह यांचे नित्य क्षितिजाच्या वर येणे व खाली जाणे यांस उदयास्त ह्मणतात, व ते सूर्यसान्निध्यवशात् दिसतनासे होतात व दिसूं लागतात ह्यांसही अस्तोदय ह्मणतात. यावरून उदयास्त शब्द दोन अर्थी योजतात असें दिसून येईल. या दोहोस भिन्न संज्ञा असाव्या हे बरें. व चंद्रासंबंधे अशा आहेतही. कृष्णपक्षी चंद्र हा सूर्याच्या जवळ येतां येतां अमावास्येच्या सुमारास सूर्याच्या फार जवळ येऊन दिसेनासा होतो. व अमावास्येनंतर शुक्ल प्रतिपदेस किंवा द्वितीयेस पश्चिमेस दिसू

  • बर्जेसचें सू. सि. भाषांतर पृ. १२७ पहा. हीं माने हिंदमानाशी बरीच जुळतात म्हणून ती हिंदंनी ग्रीकांपासून घेतली असें व्हिटने ध्वनित करतो. परंतु हा केवळ पक्षपात आहे. अशा ठिकाणी थोड्या कलांचा फरक असला तरी तो पष्कळ होय हे कोणी विचारी मनुष्य कबल करील.