पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४१) कमास बहुतेक सर्व जमतील, फरक बहुधा मुळींच पडणार नाही. यामुळे वरील दुसरा मार्ग सहज प्रचारांत येईल, तसाच या मानाचा नवीन संस्कृत ग्रंथ आणि तदनुसार तिथिचिंतामणीसारख्या सारण्या तयार झाल्या ह्मणजे हा मार्ग अति लवकर प्रचारांत येईल अशी मला खात्री वाटते. केरोपंतांस हा मार्ग कोणी सुचविता तर त्यांस तो तत्काल मान्य झाला असता. कारण पटवर्धनी पंचांगांत त्यांनी जो मार्ग स्वीकारला आहे त्याहून झिटापिशियमच्या जागी दुसरी तारा घेणे एवढाच काय तो यांत फरक आहे. आणि बापूदेवांचा व रघुनाथाचार्यादिकांचा हेतु यांत साधत असल्यामुळे त्यांच्या अनुयायांसही हा पसंत होईल. । चरील दुसन्या आणि तिसऱ्या मार्गात वर्षमान आणि ग्रहगतिस्थिति शुद्ध घेणे एवढाच काय तो जुन्या पंचांगाहून भिन्नपणा आहे. या पद्धतीचे पंचांग कोणत्याही समजुतीच्या मनुष्याच्या हातांत दिले तर त्यांत त्याला न पटण्याजोगें जुन्याहून भिन्न असें कांहीं सांपडणार नाही; पचांग फिरलें असेंही वाटणार नाही. सारांश या दोहोंपैकी कोणताही मार्ग प्रचारांत येण्यास अगदी हरकत नाही. या तीन मार्गाच्या विवेचनावरून व ग्रहादिकांस ग्रहलाघवाने येणारे अंतर मागे (पृ. ४१४ ) दाखविले आहे त्यावरून ग्रहगतिस्थिति ज्यानवीन ग्रंथ पाहिजे. वरून शुद्ध येतील असा नवीन ग्रंथ पाहिजे हे उघड आहे. ज्यांत ग्रहगतिस्थिति इंग्लिश नाटिकल आल्मनाक् ज्या ग्रंथांवरून करितात त्यांतल्या इतक्या नाहीत तरी कामापुरत्या शुद्ध आहेत, अस केरोपंतांचा ग्रहसाधनाची कोष्टके हा ग्रंथ आहे. परंतु त्यांत वर्षमान सूर्यसिद्धांताचें घेतलें आहे, आणि त्यावरून ग्रह सायन निवतात, यामुळे तो प्रत्यक्ष वरील तिहींपैकी कोणत्याच मार्गाच्या उपयोगी नाही. तथापि त्याचे नवीन ग्रंथ करणारास पुष्कळ साह्य होईल. इंग्लिश किंवा फ्रेंच नाटिकल आल्मनाक ज्यांवरून करितात त्या ग्रंथांच्या साह्याने नवीन ग्रंथ झाला पाहिजे. ते ग्रंथ फ्रेंच भाषेत आहेत, त्यांवरून ग्रह सायन निघतात आणि त्यांतील वर्षमानपद्धति आमच्याहून निराळीच, यामुळे बरीच अडचण पडेल. तरी प्रयत्नानें ग्रंथ तयार करितां येईल. तो ग्रंथ संस्कृत भाषेत पद्यात्मक झाला पाहिजे. त्यांत गणिताकरितां कोष्टके करून ग्रहलाघवावरून ग्रह करण्यास श्रम लागतात तितक्या किंवा त्याहून कमी श्रमानेही ग्रह करितां येतील असें करितां येईल. शिवाय तिथिनक्षत्रयोगांची घटीपलें काढण्यास गणेशदैवज्ञकत तिथिचिंतामणीसारखी कोष्टकें झाली पाहिजेत. तीही करितां येतील. हे दोन ग्रंथ झाल्यावर वरील तिहींपैकी त्यांत वि. शेषतः शेवटच्या दोहोंपैकी कोणताही मार्ग प्रचारांत येण्यास फार साह्य होईल. केरोपंती पंचांगासारखें पंचांग ज्यावरून होईल असा ग्रंथ वेंकटेश बापूजी केतकर योनी केला आहे असे समजते. परंतु त्यांत अयनांश झिटापिशियमवरून धरिले आहेत, ह्मणून तो प्रचारांत येणे कठिण दिसते. बाबजी विठ्ठल कुळकर्णी यांनी *

  • कुळकर्णी ह्यांनी करणशिरोमणि आणि ग्रहज्योत्स्ना या नांवांचे ग्रंथ केले आहेत. ते मी पाहिले नाहीत यामुळे त्यांविषयी जास्त माहिती देता येत नाही. हे ग्रंथ छापले नाहीत. केरोपंत नानांचे मत त्या ग्रंथांविषयी चांगले होते असे समजते. कुळकर्णी हे शक २७६७ मध्ये मालवण एथे जन्मले आणि शक १८१५ मध्ये निवर्तले. ते रत्नागिरी जिल्ह्यांत इ. स. १८६५ पासून २८७५ पर्यंत शाळाखात्यांत व पुढे शेवटपर्यंत मुल कीखात्यांत नौकर होते. त्यांणी केलेलें तारकादशे पुस्तक इ. स. १८८६ मध्ये छापलें आहे.