पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। २८ ४० ज्योतिषांत ह्या अक्षक्षेत्राचे फार माहात्म्य आहे. पुष्कळ स्थली निरनिराळ्या गोष्टीचीं माने काढण्यास या अक्षक्षेत्राशी सरूप असें क्षेत्र उत्पन्न करून त्यावरून ती काढितात. आणि त्यासंबंधे विप्रश्नाधिकारांत तशा क्षेत्रांचा फार विचार असतो. सिद्धांततत्त्वविवेक ग्रंथांतले कांहीं नगरांचे अक्षांशरेखांश मागें (पृ. २८८) दिले आहेत. यंत्रराजटीकाकार मलयेंदुमूरि याने ७५ नगरांचे अक्षांश दिले आहेत. तो ग्रंथ छापला आहे. मागें (पृ. ३५३ टीप) सांगितलेले सखाराम जोशी यांच्या यंत्रांवर कांहीं नगरांचे अक्षांश लिहिलेले आहेत, ते एथे देतो. अं.क. अं. क. अं. क. श्रीरंगपट्टण १५ २७ जनस्थान (नाशिक) २०१२ मथुरा २६ ३६ विजापूर १६ ४२ बन्नपुर (ब-हाणपुर) २१ ० मडव २७ ० करवीर १७ २१ उज्जयिनी २२ ३७ इंद्रप्रस्थ सप्तर्षि (सातारा) १७४२ अमदाबाद २३ ० कुरुक्षेत्र ३०० नंदिग्राम १८ २६ वाराणसी २५ ३६ काश्मीर ३५० सांप्रत या देशांतल्या हजारों स्थलांचे अक्षांशरेखांश इंग्रजसरकाराने फार सूक्ष्म काढविले आहेत तेव्हां वरच्यासारख्यांचा काही उपयोग नाही. तथापि आमच्या लोकांचा या कामी प्रयत्न होता एवढे त्यांवरून दिसून येईल, आणि तो कितपत सूक्ष्म होता हेही पाहतां येईल. (४) (५) चंद्रसूर्यग्रहणाधिकार. चंद्रसूर्यग्रहणांचे कारण राहु नामक दैत्य नाही, तर चंद्रग्रहणाचे कारण पृथ्वीची छाया आणि सूर्यग्रहणास कारण चंद्र, हे ज्ञान सर्वांत पूर्वीचे पौरुषग्रंथकार वराहमिहिर आणि आर्यभट यांच्या वेळेपासून आहे. श्रुतिस्मृति आणि ज्योतिषसंहिता यांची ज्योतिषसिद्धांतांशी एकवाक्यता होईल असें ग्रहणांचे कारण सांगतों, असें ह्मणून 'चंद्रग्रहणीं भूच्छायेमध्ये आणि सूर्यग्रहणी चंद्रामध्ये प्रवेश करून राहु चंद्रसूर्यास आच्छादितो' असे ब्रह्मगुप्ताने सांगितले आहे. आणि तदनुसार भास्कराचार्यानेही तसेंच झटले आहे. सूर्यग्रहणांत चंद्रलंबनाचा विचार येतो. आमच्या ग्रंथांत परमलंबन ग्रहगतीच्या पंधराव्या हिश्शाइतकें मानतात. ह्मणजे चंद्राचे परम मध्यम लंबन ५२ कला ४२ वि. आणि सूर्याचे ३ क. ५६ वि. आहे. आधुनिक शोधांप्रमाणे पाहिले तर यांत चंद्रलंबनांत अगदी थोडी चक आहे. मुर्याचें लंबन फार चुकले आहे. सांप्रतच्या सूक्ष्म शोधावरून चंद्राचे विषुववृत्तक्षितिजस्थ परमलंबन ५७ क. १ वि. आणि सूर्याचे ८.६ विकला आहे. हिपार्कस याने चंद्रलंबन ५७ कला आणि सूर्यलंबन ३ कला; व टालमीने चंद्रलंबन ५८।१४

  • प्रतोद यंत्रांवर सखारामकृत टीका आहे, तींत उदाहरणांत अक्षांश २७॥४१॥५० आहेत. आणि सखाराम जोशी कोडोलीकर यांणी साताऱ्याचे अक्षांश १७१४२१५० इतकेच लिहिले आहे•त. त्या टीकेचे पुस्तक मला सातारा जिल्ह्यांतच आप्टे एथे मिळाले. यावरून ती टीका यांचीच होय...

ब्रह्मसिद्धांत गोलाध्याय आर्या ३४-१८ पहा. + सिद्धांतशिरोमणि ग्रहणवासना श्लो. ७-१० पहा. लंबनें.