पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४२) ग्रहलाघवासारखा एक ग्रंथ केला आहे, परंतु त्यांत वर्षमान सूर्यसिद्धांताचें आहे आणि त्यावरून ग्रह सायन येतात असे समजते. ह्मणन तो प्रत्यक्ष कोणत्याच मार्गास उपयोगी नाही, आणि प्रचारांत येणे कठिण. बापदेव यांणी किंवा त्यांच्या शिष्यांपैकी कोणी वर लिहिल्या प्रकारचा ग्रंथ केला आहे. असें ऐकण्यांत नाही. रघुनाथाचार्यांनी ग्रंथ केला आहे (पृ. ३०४ पहा). परंतु त्यांत वर्षमान कोणते आहे, प्रत्यक्ष त्यावरून वरील निहींपैकी एखाद्या पद्धतीचे पंचांग करितां येईल की नाही, हे समजले नाही. सारांश जसा पाहिजे आहे तसा ग्रंथ सांप्रत नाही. तो करण्याची माझी इच्छा आणि प्रयत्न आहे. ईश्वरी इच्छा असेल तर तो सिद्धीस जाईल. (३) त्रिपश्नाधिकार. दिक, देश, आणि काल या तिहींसंबंधी प्रश्नांचा यांत विचार असतो. ह्मणन यास त्रिप्रश्नाधिकार ह्मणतात. यांत दिशासाधन निरनिराळ्या प्रकारांनी सांगितलेले असतें. इष्टकालावरून लग्न आणि लग्नावरून इष्टकाल यांचे साधन असते तसेच दुसऱ्या प्रकारांनींही-ह्मणजे छायादिकांवरून-कालसाधन असते. उज्जयिनीपासनदे. शांतर किती याचा विचार बहुधा मध्यमाधिकारांत असतो यामुळे यांत तो नसतो. तथापि स्थलाचे विषुववृत्तापासून अंतर ( अक्षांश) काढण्याचे प्रकार यांत असतात. छायेविषयीं यांत फार विचार असतो. छायासाधनार्थ १२ अंगुलांचा शंकगणितास घेतलेला असतो. इष्ट कालीं शंकुच्छाया किती व कशी (कोणत्या दिशतापडेल आणि शंकूच्या कोणत्याही दिशेस सूर्य (किंवा ग्रह ) असला तर त्याची का या किती, कशी पडेल, इत्यादि प्रकार छायासाधनांत असतात. इष्टकाल मिला नसेल तर शंकूची पूर्वापर छाया, याम्योत्तर छाया आणि कोणच्छाया या ण्याची मात्र रीति भास्कराचार्याच्या पूर्वीच्या ग्रंथांत आहे. भास्कराचा कूच्या कोणत्याही दिशेस सूर्य असतां छाया काढण्याची रीति दिलेली जविषयीं तो अभिमानपुरःसर ह्मणतो: याम्योदक्समकोणभाः किल कृताःपूर्वैः पृथक्साधनैयस्तिदिग्विवरांतरांतरगता याः प्रच्छकेच्छावशात् ॥ ता एकानयनेन चानयति यो मन्ये तमन्यं भुवि । ज्योतिविद्वदनारविंदमुकुलप्रोल्लासने भास्करं ॥ ४४ ।। सिद्धांतशिरोमणि, विप्रश्नाधिकार छायेवरून कालसाधन करितात. तथापि तिचा मुख्य उपयोग वेधार्थ बंधनाकडे आहे. नलिकेतून वेध करण्याचे मुख्य स्वरूप असें की, इष्टका च्या (किंवा कोणत्याही ग्रहाच्या ) प्रकाशांत शंकु उभा केला असता त्या या किती व कोणत्या दिशेस पडेल हे त्या ग्रहाच्या ग्रंथागतस्थितीवरून काढून तदनुसार नलिका लावून तींतून ग्रह पाहतात. हा इष्ट काली दिसला ग्रंथावरून आलेली ग्रहस्थिति बरोबर आहे असें झालें. विषव दिवशी कोणत्याही स्थली द्वादशांगुल शंकूची जी छाया तीस ह्मणतात. पलभा हा भुज, शंकु ही कोटि, आणि शंक्य आणि छायाय यांस णारी रेषा अक्षकर्ण; या काटकोनत्रिकोण क्षेत्रास अक्षक्षेत्र ह्मणतात. आम